वेळ वाचवण्यासाठी शेड्यूल केलेले मेसेजेस वापरणे

चेक इनपासून चेक आऊटपर्यंत तुमची गेस्ट कम्युनिकेशन्स स्वयंचलित करा.
Airbnb यांच्याद्वारे 19 नोव्हें, 2020 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
4 फेब्रु, 2025 रोजी अपडेट केले

'शेड्युल केलेले मेसेजेस' टूल तुम्हाला विशिष्ट क्षणी गेस्ट्ससोबत महत्वाची माहिती ऑटोमॅटिकली शेअर करण्यास मदत करते, जसे की चेक इनचा दिवस. याच्या मदतीने तुम्ही स्टॅंडर्ड मेसेज बनवून त्यांना अशा वेळी पाठवण्यासाठी शेड्युल करू शकता जेव्हा गेस्ट्सना त्याची सगळ्यात जास्त गरज असते.

तुम्ही झटपट उत्तरे देखील तयार करू शकता, हे लहान टेम्पलेट्स आहेत जे तुम्ही सामान्य प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि गेस्ट्सना मेसेज पाठविताना वेळ वाचविण्यासाठी वापरू शकता.

मेसेजेस वैयक्तिकृत कसे करावे आणि शेड्युल कसे करावे

मेसेज लिहिण्यासाठी आणि शेड्युल करण्यासाठी तुमच्या मेसेज टॅबमधील मेसेजिंग सेटिंग्जवर जा.

तुम्ही शॉर्टकोड्स टाकून हे मेसेजेस पर्सनलाइज करू शकता. हे प्लेसहोल्डर्स तुमच्या लिस्टिंग आणि तुमच्या गेस्टचे रिझर्व्हेशन या दोन्ही ठिकाणांवरून तुमच्या घराचे नियम आणि त्यांचे नाव आणि चेक इनची तारीख यासारखी माहिती घेतात. तुमचे लिस्टिंगचे तपशील पूर्ण आणि अप टू डेट असल्याची खात्री करा कारण रिक्त शॉर्टकोड असलेले मेसेजेस योग्यरित्या पाठवले जाणार नाहीत.

शॉर्टकोड्स समाविष्ट करण्यासाठी ड्रॉप-डाऊन मेनू वापरा. तुम्ही लिहिणे पूर्ण झाल्यावर, गेस्टची कोणती कृती तो मेसेज पाठविण्यास ट्रिगर करेल हे निवडून मेसेज शेड्युल करा. तुम्ही कधीही मेसेज बदलू शकता, स्किप करू शकता किंवा शेड्युल केलेल्या वेळेपेक्षा लवकर पाठवू शकता.

येथे तुम्ही शेड्युल केलेल्या मेसेजमध्ये शॉर्टकोड्स कसे वापरू शकता हे सांगितले आहे:

प्रिय [guest first name],

बुकिंग केल्याबद्दल धन्यवाद! आम्ही [check-in date] तुमचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. कृपया तुमची ट्रिपची माहिती शेअर करा जेणेकरून आम्ही एक सुरळीत चेक इन आयोजित करू शकू, जो [check-in time] किंवा नंतरचा असतो.

येथे या प्रदेशाबद्दल झटपट माहिती दिलेली आहे: [neighborhood]

आसपासचा परिसर फिरण्यासाठी येथे काही सल्ले दिलेले आहेत: [getting around]

तुम्ही आमच्या गाईडबुकमध्ये [city] ला भेट देण्यासाठी उपयुक्त सूचना मिळवू शकता, ज्या येथे आहेत:[guidebook]. तुमच्या ट्रिपच्या काही दिवस आधी, आम्ही चेक इनची माहिती शेअर करू. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया आम्हाला कळवा.

मेसेजेस कधी शेड्युल करायचे

तुम्ही कधीही मेसेज शेड्युल करू शकता. गेस्ट्सना आवश्यक असेल तेव्हा महत्त्वपूर्ण माहिती पाठवण्यासाठी या क्षणांचा विचार करा.

  • बुकिंगनंतर थोड्याच वेळात: बुकिंगनंतर तुम्ही केलेल्या तत्काळ थॅंक-यू नोटमुळे गेस्ट्सना कळते की तुम्हाला त्यांची विनंती मिळाली आहे आणि ते त्यांच्या आगामी वास्तव्यासाठी तपशील आणि सुचना देऊ शकतात.
  • चेक इन करण्यापूर्वी: गेस्ट्सना त्यांच्या आगामी वास्तव्याची आठवण करून द्या जेणेकरून ते त्यांच्या आगमनाची तयारी करू शकतील. तुम्ही हे मेसेज चेक इनच्या 14 दिवस आधीपर्यंत शेड्युल करू शकता.
  • चेक इनचा दिवसः जरी तुम्ही आधीच चेक इनच्या सूचना शेअर केल्या असल्या, तरी अनेक गेस्ट्सना चेक इनच्या दिवशी निर्देशांसह महत्त्वाची माहिती पुन्हा मिळवणे उपयुक्त वाटते.
  • वास्तव्याचा पहिला दिवस: सर्व काही व्यवस्थित आहे हे कन्फर्म करण्यासाठी संपर्क साधा आणि त्यांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तुम्ही उपलब्ध आहात हे त्यांना सांगा.
  • चेक आऊटनंतरचा दिवस: तुमच्या गेस्ट्सना तुमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद द्या आणि त्यांना रिव्ह्यू लिहिण्याची आठवण करून द्या.

या लेखात दिलेली माहिती पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
19 नोव्हें, 2020
हे उपयुक्त ठरले का?