लिस्टिंग टॅबमधील अधिक नियंत्रणे
अधिक तपशील असलेल्या लिस्टिंग्जना 20% अधिक बुकिंग्ज मिळू शकतात, हे आम्हाला आढळून आले आहे. 2023 मध्ये लिस्टिंग टॅब सादर केल्यापासून, आम्ही होस्ट फीडबॅकनुसार त्यात सुधारणा करत आहोत.
2024 समर रिलीजमध्ये फोटो टूरसाठी तुमची सर्वात जास्त विनंती समाविष्ट आहेः रूम्समधील लिस्टिंग फोटो पुन्हा ऑर्डर करण्याची क्षमता. लवकरच, तुम्ही AI च्या मदतीने सध्याची फोटो टूर देखील अपडेट करू शकाल.
अपग्रेड केलेल्या फोटो टूरपासून सुरुवात करून, लिस्टिंग्ज टॅबसह तुमची लिस्टिंग अधिक सहजपणे मॅनेज करण्याचे पाच मार्ग येथे दिलेले आहेत.
1. एक फोटो टूर तयार करा
गेस्ट्सना फोटो टूर तयार करून तुमच्या घराचा लेआऊट समजण्यात मदत करा. तुम्ही तुमच्या लिस्टिंगमधील फोटोंना रूम्स आणि इतर जागांमध्ये स्वयंचलितपणे आयोजित करण्यासाठी AI चा वापर करू शकता, त्यानंतर टूरमध्ये स्वतः बदल करू शकता.
आता, तुम्ही फोटो ड्रॅग आणि ड्रॉप करून त्यांना कोणत्याही रूममध्ये पुन्हा व्यवस्थित करू शकता. लवकरच, तुम्ही तीन किंवा अधिक फोटो जोडल्यावर तुम्ही त्वरित टूर अपडेट करू शकाल. तुम्ही केलेले कोणतेही बदल न बदलता AI नवीन इमेजेस व्यवस्थापित करेल.
2. तुमच्या सुविधा अपडेट करा
विशिष्ट वैशिष्ट्ये किंवा सुविधा असलेली घरे शोधण्यासाठी गेस्ट्स सहसा त्यांचे Airbnb शोध परिणाम फिल्टर करतात.तुमची जागा ऑफर करत असलेल्या सर्व गोष्टी समाविष्ट करून तुमची लिस्टिंग लक्षवेधी दिसण्यात मदत करा. लिस्टिंग टॅब सुविधा जोडणे आणि त्या अपटूडेट ठेवणे सोपे बनवते.
तुम्ही जवळपास 150 सुविधा वर्णानुक्रमाने किंवा कॅटेगरीनुसार पाहू शकता किंवा सुविधांना नावानुसार शोधू शकता - स्क्रोल करण्याची आवश्यकता नाही. सूचित केलेले असेल तेथे तपशील समाविष्ट करा, जसे की तुमचे स्वतंत्र वर्कस्पेस प्रिंटर आणि एर्गोनॉमिक चेअर देते हे लक्षात घेणे.
3. तुमच्या लिस्टिंगचे वर्णन रीफ्रेश करा
गेस्ट्सना त्यांनी बुक केलेल्या जागा लिस्टिंगच्या वर्णनाशी जुळणाऱ्या हव्या असतात. तुमच्या घराबद्दल आणि त्याच्या सभोवतालची स्पष्ट, अचूक माहिती दिल्याने अपेक्षा निश्चित करण्यात मदत होते.
लोकेशन, सजावट आणि तुमच्या आदरातिथ्याचे वर्णन करा. गेस्ट्सना तुमच्या जागेमध्ये राहणे म्हणजे नेमके काय आहे याची माहिती देण्यात मदत करा - दृश्ये, आवाज आणि अनुभव
4. तुमचे आगमन मार्गदर्शक पूर्ण करा
गेस्ट्सना तुमची जागा शोधता आली पाहिजे आणि त्यांना सहजपणे आत जाता आले पाहिजे. लिस्टिंग टॅबमुळे तुम्हाला आगमनाची माहिती एकाच ठिकाणी जोडता किंवा अपडेट करता येते.
तुम्ही तुमची चेक इन पद्धत आणि वेळ, दिशानिर्देश आणि पार्किंगसाठी सल्ले, वायफायचा पासवर्ड, सुविधा सूची, चेकआउट सूचना आणि बरेच काही व्यवस्थापित करू शकता—आणि त्यानंतर गेस्ट्सना काय दिसेल त्याचे पूर्वावलोकन करू शकता. गेस्ट्सना बुकिंगनंतर, चेक इनपूर्वी आणि चेकआऊटपूर्वी माहिती मिळते.
5. स्मार्ट लॉक जोडा
स्मार्ट लॉक हे एक वायफाय सक्षम इलेक्ट्रॉनिक लॉक आहे जे गेस्ट्स चावीऐवजी कोडने उघडतात. ही सेल्फ चेक इनची एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे.
स्मार्ट लॉक इंटिग्रेशन हे एक होस्टिंग टूल आहे ज्यामुळे तुम्हाला सुसंगत लॉक्स Airbnb शी कनेक्ट करता येतात आणि प्रत्येक नवीन बुकिंगसाठी आपोआप एक युनिक डोअर कोड तयार करता येतो. हे सध्या अमेरिका आणि कॅनडामधील सहा किंवा त्यापेक्षा कमी लिस्टिंग्ज असलेल्या आणि Schlage च्या काही खास लॉक्स असलेल्या होस्ट्ससाठी उपलब्ध आहे. या वर्षाच्या अखेरीस August आणि Yale डिव्हाइसेस जोडली जातील.