प्रोफाईल अपग्रेड्ससह तुमच्या गेस्ट्सबद्दल अधिक जाणून घ्या

प्रोफाईल सेटअप करण्याच्या नवीन सुविधांमध्ये, अधिक चांगल्या इमेजेससाठी गाईडेड फोटो कॅप्चर आहे.
Airbnb यांच्याद्वारे 1 मे, 2024 रोजी
21 ऑक्टो, 2024 रोजी अपडेट केले

तुम्ही कोणाला होस्ट करत आहात याबद्दल अधिक जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे तुम्ही आम्हाला सांगितले. आता, रिझर्व्हेशन बुक करणाऱ्या किंवा ट्रिपमध्ये सामील होणाऱ्या गेस्ट्सना अधिक माहिती देऊन प्रोफाईल तयार करण्यासाठी सूचित केले जाईल.

अपग्रेड झालेल्या गेस्ट प्रोफाईल्स कशा काम करतात?

आमच्या नवीन प्रोफाईल सेटअपसह, आम्ही गेस्ट्सना त्यांचे प्रोफाईल्स भरणे सोपे आणि मजेशीर बनवत आहोत. यामध्ये गाईडेड फोटो कॅप्चरचा समावेश आहे जो असा प्रोफाईल फोटो जोडण्यात मदत करतो ज्यामध्ये त्यांचा चेहरा स्पष्ट दिसतो आणि इमेजमध्ये दुसरी कोणीही व्यक्ती नसते.

होस्ट प्रोफाईलप्रमाणे, गेस्ट्स ते कुठे राहतात, ते बोलत असलेली भाषा आणि त्यांच्याविषयी इतर माहिती यांसारखे तपशील समाविष्ट करू शकतात जेणेकरून तुम्हाला राहण्यासाठी कोण येणार आहे याची थोडी कल्पना मिळेल. तरीही सर्व बुकिंग गेस्ट्सनी त्यांची ओळख व्हेरिफाय करणे आवश्यक आहे. 

गेस्ट्स Airbnb वर असलेल्या त्यांनी भेट दिलेल्या सर्व जागा दाखवून, प्रवास स्टॅम्प्स देखील जोडू शकतात. हे सचित्र स्टॅम्पसह गेस्ट्सचा प्रवास इतिहास दाखवते, जसे की तुमच्या पासपोर्टमध्ये दिसते.

नेहमीप्रमाणे, तुम्ही रिझर्व्हेशन उघडून गेस्ट्सच्या प्रोफाईल्स ॲक्सेस करू शकाल.

नवीन प्रोफाईल सेटअपमध्ये, गाईडेड फोटो कॅप्चर, एका चांगल्या फोटोसाठी गेस्टच्या चेहऱ्यावर झूम करते.

प्रोफाईल अपग्रेड्स 2024 समर रिलीजचे भाग आहेत, आणि ते आता सर्व गेस्ट्ससाठी उपलब्ध आहेत.

Airbnb
1 मे, 2024
हे उपयुक्त ठरले का?