रिसायकलिंग आणि कचरा कमी करण्याबद्दल जाणून घ्या
हायलाइट्स
अशा कल्पना मिळवा ज्यामुळे तुम्हाला आणखी पर्यावरण-स्नेही होस्ट होण्यासाठी काही सोप्या पायऱ्या घेता येतील
फिल्टर केलेले पाणी देण्यापासून ते पुन्हा वापरण्यायोग्य पिशव्या देण्यापर्यंत, छोटे बदल प्लास्टिकचा कचरा कमी करू शकतात
रिसायकलिंगसाठी स्वतंत्र डबे दिल्याचे सुनिश्चित करा
अनेक पर्यटन स्थळे कचरा व्यवस्थापनासह, भरून वाहणाऱ्या लँडफिल्सपासून ते रीसायकलिंगच्या अपुऱ्या पर्यायांपर्यंत विविध समस्यांचा सामना करतात. प्लास्टिकच्या कचऱ्याने भरलेला एक डंप ट्रक दर मिनिटाला आपल्या महासागरात प्रवेश करतो. म्हणजे ते एका वर्षाच्या कालावधीत, ते 80 लक्ष टन्स* प्लास्टिक होते. वन्यजीवांवर आणि पर्यावरणावर होणाऱ्या हानिकारक परिणामामुळे, प्लास्टिकचा वापर कमी करणे—आणि शक्य असेल तेव्हा कचरा तयार करणे टाळणे महत्त्वाचे आहे.
होस्ट्सना कचरा व्यवस्थापनाच्या आणि कचरा कमी करण्याच्या सर्वोत्तम पद्धती शिकण्यात मदत करण्यासाठी, आम्ही पर्यावरणासाठी जागतिक चॅम्पियन असलेल्या युनायटेड नेशन्स एन्व्हार्यनमेंट प्रोग्राम आणि जगातील अग्रगण्य संवर्धन संस्था वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड यांच्यासह जवळून काम केले. या समस्यांवर होस्ट्सनी त्यांच्या जागी कशा उपाययोजना केल्या, याबद्दल आम्ही आमच्या जागतिक होस्ट कम्युनिटीचे सल्लेदेखील शेअर करत आहोत.
तुम्ही कोणत्या मार्गांनी कचरा कमी करू शकता, त्यासाठी या कल्पना पहा:
सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर कमी करा
पेम्ब्रोकशायर, वेल्स येथील सुपरहोस्ट ॲना आणि तिच्या कुटुंबाने 2019 मध्ये प्लास्टिकचा वापर थांबवण्याचा प्रयत्न करण्याचा निश्चय केला. ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे, पण प्रत्येक वर्षी ते अधिक प्रगती करत आहेत.
“आम्ही पुरवतो ते हाताने तयार केलेले साबण आणि शैम्पू बार हे एक मैलपेक्षा कमी अंतरावर असलेल्या उत्तम बिझनेसकडे मिळतात,” अॅना म्हणतात. “या साबणात सीवीड देखील आहे जे स्थानिक बीचवरून मिळवले जाते, जो आमचे गेस्ट्स खिडकीतून पाहू शकतात!”
प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत:
- पुन्हा वापरण्यायोग्य पिशव्या द्या: वन्य प्राणी प्लास्टिकच्या पिशव्यांना चुकून अन्न** समजू शकतात. गेस्ट्सना पुन्हा वापरण्यायोग्य आणि धुण्यायोग्य शॉपिंग बॅग्ज देऊन त्यांना प्लॅस्टिक टाळण्यात मदत करा आणि त्यांच्या वास्तव्यासाठी बॅग्ज तयार करा. हॉलीवूड बीच, कॅलिफोर्निया येथील सुपरहोस्ट टिफनी यांच्याकडे अस्तर असलेल्या बाईकच्या बास्केट्स आहेत ज्या बॅगमध्ये रूपांतरित होतात ज्यामुळे त्यांच्या गेस्ट्सना फिरताना खरेदी करणे सोपे होते.
- पुन्हा वापरण्यायोग्य कप आणि फूड स्टोरेज कंटेनर स्टॉक करा: पुन्हा वापरण्यायोग्य पाण्याच्या बाटल्या आणि कॉफी मग्ज हे गेस्ट्स जेव्हा बाहेर फिरत असतात तेव्हा वापरण्यासाठी उत्तम असतात. पुन्हा वापरण्यायोग्य काचेच्या फूड स्टोरेज कंटेनर्समुळे गेस्ट्स उरलेले खाद्यपदार्थ जपून ठेवू शकतात किंवा पिकनिकसाठी पॅक करून घेऊ शकतात.
- रिफिल करण्यायोग्य कंटेनर वापरा: एकदा वापरण्यायोग्य बाटल्यांऐवजी रिफिल करण्यायोग्य हँड सोप, डिश सोप आणि साफसफाईची उत्पादने वापरा.
- फिल्टर केलेले पाणी ऑफर करा: तुमच्या नळावर वॉटर फिल्टर बसवणे किंवा फिल्टर केलेले वॉटर पिचर असणे गेस्ट्सना पाण्याच्या बाटल्या खरेदी करण्यापासून रोखू शकते. “आमच्या लिस्टिंगमध्ये वॉटर-फिल्टरिंग सिस्टम आहे,” मेक्सिको सिटीमधील सुपरहोस्ट ओमर म्हणतात. “गेस्ट्सनी आम्हाला सांगितले आहे की बुकिंग करताना हा एक निर्णायक घटक होता!”
- प्लास्टिक पॉड्स वापरणारे कॉफी मेकर्स टाळा: तुम्ही तुमच्या गेस्ट्ससाठी कॅफिन फिक्स ऑफर करत असल्यास, डिस्पोजेबल कॉफी कॅप्सूलऐवजी ऑरगॅनिक, सावलीत उगवलेली कॉफी निवडा. सावलीत उगवलेली कॉफी झाडांच्या कॅनोपीखाली उगवली जाते ज्यामुळे विविध प्रकारचे कीटक, पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण निवारा मिळतो, जे जंगलतोडीमुळे वाढत्या धोक्यात आले आहेत.
चॅम्पियन रीसायकलिंग
काही गेस्ट्स कदाचित रीसायकलिंगशी परिचित नसतील आणि प्रत्येक कम्युनिटीचे स्वतःचे नियम असतील. तुमच्या गेस्ट्सना स्थानिकांप्रमाणे रीसायकल करण्यात मदत करण्यासाठी येथे काही सूचना आहेत:
- स्वत:ला शिक्षित करा: तुमच्या क्षेत्राची रीसायकलिंग सिस्टम कोणत्या प्रकारचे प्लास्टिक स्वीकारते ते पहा आणि तुमच्या गेस्ट्सना ते रीसायकल करण्यासाठी प्रोत्साहित करा.
- लेबल केलेले डबे द्या: किमान एक तरी रीसायकलिंग बिन ऑफर करा. पेपर आणि ग्लास सारखे विशिष्ट आयटम्स स्वतंत्रपणे रीसायकल करणे आवश्यक असल्यास, तुमच्याकडे प्रत्येकासाठी डबे असल्याची खात्री करा.
- स्पष्ट सूचना शेअर करा: तुमच्या सुविधा सूचीमध्ये चित्रे आणि उदाहरणे समाविष्ट करा, जेणेकरून गेस्ट्स सहजपणे त्याचा संदर्भ घेऊ शकतील.
- तुमच्या जागेत रिमाइंडर्स पोस्ट करा: मिलान, इटलीच्या सुपरहोस्ट अँटोनेला, चेक इनच्या वेळी त्यांच्या गेस्ट्सना वैयक्तिकरित्या रीसायकलिंग प्रोसेस समजावून सांगणे पसंत करतात—आणि त्यांच्या संपूर्ण जागेत नियमांना बळकटी येते. “माझ्याकडे कचऱ्याच्या बास्केट्सजवळ इंग्रजीमध्ये नियम असलेल्या प्रिंटेड शीट्स आहेत आणि सुविधा सूचीमध्ये नियमांचा समावेश आहे,” त्या म्हणतात. त्यांनी त्यांच्या स्थानिक सरकारच्या वेबसाईटवरून अनेक भाषांमध्ये रीसायकलिंगचे नियम देखील प्रिंट केले आहेत.
पुढेः शाश्वत पर्यटनाला पाठिंबा देण्यासाठी सोप्या पायऱ्या जाणून घ्या
*वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडच्या नो प्लॅस्टिक इन नेचरः अ प्रॅक्टीकल गाईड फॉर बिझनेस एंगेजमेंट, या 5 फेब्रुवारी 2019 रोजी प्रकाशित पुस्तकातून
**वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडच्या 60 अॅक्शन्स फॉर द प्लॅनेट, या 5 मार्च 2021 रोजी प्रकाशित पुस्तकातून
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.
हायलाइट्स
अशा कल्पना मिळवा ज्यामुळे तुम्हाला आणखी पर्यावरण-स्नेही होस्ट होण्यासाठी काही सोप्या पायऱ्या घेता येतील
फिल्टर केलेले पाणी देण्यापासून ते पुन्हा वापरण्यायोग्य पिशव्या देण्यापर्यंत, छोटे बदल प्लास्टिकचा कचरा कमी करू शकतात
रिसायकलिंगसाठी स्वतंत्र डबे दिल्याचे सुनिश्चित करा