तुम्हाला अधिक शाश्वत होस्ट बनण्यात मदत करणे
हायलाइट्स
Airbnb आणि होस्ट सल्लागार बोर्ड होस्ट्सना अधिक शाश्वत होण्यास कशी मदत करत आहेत ते जाणून घ्या
सल्लागार बोर्डाच्या अॅना जोन्सनेही तिला पर्यावरणाची इतकी काळजी का आहे हे सांगितले
- 2021 मध्ये होस्ट सल्लागार बोर्डच्या प्रगतीबद्दल अपडेटेड रहा
आम्ही दर महिन्याला होस्ट सल्लागार बोर्डाचे सर्वात नवीन अपडेट्स शेअर करतो आणि तुम्हाला बोर्डाच्या सदस्यांविषयी जाणून घेण्यात मदत करतो.
सर्वांना नमस्कार,
मी अॅना जोन्स आहे, होस्ट सल्लागार बोर्डाची सदस्य आणि शाश्वतता समितीची फॅसिलिटेटर. आम्ही अधिक पर्यावरणास अनुकूल होण्यासाठी होस्ट्सना कसे सपोर्ट करू शकतो हे शोधण्यासाठी आम्ही गेल्या काही महिन्यांपासून Airbnb लीडर्सना भेटत आहोत.
22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन साजरा करताना, आम्ही काय केले याबद्दल अधिक तपशील शेअर करण्यास मी खूप उत्साही आहे!
आमच्या कम्युनिटीला अधिक शाश्वत बनवण्यात मदत करणे
हे समजण्यासारखे आहे की, बऱ्याच होस्ट्सना अधिक शाश्वतता कशी सुरू करावी हे माहित नाही. तिथे बरीच माहिती आहे आणि ती बऱ्याचदा भारावून टाकू शकते!
जेव्हा मी सल्लागार मंडळामध्ये सामील झाले, तेव्हा माझे एक उद्दीष्ट म्हणजे होस्ट्सना शाश्वतता अधिक सुलभ करून देणे होते. माझा खरोखर विश्वास आहे की एकमेकांना पाठिंबा देऊन आणि साजरे करून आपण सकारात्मक बदल घडवू शकतो!
आम्ही यावर Airbnb सह कसे काम करत आहोत ते येथे आहेः
- शाश्वतता शिक्षण सिरीज सादर करत आहोत: Airbnb ने संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, पर्यावरणासाठी जागतिक चॅम्पियन असलेले, जागतिक वन्यजीव फंड, जगातील आघाडीची संवर्धन संस्था आणि होस्ट्ससाठी शैक्षणिक कंटेंट तयार करण्यासाठी होस्ट सल्लागार मंडळाची शाश्वतता समिती यांच्यासोबत जवळून काम केले आहे. यामध्ये शाश्वत होस्ट बनण्यासाठी नवशिक्या मार्गदर्शक आणि तुमच्या गेस्ट्ससोबत शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी सल्ले यासारखे नवीन लेख समाविष्ट आहेत. आम्ही वर्षभर सिरीज वाढवत आहोत, त्यामुळे अधिक पर्यावरणपूरक होण्याच्या अधिक मार्गांसाठी संपर्कात रहा!
- इतर होस्ट्स कसे बदल घडवत आहेत ते शेअर करणे: तुम्ही कुठे राहता आणि तुमच्यासाठी काय उपलब्ध आहे यावर आधारित शाश्वततेच्या पद्धती खूप भिन्न असू शकतात. वेगवेगळ्या ठिकाणी आणि जागांमध्ये शाश्वत राहण्याचे होस्ट्सचे मार्ग दर्शविण्यासाठी, आम्ही जगभरातील पर्यावरणास अनुकूल होस्ट्सवर प्रकाश टाकू. सर्वप्रथम सुपरहोस्ट टिफनी आहे, जिचा हॉलीवूड बीच, कॅलिफोर्निया येथे बीच लॉज आहे.
- अक्षय ऊर्जा भागीदारी एक्सप्लोर करणे: होस्ट्सना अक्षय ऊर्जा अधिक सुलभ बनविण्यात मदत करण्यासाठी, Airbnb निवडक कम्युनिटीजमध्ये ग्रीन युटिलिटी कंपन्यांसोबत भागीदारी एक्सप्लोर करत आहे. Airbnb लवकरच अमेरिकेमध्ये एक पायलट प्रोग्राम सुरू करणार आहे आणि जर होस्ट्सना तो उपयुक्त वाटला तर आम्ही जागतिक होस्ट कम्युनिटीला अशाच ऑफर्स देण्यासाठी काम करू.
मला सांगायला आनंद होत आहे की, ही केवळ सुरुवात आहे! शाश्वतता समिती होस्ट्सना अधिक पर्यावरणपूरक बनवण्यात मदत करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यास उत्सुक आहे—आणि पैसेही वाचवण्यासाठी! आम्ही वर्षभर या विषयावर अधिक शेअर करू.
मला पर्यावरणाची इतकी काळजी का आहे
पेम्ब्रोकशायर, वेल्समधील समुद्राजवळ राहिल्याने एक नवीन उत्कटता निर्माण झाली आणि मला अधिक शाश्वत जीवनशैली तयार करण्याची प्रेरणा मिळाली. या प्रवासात इतर होस्ट्सना मदत करण्यास मला आनंद होत आहे. माझ्याबद्दल थोडे अधिकः
2017 मध्ये, मी आणि माझे कुटुंब जीवनशैलीत बदल शोधत होतो आणि आम्हाला खरोखरच Airbnb वर एक लिस्टिंग सेट अप करायची होती. मग हा सुंदर जुना फार्म बाजारात आला आणि आम्ही प्रेमात पडलो. सर्व इमारती 1650 पासूनच्या आहेत, त्यामुळे अशा मोहक आणि शांततेची भावना येथे आहे.
येथे केवळ अविश्वसनीय लँडस्केप आणि किनारपट्टी नाही. लोक खूप प्रेरणादायी आहेत—ते काय करतात त्याचा जमिनीशी फार संबंध आहे. हे संसर्गजन्य आहे! आमची स्थानिक कम्युनिटी गेस्टच्या अनुभवाचा अविभाज्य भाग आहे—आमच्या स्थानिक पातळीवर तयार केलेल्या साबणांपासून ते भिंती भरणार्या स्थानिक कलेपर्यंत!
आमच्याकडे दोन लिस्टिंग्ज आहेत. मी आणि माझी आई सर्व बदल आणि स्टाईल करतो. माझे वडील सर्व देखभालीचे करतात. आम्ही सर्व एक आहोत आणि हे एक टीमवर्क आहे. तुम्ही त्यात पूर्णपणे गुंतलेले आहात असे तुम्हाला वाटते आणि तुम्ही जिथे राहतो त्याबद्दलची तळमळ ओसंडून वाहते.
मी शाश्वततेकडे आमचा दृष्टीकोन एकत्र ठेवला आहे, जो आमच्या लिस्टिंगच्या वर्णनांमध्ये आहे. हे कॉटेजमध्ये देखील छापलेले आहे जेणेकरून लोक ते वाचू शकतील आणि आम्ही काय करतो याबद्दल जाणून घेऊ शकतील. आम्ही आमच्या लाकडी बर्नरला इंधन देण्यासाठी आमची स्वतःची शाश्वत झाडे देखील वाढवतो!
2019 मध्ये सुरू झालेल्या Airbnb UK कम्युनिटी बोर्डाच्या संस्थापक सदस्यांपैकी मी एक होते आणि मी अनेक UK होस्ट्स आणि Airbnb टीमसह शाश्वत होस्टिंग उपक्रमांचे नेतृत्व करते.
निसर्गाच्या सान्निध्यात राहणे हा एक अद्भुत प्रवास होता. मी ऋतू आणि समुद्राच्या तालाशी सुसंगत झाले आहे आणि आम्ही येथे करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत ते प्रतिबिंबित होते.
जेव्हा ते येथे राहतात तेव्हा बरेच लोक स्वतःशी आणि निसर्गाशी पुन्हा कनेक्ट होतात—कधीकधी मला क्युपिडसारखे वाटते कारण गेस्ट्स पेम्ब्रोकशायरच्या प्रेमात पडतात आणि परत येत राहतात!
होस्ट सल्लागार बोर्ड पुढील महिन्यात आमच्या बोर्डाच्या बैठकींमधून अधिक अपडेट्ससह परत येईल. यादरम्यान, मला आशा आहे की तुम्हाला नवीन शाश्वतता सिरीज उपयुक्त ठरेल!
चीअर्स! (किंवा आम्ही येथे वेल्समध्ये म्हणतो, ‘Iechyd da!’)
ॲना जोन्स
या लेखात दिलेल्या माहितीमध्ये पब्लिकेशननंतर कदाचित बदल झालेला असू शकेल.
हायलाइट्स
Airbnb आणि होस्ट सल्लागार बोर्ड होस्ट्सना अधिक शाश्वत होण्यास कशी मदत करत आहेत ते जाणून घ्या
सल्लागार बोर्डाच्या अॅना जोन्सनेही तिला पर्यावरणाची इतकी काळजी का आहे हे सांगितले
- 2021 मध्ये होस्ट सल्लागार बोर्डच्या प्रगतीबद्दल अपडेटेड रहा