दीर्घकाळ वास्तव्यासाठी पेआऊट्स कसे काम करतात

28 पेक्षा जास्त रात्रींच्या बुकिंग्जसाठी तुम्हाला पेमेंट असे मिळेल.
Airbnb यांच्याद्वारे 29 मार्च, 2022 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
5 एप्रि, 2022 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • जेव्हा एखादा गेस्ट 28 पेक्षा जास्त रात्रींसाठी वास्तव्य करतो, तेव्हा तुम्हाला हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.

  • हे कमी कालावधीच्या रिझर्व्हेशन्ससाठी असणाऱ्या पेमेंट शेड्यूलपेक्षा वेगळे आहे

    दीर्घ वास्तव्य उत्पन्नाचा एक स्थिर प्रवाह प्रदान करू शकते, विशेषत: जेव्हा गेस्ट्स सलग अनेक आठवडे किंवा महिने बुक करतात. तुम्हाला कमी कालावधीच्या वास्तव्याच्या होस्टिंगची सवय असल्यास, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की जास्त काळ वास्तव्यांसाठी—किंवा 28 पेक्षा जास्त रात्रींच्या रिझर्व्हेशन्ससाठी—पेमेंटची वेळ कमी कालावधीच्या वास्तव्यांपेक्षा वेगळी असते.

    मासिक हप्ते

    कमी कालावधीच्या वास्तव्यासाठी, गेस्टने तुमच्या जागेत चेक इन केल्यानंतर सुमारे 24 तासांनी आम्ही तुमचे पेमेंट पाठवतो, ज्याला आम्ही पेआऊट म्हणून संबोधतो. दीर्घकाळ वास्तव्यांसाठी, आम्ही तुमचे पेआऊट्स हप्त्यांमध्ये पाठवतो.

    हप्ते कसे काम करतात ते येथे आहे:

    • सुरुवातीचा पेआऊट: जेव्हा तुमचे गेस्ट बुक करतात, तेव्हा आम्ही त्यांच्याकडून वास्तव्याच्या पहिल्या 30 रात्रींसाठी शुल्क आकारतो आणि आम्ही ते पेमेंट त्यांच्या शेड्युल केलेल्या चेक इन वेळेनंतर 24 तासांनी तुम्हाला रिलीझ करतो
    • अतिरिक्त पेआऊट्स: उर्वरित रिझर्व्हेशनसाठी सुरुवातीच्या पेआऊटनंतर, त्यानंतरच्या रात्रींची पेमेंट्स दर महिन्याला (28 -31 दिवस) कलेक्ट करून तुम्हाला दिली जातात

    “उदाहरणार्थ, जर रिझर्व्हेशन 45 दिवसांसाठी असेल तर गेस्ट आल्यानंतर लगेचच तुम्हाला पहिल्या 30 दिवसांसाठी पैसे दिले जातात आणि उर्वरित 15 दिवसांसाठीचे पैसेगेस्टने चेक इन केल्यानंतर एक महिन्याने तुम्हाला मिळतात,” बर्कले, कॅलिफोर्निया येथील सुपरहोस्ट डेबोरा सांगतात.

    तुम्ही तुमच्या व्यवहारांच्या इतिहासामध्ये तुमच्या पेआऊट्सची स्थिती तपासू शकता.

    पेमेंट मिळवण्याबद्दल अधिक जाणून घ्या

    पेआऊटचे इतर तपशील

    तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे येण्यास नेमका किती वेळ लागतो हे तुम्ही निवडलेल्या पेआऊट पद्धतीवर आणि तुम्ही वापरत असलेल्या बँकेवर अवलंबून असते. आम्ही तुमची ओळख व्हेरिफाय करत असताना, पहिले रिझर्व्हेशन स्वीकारणाऱ्या नवीन होस्ट्सना त्यांचे पेमेंट मिळण्यास विलंब होऊ शकतो.

    तुम्ही पेआऊट्ससाठी किमान रक्कम सेट केली असल्यास, तुमची कमाई तिथे पोहोचेपर्यंत आम्ही तुमचे पैसे रिलीझ करणार नाही. तुमच्याकडे एकाच दिवशी चेक-इन्ससह एकापेक्षा जास्त लिस्टिंग्ज असल्यास, आम्ही सहसा एकाच पेआऊटद्वारे तुमचे पैसे पाठवतो.

    जेव्हा आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो, तेव्हा तुमच्या व्यवहारांच्या इतिहासामध्ये त्या पेआऊटचा लाईन आयटम आगामी पेआऊट्समधून पूर्ण झालेल्या पेआऊट्समध्ये जातो. या इतिहासाची तुलना तुमच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटशी करून, ते जुळतात हे तुम्ही सुनिश्चित करू शकता.

    दीर्घ वास्तव्यांसाठीच्या पेआऊट्सबद्दल अधिक जाणून घ्या

    हायलाइट्स

    • जेव्हा एखादा गेस्ट 28 पेक्षा जास्त रात्रींसाठी वास्तव्य करतो, तेव्हा तुम्हाला हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.

    • हे कमी कालावधीच्या रिझर्व्हेशन्ससाठी असणाऱ्या पेमेंट शेड्यूलपेक्षा वेगळे आहे

      Airbnb
      29 मार्च, 2022
      हे उपयुक्त ठरले का?