होस्टिंग करताना एक केनियाचे सुपरहोस्ट सर्वसमावेशकतेला कसे प्रोत्साहन देते

नैरोबीमधील एका होस्टला भेटा आणि सर्व गेस्ट्सना आपलेपणा वाटण्यासाठी तिच्या टिप्स मिळवा.
Airbnb यांच्याद्वारे 4 मार्च, 2021 रोजी
वाचण्यासाठी 6 मिनिटे लागतील
4 मार्च, 2021 रोजी अपडेट केले

8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आणि यावर्षीची थीम आहे #ChooseToChallenge, जी असमानतेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्यासाठी वचनबद्ध होण्यासाठी आपल्या सर्वांना प्रोत्साहित करते.

अमेरिका आणि कॅनडामध्ये, फेब्रुवारीमध्ये ब्लॅक हिस्ट्री महिना साजरा केला जातो आणि मार्चमध्ये महिला इतिहास महिना साजरा केला जातो, म्हणूनच ऐतिहासिक काळापासून असमानता आणि भेदभाव अनुभवलेल्या गटांना साजरे करण्यासाठी वर्षाच्या पहिल्या महिन्यांमध्ये अनेक संधी आहेत.

परंतु Airbnb मध्ये, महिलांच्या इतिहासाचा आणि ब्लॅक इतिहासाचा सन्मान करणे हे केवळ एका महिन्यात सुरू होत नाही आणि संपत नाही. महिलांचा इतिहास तसेच ब्लॅक इतिहास हा जागतिक इतिहास असून तो दररोज साजरा करणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. त्याच मनःस्थितीतून, आम्ही नैरोबी, केनिया येथील एका ब्लॅक सुपरहोस्टशी जगभरातील लोकांना होस्ट करण्याच्या तिच्या अनुभवाबद्दल बोललो आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तिचा सल्ला घेतला.

नैरोबी, केनिया येथील सुपरहोस्ट ज्युलिएट यांनी सांगितले की प्रवास करताना तिला चार वेगवेगळ्या एअरपोर्ट्सवर भेदभावाचा अनुभव आला आहे. “माझ्याकडे प्रवासाची सर्व वैध कागदपत्रे असूनही मला विशेषतः निवडून फ्रिस्क करण्यात आले,” त्या म्हणतात. “या अनुभवांनी मला शहाणे केले आणि विविध संस्कृतींशी संबंधांच्या माझ्या प्रवासात मी करुणा, उबदारपणा, सहानुभूती दाखवली पाहिजे याची शिकवण दिली.

प्रवास करताना ब्लॅक कम्युनिटीला दीर्घकाळापासून भेदभावाचा सामना करावा लागला आहे, परंतु हीच कम्युनिटी त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित आणि स्वागतार्ह करण्यात मदत करण्यासाठी एकत्र आली आहे. Airbnb मध्ये, आम्हाला बर्‍याच काळापासून असे वाटत आले आहे की प्रवास आणि त्यातून तयार झालेले संबंध हे पक्षपातीपणावर मात करण्याचे आणि पूर्वग्रहांचे उच्चाटन करण्याचे काही उत्तम मार्ग दाखवतात आणि एक-एक करून या अडथळ्यांवर मात करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.

होस्टचा प्रवास

ज्युलिएट केनिया होस्ट ग्रुपची होस्ट कम्युनिटी लीडर आहेत, याचा अर्थ असा की त्या ग्रुपचे नेतृत्व करण्यासाठी स्वयंसेवक तसेच सहकारी होस्ट्ससाठी मिटिंग्स करतात. होस्ट होण्यापूर्वी, त्या 20 वर्षांहून अधिक काळ कॉर्पोरेट बिझनेस स्ट्रॅटेजी कन्सल्टंट होत्या. ऑगस्ट 2014 मध्ये लवकर सेवानिवृत्ती घेतल्यानंतर, त्यांने दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन येथे प्रवास केला आणि Airbnb वर घर बुक केले. त्या अनुभवानंतर, त्यांना होस्टिंगच्या संभाव्यतेबद्दल उत्सुकता होती.

“मी ताबडतोब घरी गेले, माझ्या घराचे नूतनीकरण केले आणि निर्णय घेतला की मला माझे घर Airbnb वर लिस्ट करायचे आहे,” ज्युलिएट आम्हाला सांगतात. पण जानेवारी 2015 मध्ये त्यांने अधिकृतपणे त्यांची लिस्टिंग प्रकाशित करण्यापूर्वी, त्या अनिश्चित होत्या. “मी बऱ्याच वेळा माझा विचार बदलला … परंतु पामेल्ला, होस्ट ॲम्बेसेडर, मला ते करून पाहण्याचे पटवून देत होत्या.”

ज्युलिएट म्हणतात की आता उपलब्ध असलेली शैक्षणिक संसाधने, जसे की होस्ट मीटअप्स आणि सोशल मीडियावरील ग्रुप्स, यांनी होस्ट करणे आणखी सोपे केले आहे. त्या वेळी, त्यांने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि प्रोसेसद्वारे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पामेल्ला सारख्या सहकारी होस्ट्सशी थेट भेट करण्यावर अवलंबून होते.

सहकुटुंब सहपरिवार

ज्युलियेट यांनी त्यांच्या कुटुंबाचे घर Airbnb वर लिस्ट केले आहे. “मी माझ्या मुलांना याच घरात वाढवले,” त्या म्हणतात. “मला त्या घराचा प्रत्येक युनिक भाग माहीत आहे, कुठे उबदार असते आणि कुठे थोडे थंड असते.” आता, त्या आनंदाने त्यांच्या जागेमध्ये इतर कुटुंबांच्या नवीन पिढ्यांचे स्वागत करतात.

“नवजात अर्भके आणि बाळे असलेल्या कुटुंबांसाठी त्यांचे स्वागत करणारे घर प्रदान केल्याचा मला विशेष अभिमान आहे,” ज्युलिएट म्हणतात. त्याशिवाय, त्या त्यांच्या 20 वर्षांच्या मुलाला उद्योजकतेबद्दल शिकवत आहेत, त्यांचा को-होस्ट म्हणून त्याच्याशी भागीदारी करून.

सर्वसमावेशकतेची सुरुवात तुमच्या होस्टिंग शैलीपासून होते

ज्युलिएटना अनेक वर्षांच्या अनुभवातून होस्टिंगबद्दल काही गोष्टी समजल्या आहेत आणि गेस्ट्सचे स्वागत करताना त्या नेहमी माहिती घेऊन ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात. सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या मुख्य सूचना येथे आहेत:

  • होस्ट ग्रुपमध्ये सहभागी व्हा . “एकट्यानेच प्रयत्न करू नका,” ज्युलिएट म्हणतात. “तुमच्या प्रवासात तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या साशंकतेच्या पलीकडे नेण्यासाठी पूर्वी तुमच्यासारख्याच स्थितीत असलेले होस्ट्सचे एक नेटवर्क आहे. होस्ट करणे हे खूप पूर्वी होते, त्यापेक्षा खूपच सोपे आहे.”
  • स्वत: संशोधन करा. “तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करा,” ज्युलिएट म्हणतात. “Airbnb तुमच्यासाठी ही माहिती प्रदान करते, पण इतरही बरीच संसाधने उपलब्ध आहेत. “आता पूर्वीपेक्षा बरेच काही उपलब्ध आहे.”
  • तुमची होस्टिंगची शैली विकसित करा. जेव्हा तुम्ही होस्टिंग सुरू करता तेव्हा तुम्ही कोणत्या मार्गाने जात आहात, याची जाणीव होते. “तुम्ही Airbnb मध्ये काय साध्य करू इच्छिता, ते निश्चित करा,” असे ज्युलिएट सुचवतात. “तुम्ही गेस्ट असता तर तुम्हाला कशी वागणूक दिलेली आवडली असती? तुमची खासियत काय आहे? तुम्ही काय वेगळे करू शकता? गेस्ट्सनी तुमची कशी आठवण ठेवावी? एक योजना तयार करा.
  • तुमच्या कम्युनिटीला परतफेड करा. जर तुम्ही इतरांना मदत करत असाल तर तुम्ही सर्वसमावेशक आणि गुंतलेले असण्याची अधिक शक्यता आहे. “तुम्ही स्वत:ला होस्ट म्हणून प्रस्थापित केले आणि तुमचे वेगळे स्थान विकसित केले की इतर होस्ट्सना काहीतरी परत देण्याचे आणि त्यांना सपोर्ट करण्याचेमार्ग शोधा,” ज्युलिएट म्हणतात. “मी सध्या होस्टिंगसाठी महिलांना सपोर्ट करते.
  • सुरक्षिततेला प्राधान्य द्या. “एक कृष्णवर्णीय स्त्री म्हणून मला सुरक्षित वाटणे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे,” ज्युलिएट म्हणतात. “तुमच्या गेस्ट्ससह विश्वास विकसित करा—त्यांचे संरक्षण करण्याच्या तुमच्या क्षमतेसाठी ते महत्त्वपूर्ण आहे.” ज्युलिएट गेस्ट्सना त्यांच्या भागातील वाहतुकीतून नेव्हिगेट करण्यातसुद्धा मदत करतात. “मला माहीत आहे की एकट्याने किंवा अगदी इतरांसह नवीन ठिकाणी प्रवास करणे हा एक भीतीदायक अनुभव असू शकतो,” त्या म्हणतात. “शहर, माझे घर आणि गेस्ट्स यांच्याविषयीचे माझे ज्ञान शक्य तितका सुरक्षित अनुभव तयार करण्यासाठी मी वापरते.

एक अशी जागा जिथे सर्वांबद्दल आपलेपणा आहे

जगभरातील गेस्ट्सचे नियमितपणे स्वागत करणारे ब्लॅक होस्ट म्हणून, ज्युलिएटला सर्वसमावेशकता आणि आपलेपणाची भावना वाढविणे किती महत्त्वाचे आहे हे माहित आहे. त्यांने होस्टिंग सुरू केल्यापासून गेल्या सहा वर्षांत, त्यांच्या गेस्ट्सचे कसे स्वागत करावे याबद्दल त्या बरेच काही शिकल्या आहेत. येथे त्यांच्या शीर्ष होस्टिंग टिप्स आहेत: 

  • तुमच्या लिस्टिंगच्या माध्यमातून तुमची कहाणी सांगा. तुम्हाला आणि तुमच्या लिस्टिंगला युनिक बनवणाऱ्या गोष्टी ओळखा आणि तुमच्या होस्ट प्रोफाईल आणि लिस्टिंगमध्ये ते शेअर करा. "तुम्हाला आणि तुमच्या लिस्टिंगला विशेष बनवणाऱ्या सर्व तपशीलांचा समावेश करा आणि ते काय अपेक्षा करू शकतात याबद्दल स्पष्ट रहा,” ज्युलिएट म्हणतात. “तुमच्याशी संपर्क साधण्याचा हा आणखी एक मार्ग आहे.”
  • तात्काळ बुकिंग चालू करा. ज्युलिएटसाठी त्यांच्या सर्व गेस्ट्सना समान वागणूक देणे महत्वाचे आहे, जे तात्काळ बुकिंग चालू करण्याचे निवडून सुरू होते. बुकिंग पूर्ण होईपर्यंत होस्ट्स प्रोफाईल फोटो अ‍ॅक्सेस करू शकत नसले तरी, भेदभाव बहुतेक वेळा समजुतीवर आधारित असतो—आणि लोक पहिल्या नावांसारख्या गोष्टींमधून एखाद्याच्या जातीबद्दल समज करून घेऊ शकतात. तात्काळ बुकिंग बुकिंगच्या प्रोसेसमधून ते व्हेरिएबल्स काढून टाकते.
  • लवकर आणि वारंवार संवाद साधा. “गेस्टना काय हवे आहे, मी काय अपेक्षा करू शकते, ते कोणत्या वेळी येत आहेत, मी त्यांच्यासाठी काय करू शकते आणि त्यांचा अनुभव कसा चांगला बनवू शकते, असे विचारून मी सहसा प्रोसेस सुरू करेन,” ज्युलिएट म्हणतात. त्यांची सुविधा सूची बाकी सर्व सांभाळून घेते. “मी त्यांना माझी जागा नेव्हिगेट करण्यात आणि सरप्राईजेस टाळण्यात मदत करण्यासाठी एक मॅन्युअल देखील देते. अतिसंवादामुळे अनेक प्रश्न सुटू शकतात.”
  • त्यांचे व्यक्तिगत स्वागत आहे. “मी प्रत्येक गेस्टला खास व्यक्ती म्हणून पाहते,” ज्युलिएट म्हणतात. “मी प्रत्येक गेस्टच्या नावाचे टॅग समाविष्ट करते आणि प्रत्येक गेस्टला वैयक्तिकृत वागणूक देते. मी माझ्या गेस्ट्सचे वैयक्तिकरित्या स्वागत करेल याचा मी प्रयत्न करते, केवळ मी आसपास नसल्यास तसे होत नाही.” सर्व गेस्ट्सना समान स्वागतार्ह वागणूक दिल्याने पक्षपात मर्यादित करण्यात, आपलेपणाला प्रोत्साहन देण्यात आणि प्रत्येकाला आरामदायक वाटेल याची खात्री करण्यात मदत होऊ शकते.  
  • गेस्ट्सच्या गरजांकडे लक्ष द्या. “मी सर्व संस्कृती आणि बॅकग्राऊंड्समधील गेस्ट्सना होस्ट करते आणि त्या सर्वांच्या वेगवेगळ्या गरजा, अपेक्षा आणि अनुभव आहेत,” ज्युलिएट म्हणतात. “ते जे काही बोलतात ते मी ऐकते आणि मला एखादी गोष्ट न कळल्यास अतिरिक्त प्रश्न विचारते.” उदाहरणार्थ, त्या बऱ्याचदा केनियाच्या प्रवाश्यांना होस्ट करतात, जे इतर देशांमध्ये राहतात आणि घरी भेट देण्यासाठी परत आले असतात. “नैरोबीशी पुन्हा परिचित होण्यासाठी मी त्यांना सहसा मदत करते,” त्या म्हणतात.  

सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणखी संसाधने

होस्ट म्हणून, तुम्हाला माहीत आहे की तुमच्या स्वतःच्या अंतर्निहित पक्षपातीपणाचा सामना करणे आणि तो नष्ट करणे किती महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या सर्व गेस्ट्सना एकाच प्रकारचे आदरातिथ्य पुरवणे सुरू ठेवू शकता, उदाहरणार्थ ते कोण आहेत, ते कुठून आले आहेत किंवा ते कसे दिसतात याचा विचार न करता;

म्हणून आम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये अ‍ॅक्टिव्हिझमला आणि सहयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या सततच्या प्रवासात उपयुक्त वाटलेली काही संसाधने शेअर करू इच्छितो.

आम्हाला सर्वसमावेशकतेबद्दलचे संभाषण सुरू ठेवायचे आहे, म्हणून आम्ही आशा करतो की तुम्ही Airbnb वर होस्टिंग करण्याच्या तुमच्या स्वतःच्या अनुभवांबद्दल तसेच ज्या संसाधनांमुळे आणि टिप्समुळे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी आपुलकीची जागा तयार करण्यात सर्वात जास्त मदत झाली आहे, त्यांच्याबद्दल आमच्या कम्युनिटी सेंटरमध्ये पोस्ट कराल.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.
Airbnb
4 मार्च, 2021
हे उपयुक्त ठरले का?

तुम्हाला हे पण आवडेल