मासिक गेस्ट्ससाठी केलेल्या अपग्रेड्सचा होस्ट्सना कसा लाभ मिळू शकतो

नवीन सर्च टूल्स आणि पेमेंट पर्याय अधिक गेस्ट्सना जास्त काळ ट्रिप्स बुक करण्यात मदत करू शकतात.
Airbnb यांच्याद्वारे 30 मे, 2023 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
3 एप्रि, 2025 रोजी अपडेट केले

जगभरातील प्रवासी अधिक लांबीच्या ट्रिप्स करण्यासाठी Airbnb वापरत आहेत. बुक झालेल्या पाच रात्रींपैकी सुमारे एक रात्र 28 रात्री किंवा त्याहून अधिक कालावधीच्या वास्तव्याचा भाग आहे.* नवीनतम वैशिष्ट्ये गेस्ट्सना मासिक वास्तव्ये शोधणे आणि बुक करणे सुलभ करतात.

सर्च आणि बुकिंग वैशिष्ट्ये

Airbnb 2023 समर रिलीजचा भाग म्हणून घोषित केलेल्या अपग्रेड्समध्ये हे समाविष्ट आहेः

  • सुधारित मासिक शोध. मासिक टॅबमुळे दीर्घकालीन वास्तव्यांसाठी उपलब्ध लिस्टिंग्ज शोधणे सोपे होते. गेस्ट त्यांची सुरुवातीची तारीख बदलू शकतात, त्यानंतर डायलवर त्यांच्या ट्रिपचा कालावधी एक ते 12 महिन्यांपर्यंत निवडू शकतात.
  • सर्चमध्ये लिस्टिंग हायलाईट्स. जलद वायफाय, एक स्वतंत्र वर्कस्पेस, ईव्ही चार्जर आणि मुलांसाठी अनुकूल आयटम्स (क्रिब्स, उंच खुर्च्या, खेळणी इ.) सारख्या मुख्य सुविधा सर्च रिझल्ट्समध्ये तुमच्या लिस्टिंग शीर्षकाच्या खाली दिसतात.
  • कमी सेवा शुल्क. आम्ही अधिक लांबीच्या ट्रिप्स बुक करणार्‍यांसाठी, त्यांच्या वास्तव्याच्या चौथ्या महिन्यापासून, आमच्या गेस्ट सेवा शुल्कामध्ये कपात करत आहोत.
  • मासिक पेमेंट शेड्युल. बुकिंग करताना, गेस्ट दीर्घ वास्तव्याच्या पहिल्या 30 रात्रींसाठी पेमेंट करतात आणि त्यानंतर उर्वरित रक्कम मासिक हप्त्यांमध्ये भरतात. चेक आऊटच्या वेळी, त्यांना हप्त्याच्या तारखा आणि देय रकमा दाखवणारे शेड्युल मिळते, जेणेकरून ते त्यांच्या ट्रिपच्या खर्चाची योजना आखू शकतात.
  • बँकेद्वारे पेमेंट करताना सवलती. अमेरिकन रहिवासी लिंक केलेल्या अमेरिकन बँक खात्यातून पेमेंट करताना 28 किंवा त्याहून अधिक रात्रींच्या जगभरातील वास्तव्यांवर सवलत मिळवू शकतात. चेक इनच्या किमान सात दिवस आधी बुकिंग पूर्ण करणे आवश्यक आहे.

नवीन वैशिष्ट्यांचा होस्टच्या कमाईवर परिणाम होत नाही किंवा दीर्घकालीन वास्तव्यांसाठीच्या पेआऊट शेड्युलमध्ये बदल होत नाही.

लिस्टिंग पेजेसवरील हायलाईट्स

तुम्ही तुमच्या सध्याच्या सर्व सुविधांचा समावेश करण्यासाठी मासिक सवलत सेट करून आणि तुमची लिस्टिंग अपडेट करून गेस्ट्सना बुक करण्यासाठी प्रोत्साहित करू शकता. लिस्टिंग पेजेसच्या वरच्या भागात दीर्घकालीन वास्तव्यांसाठी लोकप्रिय असलेल्या सुविधा आपोआप हायलाईट होतात.

उदाहरणार्थ, सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये तीन महिन्यांसाठी वास्तव्य शोधत असलेल्या गेस्टना पुढील माहिती ठळकपणे दाखवणारी लिस्टिंग सापडेलः

  • मासिक हप्त्यांमध्ये पैसे द्या. तुम्ही मासिक हप्त्यांमध्ये पैसे द्याल.
  • रिमोट वर्कसाठी उत्तम. 350 एमबीपीएसचे जलद वायफाय, तसेच एक स्वतंत्र वर्कस्पेस.
  • दैनंदिन जीवनातील सुविधा. होस्टने ही जागा दीर्घकाळ वास्तव्यांसाठी सुसज्ज केली आहे—स्वयंपाकघर, वॉशर, ड्रायर आणि विनामूल्य पार्किंगसह.

तुम्ही नवीन होस्ट असल्यास आणि तुम्हाला दीर्घ वास्तव्यांसाठी वैयक्तिकरित्या मदत हवी असल्यास, येथे क्लिक करा आणि आम्ही मदतीसाठी तुम्हाला एका सुपरहोस्ट ॲम्बेसेडरशी जोडून देऊ.

*Airbnb च्या अंतर्गत जागतिक डेटानुसार, 2022 मध्ये बुक झालेल्या रात्रींपैकी 21% बुकिंग हे 28 किंवा त्याहून अधिक रात्रींच्या वास्तव्यांसाठी होते आणि 2023 च्या पहिल्या तीन महिन्यांत ते 18% होते.

पब्लिश केल्यानंतर या लेखातील माहितीमध्ये बदल झालेला असू शकतो.

Airbnb
30 मे, 2023
हे उपयुक्त ठरले का?