तुमची अनुभव लिस्टिंग बुकिंगसाठी तयार करणे
तुमच्या Airbnb अनुभवाला मंजुरी मिळाल्याबद्दल अभिनंदन! तुमची लिस्टिंग पब्लिश केल्यानंतर, तुम्ही तुमच्या पहिल्या गेस्ट्सना आकर्षित करण्यासाठी करू शकता अशा दोन गोष्टी येथे दिल्या आहेत.
तुमचे कॅलेंडर उघडा
तुम्हाला तुमचे कॅलेंडर सेट अप करावे लागेल जेणेकरून गेस्ट्स हा अनुभव बुक करू शकतील. ॲक्टिव्हिटीचा कालावधी, तुमची उपलब्धता आणि तुमच्या बिझनेसच्या उद्दिष्टांच्या आधारे, तुम्ही ॲक्टिव्हिटी किती वेळा ऑफर कराल हे ठरवा.
सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला ज्या दिवशी होस्ट करायचे आहे तो दिवस निवडा आणि अनुभव शेड्युल करा वर टॅप करा. वेळ, बुकिंगचा प्रकार, भाडे, ग्रुपचा आकार आणि इतर तपशील निवडा. आठवड्यातून किमान एका वीकेंडच्या दिवसासह, दरमहा 10 किंवा त्याहून अधिक वेळा ॲक्टिव्हिटी ऑफर केल्याने गेस्ट्सना त्यांच्या गरजा पूर्ण करणारी तारीख आणि वेळ शोधण्यात मदत होऊ शकते.
बुकिंग मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी बरेच होस्ट्स दोन महिन्यांपर्यंतची उपलब्धता जोडतात. तुम्ही दररोज ऑफर करत असलेला अनुभव 60 दिवसांपर्यंत अगोदर आणि आठवड्यातून एकदा ऑफर करत असलेला अनुभव 52 आठवड्यांपर्यंत अगोदर शेड्युल करू शकता.
कॅन्सलेशन्स टाळण्यासाठी, तुम्ही होस्ट करू शकत नाही अशा कोणत्याही तारखा ब्लॉक करण्याचे लक्षात ठेवा. तुम्ही पूर्वतयारी करण्यासाठी किंवा साफसफाईसाठी ॲक्टिव्हिटीच्या आधीचा आणि नंतरचा वेळदेखील ब्लॉक करू शकता.
स्पर्धात्मक भाडे सेट करा
Airbnb अनुभव बुक करताना अनेक गेस्ट्स भाड्याचा विचार करतात. स्पर्धात्मक भाडे सेट केल्याने तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यास मदत होऊ शकते.
सर्वप्रथम तुम्हाला तुमचा खर्च कव्हर करण्यासाठी किती पैसे लागतात याचा विचार करा. त्यानंतर, तुम्हाला कदाचित असे आढळेल की प्रति व्यक्ती कमी भाडे ऑफर केल्याने अधिक गेस्ट्स आकर्षित होऊ शकतात आणि जास्त कमाई होऊ शकते. उदाहरणार्थ:
- 4 गेस्ट्सनी प्रत्येकी $75 USD ला बुक केले = $300 USD
- 8 गेस्ट्सनी प्रत्येकी $60 USD ला बुक केले = $480 USD
तुमच्या पहिल्या गेस्ट्सना आकर्षित करण्यात आणि लवकर रिव्ह्यूज मिळवण्यात मदत करण्यासाठी तुम्ही एक नवीन अनुभव प्रमोशनदेखील तयार करू शकता. प्रमोशन म्हणजे तुमच्या भाड्यावर 30 दिवसांसाठी 5% ते 50% सवलत देण्याची संधी आहे.
तुम्ही किमान 20% सवलत निवडल्यास, Airbnb सर्च रिझल्ट्समध्ये तुमचे सवलत दिलेले भाडे तुमच्या मूळ भाड्याच्या बाजूला दाखवले जाईल, ज्यावर काट मारलेली असते. ऑफर संपल्यावर, अनुभवासाठी पुन्हा तुमचे मूळ भाडे दाखवले जाईल.
प्रमोशन तयार करण्यासाठी:
- तुमची लिस्टिंग वर जा आणि बदल करा वर टॅप करा
- भाडे सेटिंग्ज वर जा आणि सवलती वर टॅप करा
- विशेष ऑफर्स अंतर्गत, नवीन अनुभव प्रमोशन वर जा आणि ऑफर तयार करा वर टॅप करा
तुमची भाडी आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगवेगळे असू शकतात.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.