Airbnb होस्ट्ससाठी आयोजित Q&A मध्ये भेदभावावर चर्चा करणे

होस्ट्स पक्षपात ओळखणे आणि कम्युनिटीला बळकट करणे याबद्दल विविध दृष्टीकोन शेअर करतात.
Airbnb यांच्याद्वारे 1 एप्रि, 2019 रोजी
7 मिनिटांचा व्हिडिओ
1 एप्रि, 2019 रोजी अपडेट केले

Airbnb मध्ये, आम्ही आमच्या होस्ट्सशी त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या समस्यांवर चर्चा करणे सुरू ठेवण्यासाठी नियमितपणे संवाद साधतो. आम्ही लोकेशन रेटिंग्जवर चर्चा करत असू किंवा होस्टच्या रिव्ह्यूवर चर्चा करत असू, या सर्व सत्रांमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत - या चर्चा प्रामाणिकपणे, मोकळेपणाने होतात आणि कठीण विषयांवर यामध्ये बोलले जाते.

होस्ट कम्युनिटीचे विविध दृष्टीकोन ओळखणे

ऑक्टोबर 2018 मध्ये, Airbnb ने गेस्ट प्रोफाइल फोटो कसे प्रदर्शित केले जातात त्याची पद्धत बदलली ज्यामुळे बुकिंग प्रक्रियेदरम्यान अधिक वस्तुनिष्ठ निर्णय घेता यावेत. आता, बुकिंग कन्फर्म झाल्यानंतरच गेस्टचे प्रोफाइल फोटो दाखवले जातात.

एप्रिल 2019 मध्ये लंडनमध्ये होस्ट Q&A सत्रात, होस्ट्सनी या बदलांच्या प्रभावावर चर्चा केली, ज्यामुळे पक्षपातीपणा आणि भेदभाव याबद्दल विचारपूर्वक चर्चा झाली. कळत-नकळत, आपल्या सर्वांना काही सामाजिक ग्रुप्स आणि लोकांबद्दल काही विचार आणि पूर्वकल्पना असतात. आणि आपण जितके मोकळे मन ठेवण्याचा प्रयत्न करतो तितकाच, हा पूर्वग्रह अनेकदा-कळत नकळत-आपल्याला इतरांवर परिणाम करणारे निर्णय घेण्यास प्रवृत्त करतो.

काही होस्ट्सनी या अपडेटबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांच्या गेस्ट्सबद्दल माहिती प्रदान करण्यात फोटो महत्वाची भूमिका बजावू शकतात या भूमिकेवर जोर दिला. पण डेनिससारख्या इतर अनेकांनी या अपडेटची प्रशंसा केली असून फोटो पाहूनही भेदभाव केला जाऊ शकतो, असे म्हटले आहे.

डेनिस म्हणतात, "अनेक पाहुणे माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘मी तुम्हाला [माझे होस्ट होण्यासाठी] निवडण्याचे कारण हे आहे की मला माहित आहे की मी जसा आहे त्यामुळे मला नाकारले जाणार नाही."

लॉरा चेंबर्स, ज्या त्यावेळी Airbnb च्या महाव्यवस्थापक होत्या, त्यांनी भेदभावाविषयी संभाषणे जटिल आणि आव्हानात्मक आहेत, परंतु ते आवश्यक देखील आहेत हे मान्य करून चर्चा बंद केली. भेदभावाबद्दल बोलणे कठीण असू शकते, परंतु आपण त्याच्याशी लढा देण्यापूर्वी आपल्याला एकत्र त्याचा सामना करावा लागेल.

Airbnb वर गेस्ट प्रोफाईल फोटो कसे काम करतात हे समजून घेणे

आपल्या सर्वांच्याच मनात पक्षपात असतो. परंतु Airbnb सारख्या कंपन्या लोकांना पक्षपाती निर्णय घेण्यापासून रोखण्यासाठी साधने तयार करण्यात मदत करू शकतात - म्हणूनच आम्ही बुकिंग प्रक्रियेदरम्यान गेस्ट प्रोफाइल फोटो कसे दाखवायचे याचा पुनर्विचार करण्यासाठी आम्ही 2016 मध्ये वचनबद्धता व्यक्त केली होती. आता बुकिंग कन्फर्म होईपर्यंत गेस्ट्सचे प्रोफाइल फोटो होस्ट्सना दाखवले जात नाहीत, ज्यामुळे होस्ट्स अधिक वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकतात.

होस्ट्स आणि गेस्ट्ससोबत अनेकवेळा चर्चा केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. बहुतेक गेस्ट्स फोटो देतात, तर काहींनी आम्हाला सांगितले की बुकिंग करताना त्यांना स्वतःचा फोटो शेअर करू इच्छित नाहीत. आमच्या भेदभाव-विरोधी धोरणाच्या उल्लंघनामध्ये फोटोंचा गैरवापर होण्याच्या शक्यतेबद्दलच्या त्यांच्या चिंता आम्ही ओळखतो.

त्याच वेळी, होस्ट्सनी आम्हाला सांगितले आहे की त्यांच्यासाठी प्रोफाइल फोटो महत्त्व आहे कारण ते ट्रिप सुरू होण्यापूर्वी होस्ट्स आणि गेस्ट्सना एकमेकांना जाणून घेण्यास मदत करू शकतात आणि चेक इन केल्यावर गेस्ट्सना ओळखण्यात मदत करू शकतात. याव्यतिरिक्त, आम्ही पाहिले आहे की फोटो विश्वास वाढविण्यासाठी आणि कम्युनिटीला प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त साधन असू शकते.

होस्ट्स आणि गेस्ट्स दोघांच्याही गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही आजचे धोरण तयार केले आहे. आमचे ध्येय सोपे आहे: एक असे जग निर्माण करायचे आहे जिथे प्रत्येकाला सर्वत्र आपलेपणा वाटू शकेल. होस्ट्सने बुकिंग स्वीकारल्यानंतर त्यांना गेस्टचा फोटो दाखवणे हा ते नाजूक संतुलन बनवून ठेवण्यासाठीचा आमचा मार्ग आहे. या बदलांविषयी अधिक जाणून घ्या

तुमच्यासारख्या होस्ट्सना या प्रक्रियेमध्ये अधिक नियंत्रण देण्यासाठी आणि ट्रिपपूर्वी गेस्ट्ससोबत विश्वास निर्माण करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्ही हे करू शकता:

भेदभाव कमी करण्याच्या या प्रयत्नांमुळे होस्ट्सना सक्षम बनवण्यातही मदत होऊ शकते. आम्ही एक टूलकिट देखील तयार केले आहे जे विविध प्रकारचे पूर्वग्रह आणि स्टिरियोटाइप, ते Airbnb वरील कम्युनिटी सदस्याच्या अनुभवावर कसा प्रभाव टाकू शकतात आणि ते टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे स्पष्ट करते.

परंतु अजून बरेच काम बाकी आहे आणि आम्हाला माहित आहे की ही अनेक महत्त्वाच्या चर्चेंपैकी एक आहे. आम्ही सर्व पार्श्वभूमीच्या लोकांना सुरक्षित, आदर आणि आनंदी वाटण्यास मदत कशी करू शकतो हे समजून घेण्यासाठी आम्ही होस्ट्सशी बोलणे सुरू ठेवू.

Airbnb
1 एप्रि, 2019
हे उपयुक्त ठरले का?

तुम्हाला हे पण आवडेल