तुम्ही रिझर्व्हेशन्सची पुष्टी कशी कराल हे ठरवणे
तुम्ही Airbnb वर गेस्ट रिझर्व्हेशन्स स्वीकारण्यासाठी दोनपैकी कोणताही एका प्रकार वापरू शकता: तात्काळ बुकिंग वापरून ऑटोमॅटिक पध्दतीने, किंवा तुमच्या इनबॉक्समध्ये दिसणाऱ्या बुकिंगच्या विनंत्यांना स्वत: प्रतिसाद देऊन. बर्याच गेस्टसना तात्काळ बुकिंग सोयीस्कर वाटते आणि आवडते, ज्यामुळे होस्ट्सचा वेळही वाचतो आणि अधिक बुकिंग्ज देखील मिळू शकतात.
तात्काळ बुकिंग म्हणजे काय?
तात्काळ बुकिंग एक असे सेटिंग आहे ज्यामुळे गेस्ट्स तुमच्या कॅलेंडरवरील उपलब्ध तारखांसाठी तुमची जागा त्वरित बुक करू शकतात. तुम्हाला बुकिंगची प्रत्येक विनंती एक-एक करून रिव्ह्यू करण्याची आणि स्वीकारण्याची गरज नाही.
सर्व गेस्ट्सनी तुमच्या घराच्या नियमांना सहमती देणे आणि बुकिंग केल्यावर Airbnb च्या आवश्यकता पूर्ण करणे गरजेचे आहे. तुमची लिस्टिंग पब्लिश केल्यानंतर, तुम्ही अशा काही सेटिंग्ज जोडू शकता ज्यामुळे गेस्टसना पुढील अटींची पूर्तता करावी लागेल:
Airbnb वर गेस्टचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असायला हवा आणि त्यांना मिळालेले रिव्ह्यूज तीन स्टार्सपेक्षा कमी नसावे आणि कस्टमर सपोर्टकडे त्यांच्याविरुध्द कोणतीही तक्रार नोंदवली गेली नसावी
तुम्ही तयार केलेला ऑटोमेटेड प्री-बुकिंग मेसेज वाचून, त्याला गेस्ट्सनी प्रतिसाद द्यावा
बुकिंगच्या विनंत्या कशा काम करतात?
बुकिंग विनंत्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचा Airbnb इनबॉक्स वापरून तुमचे गेस्ट रिझर्व्हेशन्स मॅन्युअल पध्दतीने मॅनेज करू शकता. एखाद्या गेस्टने बुकिंगची विनंती पाठवल्यानंतर, तुमच्याकडे त्या विनंतीची मुदत संपण्यापूर्वी ती स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी 24 तासांचा कालवधी असतो. तुम्हाला विनंत्या शक्य तितक्या लवकर मिळतील याची खात्री करण्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन्स सेट करू शकता.
एखाद्या गेस्टने बुकिंगची विनंती केल्यावर, भविष्यात विनंत्यांची सरमिसळ रोखण्यासाठी, तुमच्या कॅलेंडरवर तारखा आपोआप ब्लॉक केल्या जातात. तुम्ही बुकिंगची विनंती स्वीकारल्यास किंवा तिची मुदत संपल्यास त्या तारखा ब्लॉक राहतात, त्यामुळे प्रत्येक विनंतीला त्वरित प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे.
तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे?
तुम्हाला बुकिंग्ज कसे मिळावेत हे ठरवताना तुम्ही काही गोष्टींचा विचार करायला हवा:
तात्काळ बुकिंग
गेस्ट्सना रिझर्व्हेशन्स त्वरित कन्फर्म झालेले आवडते, ज्यामुळे अधिक बुकिंग्ज मिळू शकतात
तात्काळ बुकिंग तुम्ही सेट केलेल्या निकषांच्या आधारे तुमच्यासाठी बुकिंग्ज स्वीकारते
तुम्हाला तुमचे कॅलेंडर अपडेट करत राहावे लागेल आणि तुम्ही वापरत असलेल्या इतर कॅलेंडरसह सिंक करावे लागेल
बुकिंगच्या विनंत्या
गेस्ट्सना लवकर प्रतिसाद मिळणे आवडते, म्हणूनच जर तुम्हाला सामान्यपणे झटपट म्हणजे नेहमीच 24 तासांच्या आत प्रतिसाद देण्याची सवय असेल तरच हा पर्याय वापरा
बुकिंग विनंत्यांमुळे तुम्हाला तुमच्या जागेचे विशेष नियम किंवा वैशिष्ट्यांविषयी अधिक तपशीलवार माहिती देता येते, जसे की एकमेव प्रवेशद्वाराकडे घेऊन जाणार्या उभी चढण असलेल्या पायऱ्या
Airbnb च्या भेदभाव-विरोधी धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कारणामुळे तुम्ही बुकिंग विनंत्या नाकारू शकत नाही
कॅन्सलेशन टाळता येऊ शकेल अशा परिस्थितीत गेस्ट्सचे बुकिंग कॅन्सल केल्याने शुल्क आकारले जाणे आणि इतर परिणाम होऊ शकतात, म्हणूनच कॅन्सल करणे टाळण्यात तुम्हाला मदत करेल अशी पद्धत निवडा. तुम्ही तुमच्या बुकिंगच्या सेटिंग्जमध्ये तुमची निवड कधीही अपडेट करू शकता.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.