हा कंटेंट तुम्ही निवडलेल्या भाषेत उपलब्ध नाही, म्हणून आम्ही सध्या तो सर्वात जवळच्या उपलब्ध भाषेत उपलब्ध करून दिला आहे.

Creating an inviting and comfortable space

मूलभूत गोष्टी उपलब्ध करा, त्या स्वच्छ ठेवा आणि तुमचे व्यक्तिमत्त्व चमकू द्या.
Airbnb यांच्याद्वारे 18 डिसें, 2019 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
18 डिसें, 2019 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • गेस्ट्सना त्यांच्या सामानासाठी जागा देऊन आपलेपणा वाटू द्या

  • फुले आणि फोन चार्जर्ससारख्या वस्तू ठेऊन गेस्ट्सचे मन जिंका

  • अतिरिक्त टॉवेल्स, टॉयलेट पेपर आणि कॉफी आणि चहा सारख्या नेहमी लागणार्‍या गोष्टी पुरवा

तुम्ही Airbnb वर कोणत्याही प्रकारची जागा शेअर करत असाल, तरीही तुमच्या पहिल्या गेस्ट्सचे स्वागत करण्यासाठी तयार होताना ती जागा स्वागतशील आणि आरामदायक बनवण्यासाठी तुम्ही काही साध्या गोष्टी करू शकता.

नेहमी विचारपूर्वक डिझाईन तयार करा

विचारशील डिझाइन घटकांमुळे तुमची जागा अधिक घरासारखी आणि स्वागतशील वाटण्यास मदत होऊ शकते—आणि हे घटक गुंतागुंतीचे किंवा महागडे असण्याची गरज नाही.

विचारशील डिझाइनसाठी येथे काही सल्ले दिले आहेत:

  • तुमचे व्यक्तिमत्व दाखवणार्‍या वस्तू, जसे की तुमच्या प्रवासातील स्मृतिचिन्हे
  • खूप जास्त रिकामी जागा सोडणे टाळा, जे निरर्थक आणि व्यक्तिमत्त्वहीन वाटू शकते
  • एक कलर पॅलेट निवडा आणि त्याप्रमाणे तुमच्या कलाकृती, कापडी वस्तू आणि इतर तपशीलांमध्ये समन्वय साधा
  • एखादा स्टेटमेंट पीस जोडण्याचा विचार करा, जसे की एखादे ठळक लाइट फिक्स्चर किंवा मोठ्या आकाराची आरामखुर्ची
  • जिवंतपणा आणण्यासाठी झाडे किंवा फुलांनी सजवा

आवश्यक गोष्टींचा साठा करा

कमीत कमी तुम्ही प्रत्येक गेस्टसाठी टॉयलेट पेपर, साबण, एक टॉवेल आणि एक उशी आणि प्रत्येक गेस्ट बेडसाठी लिनन्स देणे आवश्यक आहे.

गेस्ट्सना या वस्तू देखील खूप आवडतात:

  • अतिरिक्त टॉवेल्स, ब्लँकेट्स आणि उशा
  • शॅम्पू आणि कंडिशनर
  • हेअर ड्रायर
  • कॉफी, चहा आणि केटलीसारख्या दैनंदिन वापराच्या गोष्टी
  • स्वच्छतेची मूलभूत सामग्री

सुविधांबद्दल अधिक माहिती मिळवा

आरामदायक बेडरूम तयार करा

बेडरूम ती रूम आहे जिथे तुमचे गेस्ट्स झोपतील आणि त्यांचे सामान ठेवतील, त्यामुळे ती आरामदायक बनवणे महत्त्वाचे आहे. जरा विचार करा की जर तुम्ही दुसऱ्याच्या जागेत असते तर कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या घरात असल्यासारखे वाटले असते.

उदाहरणार्थ, तुम्ही हे करू शकता:

  • गेस्ट्सना त्यांच्या वैयक्तिक वस्तू ठेवण्यासाठी रिकाम्या ड्रॉवरसह ड्रेसर, काही रिकाम्या हँगरसह एक कपाट किंवा सामानाचे रॅक द्या.
  • बेडच्या बाजूला एक छोटा टेबल आणि त्यावर लॅम्प द्या, जेणेकरून गेस्ट्स त्यांचा चष्मा, फोन किंवा पुस्तक बेडजवळ ठेवू शकतील
  • दर्जेदार मॅट्रेस, काही अतिरिक्त उश्या आणि मऊ ब्लँकेट्स द्या जेणेकरून गेस्ट्स चांगला आराम करू शकतील
  • बेडरूममध्ये काही लहान झाडे, एखादा आरसा, पाण्यासाठी काचेचा एक जग आणि ग्लास, एक आंतरराष्ट्रीय पॉवर अडॅप्टर आणि मल्टी-फोन चार्जर ठेवा जेणेकरून त्यात आपलेपणाची भावना वाटेल.

फिनिशिंग टचेस द्या

तुमच्या उत्तम आदरातिथ्याला पूरक अशा आणखी काही गोष्टी करून तुम्ही तुमच्या गेस्ट्सना त्यांच्या वास्तव्याचा आनंद लुटण्यास मदत करू शकता.

1. अव्यवस्था टाळा. जर तुम्ही तुमची जागा गेस्ट्ससह शेअर करत आहात तर तुम्ही कोणत्या वस्तू बाहेर ठेऊ शकता आणि कोणत्या आवरून ठेऊ शकता यावर नक्की लक्ष द्या. तुमच्या वस्तू आवरून ठेऊन तुमची जागा व्यवस्थित ठेवल्याने आणि तुमचे सामान आकर्षक पद्धतीने स्टोअर केल्याने तुमची जागा अधिक सुटसुटीत आणि सुंदर वाटू शकते.

2. सूचना द्या. गेस्ट्सना त्यांच्या वापरासाठी उपलब्ध असलेली सर्व उपकरणे आणि वैशिष्ट्ये (जसे की गॅस फायरप्लेस, एअर कंडिशनिंग किंवा गॅरेजचा दरवाजा) कशी चालवायची हे समजण्यास मदत करा. या सूचना तुम्ही तुमच्या सुविधा सूची मध्ये समाविष्ट करू शकता.

3. एखादी रात्र घालवा. अधूनमधून तुमच्या जागेत रात्रभर मुक्काम केल्याने तिथे आणखी काय हवे आहे किंवा काय सुधारण्याची गरज आहे हे समजणे सोपे होते. तुमची जागा आनंददायी आणि आकर्षक दिसते का? तुम्हाला आरामदायक आणि घरच्यासारखे वाटण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तिथे आहेत का? या दोन्ही प्रश्नांना "हो" असे उत्तर मिळेपर्यंत गोष्टींमध्ये बदल करत रहा.

4. सगळे काही स्वच्छ ठेवा. तुम्ही तुमची जागा स्वतः साफ करत असाल किंवा एखाद्या व्यावसायिकाकडून स्वच्छ करवून घेत असाल, तुमचे घर नीटनेटके ठेवणे आणि प्रत्येक गेस्ट येण्याच्या आधी आणि नंतर पाच-पायऱ्यांच्या स्वच्छता प्रक्रियेचे पालन करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या वेळेचा किंवा तुमच्या क्लीनरचा खर्च कव्हर करण्यासाठी स्वच्छता शुल्क जोडू शकता. तुम्हाला गेस्ट्ससाठी तुमची जागा तयार करण्यात मदत करण्याकरता, तुम्ही वापरू शकता अशी एक चेकलिस्ट आम्ही तयार केली आहे.

Information contained in this article may have changed since publication.

हायलाइट्स

  • गेस्ट्सना त्यांच्या सामानासाठी जागा देऊन आपलेपणा वाटू द्या

  • फुले आणि फोन चार्जर्ससारख्या वस्तू ठेऊन गेस्ट्सचे मन जिंका

  • अतिरिक्त टॉवेल्स, टॉयलेट पेपर आणि कॉफी आणि चहा सारख्या नेहमी लागणार्‍या गोष्टी पुरवा

Airbnb
18 डिसें, 2019
हे उपयुक्त ठरले का?