तुमचे कॅलेंडर मॅनेज करा

रिझर्व्हेशन कॅन्सल करणे टाळण्यासाठी तुमच्या बुकिंगची सेटिंग्ज अपडेट करा.
Airbnb यांच्याद्वारे 10 जाने, 2024 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
3 मार्च, 2025 रोजी अपडेट केले

तुम्ही तुमची लिस्टिंग पब्लिश केल्यानंतर 24 तासांच्या आत गेस्ट्स ती सर्च रिझल्ट्समध्ये शोधू शकतात. तुमचे कॅलेंडर डीफॉल्टनुसार पूर्ण खुले आहे. तुमची उपलब्धता त्वरित अपडेट करणे, त्यानंतर तुमचे कॅन्सलेशन धोरण आणि गेस्ट्स तुमची जागा कशी बुक करू शकतात हे निवडणे महत्त्वाचे आहे.

तुमची उपलब्धता अपडेट करणे

तुम्ही होस्ट करू शकत नाही अशा तारखांसाठी तुमचे कॅलेंडर ब्लॉक करा. यामुळे सर्च रिझल्ट्समधून तुमची लिस्टिंग लपवली जाते आणि तुम्हाला रिझर्व्हेशन कॅन्सल करणे टाळण्यात मदत होते.

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समधील होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्य आणि सुपरहोस्ट फेलिसिटी म्हणतात,“तुम्ही तुमच्या गेस्टना सेवा देत आहात आणि त्यांचा मान राखण्यासाठी तुम्ही शक्य ते सर्व करणे आवश्यक आहे.”

तुमची उपलब्धता मॅनेज करण्यासाठी या पायऱ्या वापरा.

  • गेस्ट्स किती आगाऊ बुक करू शकतात ते सेट करा. तुम्ही त्याच दिवशी ठराविक वेळेपर्यंत रिझर्व्हेशन्स स्वीकारू शकता किंवा गेस्ट्सनी चेक इनच्या सात दिवस आधी बुक करण्याची अट घालू शकता.

  • तुमची कॅलेंडर्स सिंक करा. तुमचे Airbnb कॅलेंडर इतर कोणत्याही कॅलेंडर्ससह सिंक केल्याने तुम्हाला तुमचे होस्टिंग शेड्युल मॅनेज करण्यात आणि डबल बुकिंग्ज टाळण्यात मदत होते.

  • एक कॅन्सलेशन धोरण निवडा. गेस्टने कॅन्सल केल्यास तुम्हाला किती सोयीस्कर किंवा कठोर व्हायचे आहे ते तुम्ही ठरवा. तुमच्यासाठी काय उपयुक्त आहे ते निवडा.

  • तुमचे कॅलेंडर अप टू डेट ठेवा. यामुळे रिझर्व्हेशन्स कॅन्सल करणे आणि त्याच्याशी संबंधित शुल्क आकारले जाणे आणि इतर परिणाम टाळण्यात मदत होते.

गेस्ट्स कधी राहू शकतात हे निर्धारित करणे

तुम्हाला गेस्ट्सनी चेक इन आणि आऊट कधी करायला हवे आहे आणि बुकिंग्जच्या मध्ये तुम्हाला किती वेळ हवा आहे ते ठरवा.

  • वास्तव्याचा किमान आणि कमाल कालावधी सेट करा. तुम्ही विशिष्ट तारखांसाठी कस्टम ट्रिपचा कालावधी तयार करू शकता. नेहमी स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करा.

  • तुमची तयारीची वेळ ठरवा. तुम्हाला किंवा तुमच्या क्लीनर्सना दोन गेस्ट्सच्या मध्ये किती वेळ हवा आहे? बरेच होस्ट्स, गेस्ट्सना त्याच दिवशी चेक इन करू देतात, ज्या दिवशी इतर गेस्ट्स चेक आऊट करतात. इतर होस्ट्स प्रत्येक बुकिंगच्या आधीच्या आणि नंतरच्या एक किंवा दोन रात्री ब्लॉक करतात.

  • चेक इन आणि चेक आऊटच्या वेळा सेट करा. गेस्ट्स किती लवकर येऊ शकतात आणि किती उशीरा निघू शकतात ते निवडा. गेस्ट्सनी खूप उशीर करू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमच्याकडे चेक इनसाठी कटऑफ वेळ सेट करण्याचा पर्याय देखील आहे.

गेस्ट्स कसे बुक करू शकतात ते निवडणे

तुम्ही रिझर्व्हेशन्स स्वयंचलितपणे किंवा स्वहस्ते स्वीकारू शकता. हे सेटिंग कधीही अपडेट करणे सोपे आहे.

  • तात्काळ बुकिंग तुमच्या बुकिंगच्या अटी पूर्ण करणाऱ्या आणि तुमच्या घराच्या नियमांना सहमती देणाऱ्या कोणालाही तुमच्या कॅलेंडरवर उपलब्ध तारखा स्वयंचलितपणे बुक करण्याची परवानगी देते. गेस्ट्सना प्रश्न असल्यास, ते अजूनही तुमच्याशी संपर्क साधू शकतात.

  • बुकिंगच्या विनंत्या कालबाह्य होण्यापूर्वी गेस्टची विनंतीस्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी तुम्हाला 24 तास देतात. गेस्ट्सना कोणत्याही विशेष नियम किंवा वैशिष्ट्यांविषयी माहिती आहे, हे कन्फर्म करण्यासाठी ते तुम्हाला वेळ देते, जसे की एकाच प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या उंच पायऱ्या. तुम्ही बुकिंगच्या विनंत्या कालबाह्य होऊ दिल्यास, तुम्ही त्या पुन्हा उघडण्यापर्यंत विनंती केलेल्या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये ब्लॉक केल्या जातात.

तुम्ही कोणतीही बुकिंगची पद्धत निवडली तरी, शेड्युलिंगचा गोंधळ आणि कॅन्सलेशन्स टाळण्यास मदत करण्यासाठी तुमचे कॅलेंडर अद्ययावत ठेवा.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
10 जाने, 2024
हे उपयुक्त ठरले का?