स्पष्ट आणि सोपे चेक आऊट
चेक आऊटच्या वेळी गेस्ट्स आणि होस्ट्सना फार कमी कष्ट पडावेत. तुमच्या लिस्टिंगमध्ये तुमच्या सूचना ॲड करा आणि Airbnb आपोआप त्या चेक आऊटच्या आदल्या रात्री गेस्ट्सना पाठवेल.
चेक आऊट सूचना काढून टाका
तुम्ही घराचे स्टँडर्ड नियम कसे लिहाल त्याचप्रमाणे तुम्ही चेक आऊट सूचनाही ॲड करा. या सामान्य कामांमधून निवड करून त्वरित चेक आऊट लिस्ट तयार करा:
- वापरलेले टॉवेल्स गोळा करा
- कचरा फेकून द्या
- उपकरणे बंद करा
- कुलूप लावा
- किल्ल्या परत द्या
तुमच्याकडे प्रत्येक कामाबद्दल तपशील जोडण्याचा पर्याय आहे. उदाहरणार्थ, तुम्ही असे निर्दिष्ट करू शकता की गेस्ट्सनी कचरा एका डब्यात आणि रिसायकल होणार्या वस्तू दुसर्या डब्यात टाकव्या. तुम्ही तुमच्या घराशी संबंधित विनंत्या देखील लिहू शकता, जसे की वापरानंतर ग्रिल कव्हर करणे.
गेस्ट्स एखादी जागा बुक करण्यापूर्वी चेक आऊट सूचना आणि घराचे नियम ॲक्सेस करू शकतात. बुकिंग केल्यानंतर, त्यांना त्यांच्या ट्रिप्स टॅबवर चेक आऊट सूचनांबरोबरच घराचे नियम, वायफायबद्दल माहिती आणि इतर महत्त्वाचे तपशील मिळू शकतात.
गेस्ट्सना स्वच्छतेच्या कोणत्याही कामांशिवाय सोप्या चेकआउटची अपेक्षा असते, परंतु गेस्ट्सच्या मूलभूत नियमांनुसार त्यांनी तुमची जागा जास्त किंवा सखोल स्वच्छतेची आवश्यकता पडावी, अशा स्थितीत सोडू नये.
नवी दिल्लीतील होस्ट सल्लागार बोर्डचे सदस्य केशव म्हणाले की, “आम्हाला आमची चेक आऊट प्रक्रिया शक्य तितकी सोपी ठेवायची आहे.” “सफाई कामगार आत येतो आणि जे करणे आवश्यक असेल ते करतो.”
ऑटोमॅटिक चेक आऊट रिमाइंडर्स
तुमची चेक आऊट वेळ आणि सूचनांसह आम्ही गेस्ट्सना एक ऑटोमॅटिक रिमाइंडर पाठवू. हे तुमच्या गेस्टच्या मोबाइल डिव्हाइसवर चेक आऊटच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5:00 वाजता ते राहत असलेल्या टाइम झोनमध्ये पुश नोटिफिकेशन म्हणून पाठवले जाते.
हे रिमाइंडर मिळवण्यासाठी गेस्ट्सना Airbnb ॲप डाऊनलोड करणे आणि पुश नोटिफिकेशन चालू करणे आवश्यक आहे. एकदा त्यांनी चेक आऊट केले की, ते निघाले आहेत हे गेस्ट्स एकाच टॅपने किंवा क्लिकने तुम्हाला कळवू शकतात.
वेळेवर चेक आऊट का आवश्यक आहे यावर तुम्हाला जोर द्यावासा वाटू शकेल. जोह, सनफ्रॅन्सिस्कोमधील सुपरहोस्ट म्हणते, “मी गेस्ट्सना सांगते की पुढील गेस्ट्ससाठी अपार्टमेंटची साफसफाई करायला क्लीनर सकाळी 11:00 वाजता येईल, जेणेकरून वेळेवर चेक आऊट करणे का महत्त्वाचे आहे हे त्यांना समजेल.”
चेक आऊट कार्ड्स
चेक आऊट कार्ड हा तुमच्या गेस्ट्सना चेक आऊटबद्दलची माहिती पाठवण्याचा एक सोयीस्कर मार्ग आहे. चेक आऊटच्या सूचना एन्टर केल्यानंतर, तुम्ही झटपट दिलेल्या उत्तराबरोबर किंवा शेड्युल केलेल्या मेसेजमध्ये चेक आऊट कार्ड जोडू शकता. कार्ड तुमच्या सूचनांशी लिंक करते.
जरी Airbnb चेक आऊटच्या आदल्या रात्री गेस्ट्सना आपोआप रिमाइंडर पाठवत असले, तरीही गेस्ट्ससोबतच्या तुमच्या अनुभवावर तुमचे नेहमीच नियंत्रण असते. जर तुमच्या गेस्टसकडे ॲप डाउनलोड केलेले नसेल किंवा त्यांच्याकडे पुश नोटिफिकेशन्स चालू नसतील तर तुम्ही तुमच्या गेस्ट्सच्या Airbnb इनबॉक्समध्ये थेट चेक आऊट रिमाइंडर पाठवण्यासाठी शेड्युल केलेला मेसेज सेट करू शकता.
चेक आऊट फीडबॅक
गेस्ट्स निघून गेल्यानंतर, ते त्यांच्या होस्टच्या कम्युनिकेशनला स्टार रेटिंग देऊ शकतात आणि काय चांगले होते किंवा काय आणखी चांगले होऊ शकले असते हे निर्दिष्ट करू शकतात. एक पर्याय म्हणजे “जास्त चेक आऊट कार्ये” रिपोर्ट करणे. अवास्तव कामांमुळे वारंवार कमी रेटिंग्ज मिळणाऱ्या लिस्टिंग्ज Airbnb वरून काढून टाकल्या जाऊ शकतात.
गेस्ट्स त्यांच्या वास्तव्यासाठी एकूण स्टार रेटिंग देखील निवडतात. कम्युनिकेशनसारख्या विशिष्ट कॅटेगरीजसाठी मिळालेल्या फीडबॅक आणि स्टार रेटिंग्जचा सुपरहोस्ट स्टेटसवर परिणाम होत नाही.