Airbnb रूम्स, खाजगी रूम्सबद्दल एक अनोखा दृष्टीकोन
संपादकाची टीपः हा लेख Airbnb 2023 च्या समर रिलीझचा भाग म्हणून प्रकाशित झाला होता. पब्लिकेशननंतर कदाचित माहितीमध्ये बदल झालेला असू शकेल. आमच्या नवीनतम उत्पादनांच्या रीलीजबद्दलअधिक जाणून घ्या.
प्रवाशांना दुसऱ्याच्या घरात राहण्याचा परवडेल असा मार्ग म्हणून Airbnbची सुरवात झाली. वर्षानुवर्षे, खाजगी रूम्सच्या होस्ट्सनी लोकांना एकत्र आणले आहे आणि गेस्टसना स्थानिकांप्रमाणे नवीन ठिकाणे शोधण्यात मदत केली आहे.
आज लोक विशेषतः सध्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार करून परवडण्याजोगे प्रवास करू इच्छितात. आणि महामारीच्या काळात अनेक वर्षे एकाकी राहिल्यानंतर, ते इतरांशी कनेक्ट होण्याचे आणि अस्सल अनुभव मिळवण्याचे मार्ग शोधत आहेत.
म्हणूनच आम्ही Airbnb रूम्स सादर करीत आहोत, खाजगी रूम्सबद्दल एक अनोखा दृष्टीकोन. अपग्रेडमध्ये हे समाविष्ट आहे:
होस्ट पासपोर्ट, जेणेकरून बुक करण्यापूर्वी गेस्ट्स तुम्हाला जाणून घेऊ शकतील
एक नवीन रूम्सची कॅटेगरी आणि पुनर्रचना केलेले सर्च फिल्टर जे गेस्ट्सना खाजगी रूम्स शोधणे सुलभ करतात;
प्रत्येकाच्या सोयीसाठी गोपनीयतेशी संबंधित नवीन तपशील
होस्ट पासपोर्ट
गेस्ट्सनी आम्हाला सांगितले आहे की त्यांना खाजगी रूम बुक करण्यापूर्वी हे जाणून घ्यायचे आहे की ते कोणाबरोबर जागा शेअर करणार आहेत. तुमचा होस्ट पासपोर्ट गेस्ट्सना तुमची ओळख करून देण्याचे अधिक मार्ग तुम्हाला उपलब्ध करून देतो. हे तुमच्या प्रोफाईलमधून तपशील देखील काढते आणि त्यांना सर्चमध्ये आणि तुमच्या लिस्टिंगवर हायलाइट करते.
तुम्हाला जो पहिला बदल लक्षात येईल तो म्हणजे तुमचा प्रोफाईल फोटो तुमच्या मुख्य लिस्टिंगच्या फोटोच्या कोपऱ्यात दिसेल. तुमच्या होस्ट पासपोर्टवर आणि तुम्ही तुमच्याबद्दल शेअर केलेल्या काही तपशीलांवर जाण्यासाठी गेस्ट त्यावर टॅप किंवा क्लिक करू शकतात.
तुमचे नाव, किती वर्ष होस्टिंग करत आहात, स्टार रेटिंग आणि गेस्टच्या रिव्ह्यूजची संख्या यासारखे तपशील तुमच्या होस्ट पासपोर्टच्या वरच्या भागात दिसतात. त्या खाली, तुमच्या प्रोफाईलमधील नवीन सेक्शन्स तुम्हाला, तुम्ही कुठे राहता, तुमचे छंद, पाळीव प्राण्याचे नाव, मजेदार गोष्टी आणि तुमच्या जागेत राहणे कशामुळे खास आहे अशा अनेक गोष्टी शेअर करू देतात.
तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये बदल करून शेअर केलेला फोटो आणि माहिती निवडू शकता. तसेच, तुम्हाला कदाचित लक्षात येईल की होस्ट प्रोफाईलची पूर्वीची सेक्शन्सदेखील नवीन स्वरूपात आहेत, म्हणून तुमचे काम, भाषा आणि लोकेशन तुम्हाला हवे तसेच दाखवले जाते आहे याची खात्री करून घेणे ही एक चांगली कल्पना आहे.
रूम्स कॅटेगरी
गेस्ट्सना होम पेजच्या शीर्षस्थानी असलेल्या नवीन रूम्स कॅटेगरीद्वारे तुमची लिस्टिंग शोधणे सोपे आहे. नव्याने डिझाइन केलेल्या सर्च फिल्टरमुळे खाजगी रूम्स, संपूर्ण घरे आणि सर्व प्रकारच्या जागांमध्ये स्विच करणे देखील सोपे करते. गेस्टस जे काही निवडतात त्याचे सरासरी भाडे फिल्टरवर दर्शविले जाते.
3 मे पासून, रूम्स कॅटेगरीमध्ये समाविष्ट होण्यासाठी तुमच्या लिस्टिंगला या सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे:
गेस्टकडे स्वतःची दरवाजा असलेली एक खाजगी बेडरूम आहे.
गेस्टना खाजगी किंवा शेअर करता येणार्या बाथरूमचा ॲक्सेस आहे.
गेस्टना किमान एका कॉमन जागेचा ॲक्सेस आहे, जसे की किचन, लिव्हिंग रूम किंवा बॅकयार्ड.
होस्ट त्यांच्या लिस्टिंगवर, एखाद्या बिझनेसचे किंवा इतर कुठले नाव न वापरता, स्वतःचे नाव वापरतात.
तुमच्या लिस्टिंग सेटिंग्जमध्ये लिस्टिंगचा किंवा रूमचा प्रकार म्हणून “खाजगी रूम” निवडले आहे.
खाजगी रूम ही शेअर करता येणारी रूम, हॉटेल, रिसॉर्ट, टेंट, कॅम्पर, स्वतंत्र युनिट (जसे की बॅकयार्ड बंगला) यापैकी किंवा या यादीतीलइतर कोणत्याही प्रकारच्या प्रॉपर्टीपैकी नसावी.
या नवीन निकषांची पूर्तता न करणाऱ्या लिस्टिंग्ज गेस्ट्सना सर्चमध्ये किंवा लिस्टिंग पेजेसवर रुम्स म्हणून दाखवल्या जाणार नाहीत. तुम्ही नवीन लिस्टिंग प्रकार निवडू शकता किंवा तुमची लिस्टिंग अपडेट करू शकता जेणेकरून या निकषांची पूर्तता होईल. तुम्हाला तुमची लिस्टिंग रूम्स कॅटेगरीमध्ये ॲड करायची किंवा काढून टाकायची असल्यास, तुम्ही कम्युनिटी सपोर्टला विनंती पाठवू शकता.
गोपनीयता आणि आराम
खाजगी रूम्सच्या लिस्टिंग्ज ब्राउझ करणारे गेस्ट्स अनेकदा अशा तपशीलांची तपासणी करतात जे त्यांना आरामदायक आणि सुरक्षित वाटण्यास मदत करतात. अपेक्षा सेट करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, आम्ही ही माहिती तुमच्या लिस्टिंग पेजवर जास्त अजून वरती नेली आहे:
बेडरूमच्या दरवाजाला कुलूप आहे की नाही. गेस्ट्सना दरवाजाला कुलूप असावे अशी अपेक्षा असते. तुमच्या खाजगी रूमला कुलूप नसल्यास, एक कुलूप बसवा.
बाथरूम खाजगी, स्वतंत्र किंवा शेअर केलेले आहे का. Airbnb वरील सर्व लिस्टिंग्जमध्ये, गेस्ट्सना सिंक, टॉयलेट आणि शॉवर किंवा टब असलेल्या बाथरूममध्ये ॲक्सेस असणे आवश्यक आहे. तुमची लिस्टिंग आता तुमच्या गेस्टचे बाथरूम प्रायव्हेट आणि अटॅच्ड आहे का, हे हायलाइट करू शकते (खाजगी पण हॉलवेसारख्या शेअर्ड जागेतूनअॅक्सेस केले जाते), किंवा इतरांसोबत शेअर केले जाते.
प्रॉपर्टीमध्ये आणखी कोण असू शकतं? गेस्ट्सना हे जाणून घ्यायचे आहे की त्यांच्या वास्तव्यादरम्यान इतर गेस्ट्स, कुटुंबातील सदस्य किंवा रूममेट्स यांच्यासारखे इतर लोक त्यांना भेटतील की नाही. तिथे कोण असू शकते याबद्दलचा तपशील सांगून तुम्ही विसंगत अपेक्षा टाळू शकता.
किती सामाजिक संवाद अपेक्षित आहे. गेस्ट्स सहसा होस्ट्ससोबत वेळ घालवण्याचा आनंद घेतात, जे त्यांना स्थानिक लोकांप्रमाणे त्यांचे डेस्टिनेशन जाणून घेण्यात मदत करू शकतात. तुम्हाला गेस्ट्सबरोबर त्यांच्या वास्तव्यादरम्यान किती वेळ घालवायला आवडेल याची माहिती तुम्ही देऊ शकता.
हे तपशील अपडेट करण्यासाठी, तुमच्या लिस्टिंगच्या रूम्स आणि इतर जागा विभागात जा.
Airbnb रूम्स आणि होस्ट्ससाठी 25 अपग्रेड्स या आठवड्यात Airbnb 2023 समर रिलीजचा भाग म्हणून सुरू होतील.