सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

जलद, विश्वसनीय वायफायसह गेस्ट्सना आकर्षित करा

तुमच्या नेटवर्कच्या स्पीडची टेस्ट करा आणि ते तुमची टॉप सुविधा म्हणून दाखवा.
Airbnb यांच्याद्वारे 11 ऑग, 2021 रोजी
20 ऑग, 2025 रोजी अपडेट केले

अनेक गेस्ट्स ट्रिपदरम्यान वेगवान इंटरनेटवर अवलंबून असतात, विशेषतः ते व्हिडिओ स्ट्रीम करत असल्यास किंवा रिमोट वर्क करत असल्यास. खरं तर, गेस्ट्स Airbnb वर इतर कोणत्याही सुविधांपेक्षा वायफाय जास्त वेळा शोधतात.*

तुमच्या लिस्टिंगमध्ये जलद वायफाय जोडल्यास ती सर्च रिझल्ट्समध्ये दिसण्यास मदत होते. तुम्ही वायफाय स्पीड टेस्ट वापरून तुमच्या कनेक्शनचा स्पीड व्हेरिफाय करू शकता.

तुमच्या वायफायचा स्पीड तपासणे

तुमचा वायफाय स्पीड तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीमध्ये असणे आवश्यक आहे. तुम्ही वायफाय नेटवर्कशी जोडलेले आहात आणि iOS किंवा Android डिव्हाईसवर Airbnb ॲप मध्ये लॉग इन केले आहे याची खात्री करा.

लिस्टिंग्ज टॅबवर जा आणि तुम्हाला हवी असलेली लिस्टिंग निवडा. 'सुविधा' वर टॅप करा आणि या पायऱ्यांनुसार कृती करा:

  • सुविधा म्हणून वायफाय जोडण्यासाठी प्लस (+) वर टॅप करा किंवा तुम्ही ते आधीच जोडले असल्यास बदल करा वर टॅप करा.
  • टेस्ट सुरू करा वर टॅप करा (तुम्हाला तुमच्या नेटवर्कचा ॲक्सेस द्यावा लागू शकतो).
  • रिझल्ट्स दिसू लागल्यावर, तुमच्या लिस्टिंगवर तुमचे वायफाय तपशील दाखवण्यासाठी लिस्टिंगमध्ये जोडा वर टॅप करा.

तुम्ही तुमच्या लिस्टिंगमध्ये तुमचा वायफाय स्पीड जोडल्यानंतर, गेस्ट्सना तुमची जागा ही सुविधा ऑफर करत असल्याचे दिसेल. स्पीड 50 Mbps किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, तुमच्या लिस्टिंगच्या वरच्या भागात हायलाईट म्हणून “जलद वायफाय” सुद्धा दिसून येईल.

तुमचा वायफायचा स्पीड समजून घेणे

वायफाय स्पीड टेस्टमध्ये कनेक्शनचा स्पीड मेगाबिट्स प्रति सेकंदात मोजला जातो. तुम्हाला ज्या वेगवेगळ्या रीडिंग्ज मिळू शकतात त्या इथे दिल्या आहेत.

  • 50+ Mbps: जलद वायफाय. गेस्ट्स 4K व्हिडिओज स्ट्रीम करू शकतात आणि अनेक डिव्हाईसेसवर व्हिडिओ कॉल्समध्ये सामील होऊ शकतात.
  • 25-49 Mbps: सामान्यपेक्षा चांगले वायफाय. गेस्ट्स उच्च गुणवत्तेचे 4K व्हिडिओज स्ट्रीम करू शकतात आणि व्हिडिओ कॉल्समध्ये सामील होऊ शकतात.
  • 7-24 Mbps: चांगला वायफाय. गेस्ट्स HD व्हिडिओज स्ट्रीम करू शकतात.
  • 1-6 Mbps: बेसिक वायफाय. गेस्ट्स मेसेजेस तपासू शकतात आणि वेब ब्राऊझ करू शकतात.
  • रीडिंग नाही: एकतर तुमच्याकडे वायफाय नाही किंवा तुम्ही कनेक्ट करू शकत नाही. तुमचा राऊटर रीबूट करून पहा किंवा तो तुमच्या प्रॉपर्टीमधील एखाद्या दुसर्‍या जागी ठेवून बघा.

तुमच्या इंटरनेटचा स्पीड व्हेरिफाय करण्याबद्दल अधिक जाणून घ्या

*1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत जगभरातील गेस्ट्सनी सर्वाधिक सर्च केलेल्या सुविधांचे मोजमाप करणाऱ्या Airbnb च्या अंतर्गत डेटानुसार.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
11 ऑग, 2021
हे उपयुक्त ठरले का?