सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

गेस्ट फेव्हरेट्सबद्दल जाणून घेणे

रेटिंग्ज, रिव्ह्यूज आणि विश्वसनीयतेच्या आधारे लिस्टिंग्ज नजरेत भराव्यात यासाठी एक मार्ग.
Airbnb यांच्याद्वारे 17 सप्टें, 2025 रोजी

Airbnb वर जगभरातील 80 लाखांहून अधिक घरे आहेत. प्रत्येक घर वेगळ्या प्रकारचे आहे आणि हे अनोखेपण Airbnb ला इतरांपेक्षा वेगळे बनवते.

राहण्याची मस्त जागा शोधण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे गेस्ट्सना कोणती घरे सर्वात जास्त आवडतात हे जाणून घेणे. म्हणूनच आम्ही गेस्ट फेव्हरेट्स तयार केले आहेत.

गेस्ट फेव्हरेट्स म्हणजे काय?

गेस्ट फेव्हरेट्स म्हणजे गेस्ट्सच्या मते Airbnb वरील सर्वात पसंतीच्या घरांचे कलेक्शन असते. ते अर्ध्या अब्जाहून अधिक ट्रिप्समधील रेटिंग्ज, रिव्ह्यूज आणि विश्वसनीयतेच्या डेटावर आधारित आहेत. गेस्ट फेव्हरेट्स दररोज अपडेट केले जातात, त्यामुळे तुमची लिस्टिंग आत्ता समाविष्ट नसल्यास, ती लवकरच समाविष्ट केली जाऊ शकते.

गेस्ट फेव्हरेट्स ही ओळख मिळवण्यास अनेक घटक उपयुक्त ठरतात, जसे की:

  • गेस्ट्सकडून मागील 4 वर्षांमधील किमान 5 रिव्ह्यूज, ज्यात मागील 2 वर्षांमधील किमान 1 रिव्ह्यू असणे आवश्यक आहे
  • सरासरी 4.9 स्टार्सपेक्षा जास्त उत्कृष्ट रिव्ह्यूज आणि रेटिंग्ज
  • चेक इन करणे, स्वच्छता, अचूकता, होस्ट कम्युनिकेशन, लोकेशन आणि भाड्याच्या तुलनेत मूल्य ह्यांच्यासाठी उच्च रेटिंग्ज
  • विश्वासार्हतेचा उत्कृष्ट रेकॉर्ड, जसे की होस्टद्वारे केलेले कॅन्सलेशन्स आणि गुणवत्तेशी संबंधित समस्या सरासरी 1% पेक्षा कमी असणे

गेस्ट फेव्हरेट्स कसे शोधावेत

गेस्ट फेव्हरेट्स जगभरात उपलब्ध आहेत आणि ते Airbnb वर अगदी सहज शोधता येतात.

गेस्ट फेव्हरेट्स असलेल्या लिस्टिंग्ज सर्च रिझल्ट्समध्ये आणि लिस्टिंग पेजवर एका बॅजसह दाखवल्या जातात. प्रवासी फिल्टरच्या मदतीने गेस्ट फेव्हरेट्स शोधू शकतात.

गेस्ट फेव्हरेट्स आणि सुपरहोस्ट्स

सुपरहोस्ट्सना उत्कृष्ट आदरातिथ्याच्या त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डसाठी सन्मानित केले जाते. Airbnb चा सुपरहोस्ट प्रोग्राम बदलत नाहीये. सुपरहोस्ट बनण्याचे निकष तेच राहणार आहेत आणि आम्ही सुपरहोस्टची कामगिरी दर तीन महिन्यांनी तपासत राहणार आहोत.

तुम्ही सुपरहोस्ट असून तुमची लिस्टिंग गेस्ट फेव्हरेट्समध्ये समाविष्ट असल्यास, या दोन्ही गोष्टी तुमच्या लिस्टिंग पेजवर हायलाईट केल्या जातील आणि सर्च रिझल्ट्समध्ये तुमच्या लिस्टिंगवर गेस्ट फेव्हरेट हा बॅज असेल. तुम्ही गेस्ट फेव्हरेट्ससाठी अद्याप पात्र नसलेल्या लिस्टिंगचे सुपरहोस्ट असलात तरीही तुम्हाला तुमच्या लिस्टिंग पेजवर आणि सर्च रिझल्ट्समध्ये, दोन्ही ठिकाणी सुपरहोस्ट बॅजसह सन्मानित केले जाईल.

गेस्ट फेव्हरेट बॅजसाठी पात्रता ठरवताना तुमच्या प्रत्येक लिस्टिंगला स्वतंत्रपणे विचारात घेतले जाईल.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
17 सप्टें, 2025
हे उपयुक्त ठरले का?