Airbnb होस्ट क्लब म्हणजे काय?

तुमच्या जवळपासच्या होस्ट्सकडून टिप्स मिळवण्यासाठी तुमच्या लोकल क्लबमध्ये सामील व्हा.
Airbnb यांच्याद्वारे 8 मार्च, 2023 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
8 मार्च, 2023 रोजी अपडेट केले

Airbnb डेटानुसार, होस्ट क्लब्जमध्ये सामील होणारे होस्ट्स, क्लब्जमध्ये सामील न होणाऱ्या होस्ट्सपेक्षा अधिक यशस्वी असतात. क्लबमध्ये सामील होणारे नवीन होस्ट्स क्लबचा भाग नसलेल्यांपेक्षा तीन वास्तव्ये पूर्ण करण्याची शक्यता 86% जास्त असते तसेच सदस्य जास्त कमाई करतात आणि रिव्ह्यू स्कोअर मिळवतात व त्यांची सुपरहोस्ट बनण्याची चांगली शक्यता असते.

एक होस्ट असे म्हणतात: “मला संसाधने आणि कल्पना शेअर करण्यासाठी स्थानिक होस्ट्सचे नेटवर्क असणे आवडते. हा क्लब आमच्या काउंटीमधले होस्टिंगचे बदलणारे नियम समजण्यासदेखील होस्ट्सना मदत करतो.”

होस्ट क्लब म्हणजे काय?

Airbnb होस्ट क्लब हे स्थानिक होस्टसचे कम्युनिटीज आहेत जे प्रश्न विचारण्यासाठी, टिप्स शेअर करण्यासाठी, यश साजरे करण्यासाठी आणि होस्ट करणे खरोखर कसे असते यावर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन आणि वैयक्तिकरित्या जुडतात. 

ग्रुप्सचे नेतृत्व कम्युनिटी लीडर्स नावाचे स्वयंसेवक होस्ट करतात. ते चर्चा सुरू करतात आणि भेट आयोजित करतात तसेच ज्यांना स्वयंसेवा करायची आहे त्यांच्यासाठी अशा संधी शोधून काढतात. हे लीडर्स क्लब सदस्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी नवीनतम अपडेट्स आणि शैक्षणिक कंटेंट शेअर करण्याकरता Airbnb सोबत देखील भागीदारी करतात. 

सर्व क्लब्ज खाजगी फेसबुक ग्रुप्स वापरतात, त्यामुळे त्या संभाषणांमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला एक अकाऊंट आवश्यक असेल. क्लब्ज सर्व होस्ट्ससाठी खुले असलेल्या भेटी देखील होस्ट करतात. काही कम्युनिटीज भेटी वैयक्तिकरित्या होस्ट करतात तर काही व्हर्चुअली करतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, होस्ट क्लब्ज हे एक मदत करणारे नेटवर्क आहे—जेव्हा तुम्हाला सल्ल्याची गरज असेल किंवा तुम्हाला फक्त इतर होस्ट्सशी गप्पा मारायच्या असतील तेव्हा जाण्याचे ठिकाण.

एखाद्या होस्ट क्लबमध्ये कसे सामील व्हावे

तुम्हाला होस्ट क्लबमध्ये सामील होण्यासाठी फक्त Airbnb वर होस्ट अकाऊंट आणि एक Facebook अकाऊंट असणे आवश्यक आहे. 90 देशांमध्ये जगभरात 600 हून अधिक क्लब्ज आहेत, म्हणून तुम्हाला जवळपास एक स्थापित क्लब नक्कीच सापडू शकते. जर तुम्ही अशा भागात राहत असाल जिथे अद्याप क्लब नाही, तर तुम्ही होस्ट क्लब सुरू करू शकता.

तुम्हाला तुमचा लोकल क्लब सापडल्यानंतर, त्यात सामील होणे हे एक, दोन, तीन म्हणण्या इतके सोपे आहे: 

  1. नकाशावर लिंक केलेल्या Facebook ग्रुपवर जा आणि सामील होण्यासाठी विनंती पाठवा.

  2. तुमचे होस्टिंग अकाऊंट कन्फर्म करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी सदस्यता संबंधित प्रश्नांची उत्तरे द्या.

  3. एकदा तुमची विनंती मंजूर झाली की तुम्ही सामील झालात.

होस्ट क्लब सदस्यतेचे फायदे

कदाचित क्लबमध्ये सामील होण्याचा सर्वात आकर्षक फायदा म्हणजे ऑनलाइन जाऊन आपल्या लिस्टिंगवर फीडबॅक मिळविण्याची किंवा इतर होस्टसना होस्टिंगबद्दल, मग ते स्थानिक नियम असोत किंवा सर्वोत्तम स्वच्छता सेवा, याबद्दल प्रश्न विचारण्याची संधी. 

तुम्हाला भेटींचा ॲक्सेसअसल्यामुळे, तुम्ही तुमच्या भागातील होस्ट्सना देखील भेटू शकाल, ज्यामुळे एखादी समस्या उद्भवल्यास किंवा तुम्हाला एखाद्या मदतीची आवश्यकता असल्यास तुम्ही ज्यावर अवलंबून राहू शकाल अशी मैत्री आणि व्यावसायिक कनेक्शन होऊ शकतात.

होस्ट क्लब्जमध्ये काय चालले आहे

क्लब्सनी स्थानिक बिझनेसेसचा समावेश केला आहे, टिकाऊपणाचे उपक्रम तयार केले आहेत, अल्पकालीन भाड्याच्या नियमांचे समर्थन केले आहे आणि एकत्र काम केले आहे. भेटीगाठींचा परिणाम खास कनेक्शन्स निर्माण करण्यात किंवा कम्युनिटीवर प्रभाव टाकण्यात होतो. दोन उदाहरणे: 

गिरोना, स्पेनमधील
  • होस्ट क्लबने एका सुप्रसिद्ध इंटिरियर डिझायनरला एका प्रश्नोत्तराच्या सत्रासाठी आमंत्रित केले जेथे सदस्यांना त्यांची जागा कशी सुधारावी याबद्दल प्रश्न विचारता आले.

  • पनामामधील कम्युनिटी लीडर्सच्या एका टीमने त्यांच्या होस्ट क्लबसाठी बीच साफसफाईचे यशस्वीआयोजन केले.

Facebookपोस्ट्स अनेकदा सपोर्ट शेअर करण्याच्या संधी देतात. कॅट्सकिल्स आणि हडसन व्हॅली, न्यूयॉर्कमधील होस्ट क्लबचे उदाहरणः

  • एक कम्युनिटी लीडर प्रत्येकाच्या होस्टिंगच्या हंगामाबद्दल विचारत आहे आणि सुधारणा सुचवण्यासाठी विचारविमर्श करण्याची ऑफर देत आहे.

  • डबल बुकींग कसे टाळावे असा प्रश्न एका होस्टने विचारला.

  • एक होस्ट स्थानिक सौना बिल्डर आणि बर्फ काढून टाकण्याच्या सेवेसाठी शिफारसींची विनंती करत आहे.

  • एका होस्टने 10 जणांच्या एका ग्रुपला कोणी एका आठवड्यासाठी सामावून घेऊ शकेल का असे विचारले.

या लेखात दिलेली माहिती पब्लिकेशन झाल्यानंतर कदाचित बदलली असेल.

Airbnb
8 मार्च, 2023
हे उपयुक्त ठरले का?