तुमच्या स्थानिक होस्ट क्लबचे नेतृत्व करा

तुमच्या भागातील होस्ट्सना कनेक्ट करण्यासाठी, सहयोग करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी एकत्र आणा.
Airbnb यांच्याद्वारे 23 नोव्हें, 2020 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
26 ऑग, 2024 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • तुमच्या स्थानिक होस्ट कम्युनिटीला सशक्त करण्यासाठी जगभरातील होस्ट क्लबच्या लीडर्समध्ये सामील व्हा

  • Airbnb च्या मदतीने लीडर्स त्यांच्या क्षेत्रामध्ये होस्ट्ससाठी स्थानिक Facebook ग्रुप चालवत आहेत

  • मीटअप्सद्वारे, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतींनी कनेक्शन वाढवा

  • नवीनतम Airbnb वैशिष्ट्ये, कार्यक्रम आणि धोरणांच्या अपडेट्सना अर्ली ॲक्सेस आणि अभिप्राय मिळवा

तुम्हाला होस्टिंगबद्दल उत्कटता आहे का आणि तुमच्या शहरातील होस्ट्सना एकत्र आणण्यात स्वारस्य आहे? निवडलेले कम्युनिटी लीडर्स जगभरातील होस्ट क्लब्सचे प्रतिनिधित्व करतात. ते Airbnb येथे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत होस्टचे मत हिरारीने मांडतात आणि स्थानिक समर्थनाद्वारे भागीदारी तयार करून Airbnb कम्युनिटीचा एक अपरिहार्य भाग म्हणून काम करतात.

“मी स्वखुशीने कम्युनिटी लीडर म्हणून काम केले कारण त्यामुळे माझा वैयक्तिक विकास होतो आणि माझे जीवन अधिक व्यापक होण्यास मदत होते,” कोलोराडो स्प्रिंग्स होस्ट क्लबचे नेते रॉबिन म्हणतात. “मी होस्टिंगबद्दल देखील उत्साही आहे आणि मला एकत्रित कल्पनांचा उपयोग करून उत्तम भविष्य निर्माण करायचे आहे—जे माझ्या कम्युनिटीचा एकत्रित दृष्टीकोन समाविष्ट करते.”

या प्रोग्रॅमबद्दल आणि तुम्ही तुमच्या भागात लीडर होण्यासाठी कसे अर्ज करू शकता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

प्रभाव पाडणे

अल्पकालीन रेंटलच्या नियमांवरील ग्रुप चर्चेपासून ते स्थानिक सेवांची शिफारस करण्यापर्यंत, होस्ट क्लबचे सदस्य मोठ्या आणि लहान आव्हानांमध्ये एकमेकांना मदत करतात. "सध्या रेंटलसाठी कठीण असलेल्या मार्केटमध्ये आम्ही मूलतः प्रतिस्पर्धी असलो तरी ज्याला गरज लागेल त्याला मदत करण्यासाठी आम्ही सर्वजण योगदान देतो. ही कम्युनिटी आहे,” नॅशव्हिलमधील एक लीडर बार्ब सांगतात. कम्युनिटी लीडर्स त्यांच्या स्थानिक ग्रुप्सकडून आलेले प्रामाणिक आणि इन्साईट असलेले फीडबॅक देतात, ज्यामुळे त्यांना Airbnb धोरण आणि उत्पादनाला आकार देण्यात हातभार लावता येतो. ते स्थानिक होस्ट्सना इतर प्रभावी मार्गांनी एकत्रित देखील आणतात:

  • स्थानिक Facebook ग्रुपचे नेतृत्व करणे: Airbnb च्या सपोर्टने लीडर्स त्यांच्या भागामध्ये स्थानिक होस्ट्ससाठी Facebook ग्रुप चालवत आहेत आणि वाढवत आहेत. अपडेट्स देण्यासाठी, इन्साईट्स शेअर करण्यासाठी आणि तुमच्या होस्ट क्लबमध्ये संभाषण करण्यासाठी ही जागा आहे.
    मीटअप्सच्या माध्यमातून कनेक्शन वाढवणे: लीडर्स मासिक व्हर्च्युअल मीटअप्स होस्ट करून स्थानिक होस्ट्सना एकत्र आणतात. Airbnb ने प्रदान केलेली टूलकिट्स आणि संसाधने वापरून, होस्ट्स एकमेकांकडून सर्वोत्तम पद्धती शिकतात आणि स्थानिक ज्ञान शेअर करतात.
  • स्थानिक होस्टच्या विचारांना आवाज देणे: Airbnb कम्युनिटी टीमसोबत कथा, कल्पना आणि फीडबॅक शेअर करून लीडर्स त्यांच्या कम्युनिटीचे प्रतिनिधित्व करतात. स्थानिक पर्यटनावर प्रभाव पाडण्यासाठी आणि तुमच्या कम्युनिटीमध्ये समानतेचा बदल घडवून आणण्यासाठी स्थानिक भागीदाऱ्या करा.
मी व्हेकेशन रेंटल्ससंबंधित बिझनेस तयार करण्यासाठी चांगली पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडली, म्हणून इतरांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास मदत करणे चांगले वाटते.
Jeff, Host Club Leader,
फिलाडेल्फिया

कम्युनिटीमधील लोकांना नेतृत्वपदी नेणे

एक भरभराटीची कम्युनिटी ग्रुपच्या प्रयत्नाने बनत असते. कम्युनिटी लीडर्सना त्यांच्या होस्ट क्लबचे सतत नवीन आणि नाविन्यपूर्ण मार्गाने नेतृत्व करण्यासाठी Airbnb आणि सहकारी होस्ट्सकडून सपोर्ट आणि टूल्स प्रदान केले जातात:

  • ग्लोबल नेटवर्कमध्ये सामील व्हा: सहकारी लीडर्स बरोबर, विशेष वेबिनार्स आणि माहिती सत्रांना हजेरी लावा ज्याचा उद्देश तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या वाढीला मदत करणे आहे.
    इनसाईडर ॲक्सेस मिळवा: लीडर्सना काही नवीनतम Airbnb वैशिष्ट्ये, प्रोग्राम्स आणि धोरणाचे अपडेट्स तसेच लाँच होण्यापूर्वी फीडबॅक देण्याची संधी यांचा अर्ली ॲक्सेस मिळतो.
 एक लीडर म्हणून, तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करण्यासाठी स्थानिक डेटा इनसाईट्स यासारखे खास कंटेंट देखील पाठवले जाईल. 
  • चालू असलेले शिक्षण मिळवा: कम्युनिटी बिल्डिंग, इव्हेंट कोऑर्डिनेशन आणि सोशल मीडियाच्या सर्वोत्तम पद्धतींवरील विशेष शैक्षणिक साहित्य ॲक्सेस करा.

तुमच्या भागात होस्ट क्लब लाँच करण्यात मदत करा

विद्यमान होस्ट क्लबचा लीडर होण्यासाठी किंवा तुमच्या शहरात एखादा क्लब सुरू करण्यात हातभार लावण्यासाठी, लीडरसाठीचा अर्ज भरा.

हायलाइट्स

  • तुमच्या स्थानिक होस्ट कम्युनिटीला सशक्त करण्यासाठी जगभरातील होस्ट क्लबच्या लीडर्समध्ये सामील व्हा

  • Airbnb च्या मदतीने लीडर्स त्यांच्या क्षेत्रामध्ये होस्ट्ससाठी स्थानिक Facebook ग्रुप चालवत आहेत

  • मीटअप्सद्वारे, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतींनी कनेक्शन वाढवा

  • नवीनतम Airbnb वैशिष्ट्ये, कार्यक्रम आणि धोरणांच्या अपडेट्सना अर्ली ॲक्सेस आणि अभिप्राय मिळवा

Airbnb
23 नोव्हें, 2020
हे उपयुक्त ठरले का?