तुमच्या उपलब्धता सेटिंग्ज अपडेट करा
Airbnb च्या उपलब्धता सेटिंग्जमुळे गेस्ट्स तुमची जागा केव्हा आणि कशी बुक करतात हे सहज नियंत्रित करता येते. ती तुम्हाला तुमच्या कॅलेंडरमध्ये मिळतील.
उपलब्धता सेटिंग्ज आणि प्राईसिंग टूल्स सहसा एकत्रितरीत्या काम करतात. तुम्हाला मासिक सवलती ऑफर करण्यासारखी काही टूल्स वापरायची असल्यास, तुम्हाला तुमची उपलब्धता बदलावी लागू शकते, जसे की दीर्घकालीन वास्तव्यांना परवानगी देणे.
तुमच्या ट्रिपचे कालावधी ॲडजस्ट करणे
तुमचा ट्रिपचा कालावधी बदलल्याने तुमचे कॅलेंडर खुले होऊ शकते आणि तुमची लिस्टिंग अधिक सर्च रिझल्ट्समध्ये दिसू शकते. तुमचा ट्रिपचा किमान आणि कमाल कालावधी स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करत असल्याची खात्री करा.
- किमान रात्री: तुमचा ट्रिपचा किमान कालावधी कमी करणे अल्पकालीन वास्तव्ये बुक करणाऱ्या गेस्ट्सना आकर्षित करते आणि तुमच्या कॅलेंडरमधील रिकाम्या तारखा भरण्यात मदत करते. तुमच्याकडे आठवड्याच्या दिवसानुसार तुमचा ट्रिपचा किमान कालावधी कस्टमाईझ करण्याचा पर्याय आहे.
- कमाल रात्री: ट्रिपचा कमाल कालावधी वाढवल्याने गेस्ट्सना दीर्घकालीन वास्तव्ये बुक करणासाठी आकर्षित करते, ज्यामुळे चेक आऊटनंतरची तयारी कमी वेळा करावी लागते. तुम्ही तुमच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक कालावधीच्या वास्तव्याच्या विनंत्यांना देखील परवानगी देऊ शकता. तुम्ही या विनंत्यांचा आढावा घेऊ शकाल आणि मंजूर करू शकाल.
- ट्रिपचा कस्टम कालावधी: विशिष्ट तारखांसाठी तुमच्या ट्रिपच्या किमान कालावधीपेक्षा लहान असलेला कस्टम ट्रिपचा कालावधी जोडल्याने तुम्हाला तुमच्या कॅलेंडरमधील रिकाम्या जागा भरण्यात मदत होऊ शकते.
तुमची उपलब्धता मॅनेज करणे
गेस्टचे बुकिंग आणि त्यांचे आगमन या दरम्यान तुम्हाला किती नोटिस कालावधी आवश्यक आहे? तुम्ही गेस्ट्सना किती आधी बुकिंग करण्याची परवानगी देऊ इच्छिता? तुमच्यासाठी योग्य असलेली बुकिंग्ज मिळवण्यासाठी तुमची उपलब्धता सेट करा. तुम्ही निवडलेल्या सेटिंग्जच्या आधारे रात्री आपोआप उपलब्ध होतील. तुम्हाला तुमचे कॅलेंडर मॅन्युअली ॲडजस्ट करण्याची गरज नाही.
- ॲडव्हान्स नोटिस: त्याच दिवशी, कमीतकमी 1 दिवस, कमीतकमी 2 दिवस, कमीतकमी 3 दिवस किंवा कमीतकमी 7 दिवस यापैकी एक निवडा. तुमच्याकडे त्याच दिवसासाठीच्या विनंत्यांना परवानगी देण्याचासुद्धा पर्याय आहे, परंतु तुम्ही या विनंत्यांचा आढावा घेऊ शकाल आणि मंजूर करू शकाल.
- त्याच दिवसाची ॲडव्हान्स नोटिस: तुम्ही गेस्ट्सना त्याच दिवशी बुक करण्याची परवानगी दिल्यास, तुम्ही कट ऑफ वेळ सेट करता ज्यानंतर ते बुक करू शकत नाहीत. सकाळी 6:00 ते मध्यरात्री 12:00 दरम्यान कोणताही तास निवडा.
- तयारीची वेळ: प्रत्येक रिझर्व्हेशनच्या आधी आणि नंतर तुम्हाला किती रात्री ब्लॉक करायच्या आहेत ते निवडा. कोणतीही नाही, प्रत्येक रिझर्व्हेशनच्या आधी आणि नंतर 1 रात्र आणि प्रत्येक रिझर्व्हेशनच्या आधी आणि नंतर 2 रात्री हे यासाठीचे पर्याय आहेत.
- उपलब्धता विंडो: तुमची उपलब्धता वाढवल्याने गेस्ट्सना आणखी आधी बुकिंग करता येते आणि तुमची लिस्टिंग अधिक सर्च रिझल्ट्समध्ये दिसण्यात मदत होते. आजच्या तारखेपासून 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिने आणि 24 महिने यापैकी एक निवडा.
- अधिक उपलब्धता सेटिंग्ज: तुमच्याकडे आठवड्याच्या विशिष्ट दिवशी गेस्ट्सना चेक इन किंवा चेक आऊट करण्यापासून रोखण्याचा पर्याय आहे. तुम्ही त्या दिवसांमध्ये नेहमीच अनुपलब्ध असता हे तुम्हाला माहीत असल्यास, असे केल्याने तुमचे कॅलेंडर त्या दिवशी आगमने आणि निर्गमने ब्लॉक करते. तुम्ही आठवड्याचे एकाहून अधिक दिवस निवडू शकता परंतु दररोज नाही, कारण यामुळे गेस्ट्स तुमची जागा बुक करू शकणार नाहीत.
तुमचे कॅलेंडर्स कनेक्ट करणे
तुमचे सर्व होस्टिंग कॅलेंडर्स सिंक केल्याने एकाहून अधिक गेस्ट्सना समान तारखांचे बुकिंग करण्यापासून रोखण्यात मदत होते. जेव्हा एखाद्या रात्रीसाठी बुकिंग केले जाते तेव्हा हे दुहेरी कनेक्शन दोन्ही कॅलेंडर्स आपोआप अपडेट करते. तुमचे कॅलेंडर्स कनेक्ट करण्यासाठी:
- प्रदान केलेली Airbnb कॅलेंडर लिंक दुसऱ्या वेबसाईटवर जोडा.
- दुसऱ्या वेबसाईटवरून .ics असा शेवट असलेली लिंक मिळवा आणि ती तुमच्या Airbnb कॅलेंडरमध्ये जोडा.
तुमचे भाडे आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगळे असू शकतात.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.