प्रवास विमा आणि सहाय्य सेवा समजून घेणे
आपत्कालीन परिस्थिती आणि ट्रिपमध्ये अनपेक्षित व्यत्यय येतात. म्हणूनच Airbnb ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सहाय्य सेवा ऑफर करते.
यूएस आणि कॅनडामधील काही प्रांत आणि प्रदेशांमध्ये राहणारे गेस्ट्स ट्रिप बुक करताना विशिष्ट जोखमींपासून त्यांच्या रिझर्व्हेशनचा विमा उतरवू शकतात. एखाद्या कव्हर केलेल्या कारणामुळे त्यांनी कॅन्सल केल्यास, ते त्यांच्या रिफंड न झालेल्या Airbnb बुकिंग खर्चासाठी भरपाई मिळवण्यासाठी क्लेम करू शकतील.
यामुळे गेस्ट्सनी त्यांच्या होस्ट्सच्या कॅन्सलेशन धोरणांच्या अटींच्या बाहेर रिफंड मागण्याची शक्यता कमी होऊ शकते.
गेस्ट्स प्रवास संरक्षण कसे खरेदी करतात
क्युबेक आणि नुनावूट वगळता अमेरिका किंवा कॅनडामध्ये राहणाऱ्या गेस्ट्ससाठी प्रवास विमा आणि सहाय्य सेवा उपलब्ध आहेत.
या आणि इतर पात्र देशांमधील गेस्ट्सकडे रिझर्व्हेशन कन्फर्म करण्यापूर्वी आणि त्यासाठी पेमेंट करण्यापूर्वी Airbnb वर प्रवास संरक्षण खरेदी करण्याचा पर्याय आहे. अमेरिकेत, गेस्ट्स बुकिंगनंतरही प्रवास संरक्षण जोडू शकतात. खरेदी करण्यापूर्वी, त्यांचा प्लॅन साधारणपणे काय कव्हर करतो आणि काय कव्हर करत नाही याबद्दलच्या तपशिलांचा गेस्ट्स आढावा घेऊ शकतात.
गेस्ट प्रवास संरक्षणासाठी त्यांच्या बुकिंगच्या एकूण खर्चाच्या काही टक्के रक्कम देतात. त्यांच्या प्लॅनच्या किंमतीमध्ये वैद्यकीय रेफरल्स, प्रवास सहाय्य आणि ओळख चोरीचे रिझोल्यूशन यासारख्या सहाय्य सेवांसाठी शुल्क समाविष्ट आहे.
प्रवास संरक्षण खरेदी करणाऱ्या गेस्ट्सना त्यांच्या प्लॅनचे तपशील आणि क्लेम कसा दाखल करावा याबद्दलच्या माहितीसह एक ईमेल कन्फर्मेशन मिळते.
गेस्टच्या लोकेशनवर अवलंबून, प्लॅन्स Generali US Branch किंवा Europ Assistance S.A. Canada Branch द्वारा जारी केल्या जातात. दोन्ही अग्रगण्य बहुराष्ट्रीय विमा कंपनी Assicurazioni Generali S.p.A. चा भाग आहेत.
प्रवास विम्यात काय-काय कव्हर होते
विशिष्ट कव्हर केलेल्या घटनांमुळे त्यांच्या ट्रिपवर परिणाम झाल्यास, ट्रॅव्हल इन्शुरन्स गेस्ट्ससाठी त्यांच्या नॉन-रिफंडेबल बुकिंग खर्चाच्या 100% पर्यंत पेमेंटसह संरक्षण जोडते; अशा घटनांमध्ये खराब हवामान किंवा गंभीर आजार समाविष्ट असू शकतात.
उदाहरणार्थ, जर होस्टने त्यांच्या कॅन्सलेशन धोरणांतर्गत गेस्टच्या बुकिंग खर्चाच्या 50% रिफंड दिला तर, गेस्टने कव्हर केलेल्या कारणामुळे कॅन्सल केल्यास वास्तव्यासाठीच्या संरक्षणामुळे उर्वरित काही किंवा पूर्ण 50% खर्च रिफंड होऊ शकतो. गेस्टच्या क्लेमचे पेमेंट करण्यासाठी विमा प्रदाता होस्टकडून कोणतीही रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करणार नाही.
लोकेशननुसार कव्हरेज आणि नियम बदलू शकतात. मदत केंद्रामध्ये तुम्हाला अधिक तपशील मिळू शकतात:
ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सहाय्य सेवा गेस्ट्ससाठीच्या AirCover पेक्षा वेगळ्या आहेत, ज्या प्रत्येक बुकिंगसोबत दिल्या जातात. AirCover लिस्टिंगमधील चुकीचे तपशील किंवा चेक इन न करता येणे अशा अनपेक्षित समस्यांसाठी गेस्ट्सना संरक्षण देते.
अमेरिकेतील रहिवाशांसाठी: प्रवास संरक्षण प्लॅन Airbnb Insurance Agency LLC, 222 ब्रॉडवे, फ्लोअर 26, न्यूयॉर्क, NY 10038 (कॅलिफोर्निया लायसन्स नंबर 6001912) द्वारे ऑफर केला जातो, जी अमेरिकेची सर्व राज्ये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये विमा एजन्सी म्हणून परवानाप्राप्त आहे आणि प्रवास विमा कव्हरेजेस न्यूयॉर्क, NY च्या Generali US Branch द्वारे (NAIC # 11231) अंडरराईट केली जातात. विमा कव्हरेजेस आणि सहाय्य सेवांचे वर्णन सर्वसाधारणपणे केले जाते आणि त्यांना विशिष्ट अटी आणि अपवाद लागू होतात.
कॅनडाच्या रहिवाशांसाठी (क्युबेक आणि नुनावूट वगळता): प्रवास विमा Airbnb Canada Insurance Services Inc. द्वारा ऑफर केला जातो आणि Europ Assistance S.A. Canada Branch द्वारा अंडरराईट केला जातो. Airbnb Canada Insurance Services Inc. ही एक विमा एजन्सी म्हणून परवानाप्राप्त आहे आणि तिचे रजिस्टर्ड ऑफिस 1600-925 वेस्ट जॉर्जिया स्ट्रीट, व्हँकुव्हर, BC V6C 3L2, कॅनडा येथे आहे. प्रवास विम्याचे लाभ आणि सेवा ह्या नियम आणि अटींच्या अधीन आहेत आणि काही अपवाद लागू होतात.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदलली असू शकते.