आमचे प्राईसिंग टूल्स वापरून पहा

सवलती, प्रमोशन्स आणि कस्टम भाड्याचा वापर करून तुमच्या भाड्यावर नियंत्रण ठेवा.
Airbnb यांच्याद्वारे 9 जाने, 2025 रोजी
9 जाने, 2025 रोजी अपडेट केले
आमचे प्राईसिंग टूल्स वापरून पहा
तुमचे कॅलेंडर वापरणे
आमचे प्राईसिंग टूल्स वापरून पहा

Airbnb प्राईसिंग टूल्समुळे तुम्हाला तुमचे भाडे ॲडजस्ट करणे सोपे होते. ती तुम्हाला तुमच्या कॅलेंडरमध्ये मिळतील.

प्राईसिंग टूल्स आणि उपलब्धता सेटिंग्ज सहसा एकत्रितरीत्या काम करतात. तुम्हाला मासिक सवलती ऑफर करण्यासारखी काही टूल्स वापरायची असल्यास, तुम्हाला तुमची उपलब्धता बदलावी लागू शकते, जसे की दीर्घकालीन वास्तव्यांना परवानगी देणे.

तुमचे भाडे ॲडजस्ट करणे

तुमचे भाडे नियमितपणे तपासल्याने आणि ॲडजस्ट केल्याने तुमची कमाईची उद्दिष्टे पूर्ण करण्यात तुम्हाला मदत होऊ शकते.

तुम्ही तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमध्ये कधीही तुमच्या किमान भाड्यात बदल करू शकता. तुम्ही बदल करण्यासाठी नंबरवर टॅप केल्यावर, तुम्हाला करांपूर्वीचे गेस्ट भाडे आणि होस्ट सेवा शुल्क वजा केल्यानंतर तुम्ही किती कमाई कराल हे दोन्ही दिसतील.

तुमचे किमान भाडे फाईन-ट्यून करण्याचे तुमच्याकडे आणखी दोन मार्ग आहेत.

  • कस्टम वीकेंड भाडे: तुमच्याकडे शुक्रवार आणि शनिवार रात्रींसाठी वेगळे भाडे जोडण्याचा पर्याय आहे. वेगवेगळ्या रात्रींनुसार तुमच्या भाड्यात बदल केल्याने तुम्हाला जास्तीत जास्त बुकिंग्ज मिळवण्यात मदत होऊ शकते.
  • स्मार्ट रेट: स्थानिक मागणीनुसार तुमचे भाडे आपोआप ॲडजस्ट करण्यासाठी हे टूल कधीही चालू करा. हे तुमची लिस्टिंग, तुमचा प्रदेश आणि गेस्टच्या वर्तनाबद्दलच्या शेकडो घटकांचा वापर करते. तुम्ही तुमचे किमान आणि कमाल प्रति रात्र भाडे देखील सेट करू शकता.

सवलती आणि प्रमोशन्स ऑफर करणे

विशिष्ट प्रकारच्या बुकिंग्जसाठी तुमचे किमान भाडे काही टक्के कमी करणे हा गेस्ट्सना आकर्षित करण्याचा आणखी एक मार्ग आहे. तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमध्ये चार सवलती उपलब्ध आहेत.

  • साप्ताहिक: सात रात्री किंवा त्याहून अधिक कालावधीच्या वास्तव्यांसाठीच्या सवलतींमुळे तुमचे सर्च रँकिंग सुधारण्यात, तुमच्या कॅलेंडरमधील रिकाम्या तारखा भरण्यात आणि चेक आऊटनंतरची तयारी कमी वेळा करण्यात मदत होऊ शकते. गेस्ट्सना 10% किंवा त्याहून अधिकच्या साप्ताहिक सवलतींसाठी एक विशेष कॉलआऊट दिसतो. तुमचे सवलत दिलेले भाडे तुमच्या मूळ भाड्याच्या बाजूला दिसते, ज्यावर काट मारलेली असते.
  • मासिक: तुम्ही 28 रात्री किंवा त्याहून अधिक कालावधीच्या वास्तव्यांसाठी देखील सवलत देऊ शकता. यामुळे तुमच्या सर्व लिस्टिंग्जमध्ये वास्तव्याचा सरासरी कालावधी वाढू शकतो आणि चेक आऊटनंतरची तयारी कमी वेळा करावी लागू शकते. गेस्ट्सना 10% किंवा त्याहून अधिकच्या मासिक सवलतींसाठी समान विशेष कॉलआऊट दिसतो.
  • अर्ली बर्ड: चेक इनच्या 1 ते 24 महिने आधी केलेल्या बुकिंग्जवर सवलती तुम्हाला आधीपासून प्लॅन करणाऱ्या गेस्ट्सना आकर्षित करण्यात मदत करू शकतात. 3% किंवा त्याहून अधिकच्या अर्ली बर्ड सवलतींसाठी, गेस्ट्सना सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या लिस्टिंग पेजवर एक विशेष कॉलआऊट दिसतो.
  • अखेरच्या क्षणी: चेक इनच्या 1 ते 28 दिवस आधी केलेल्या बुकिंग्जवर सवलती दिल्याने तुमचे कॅलेंडर भरण्यात आणि तुमची कमाई वाढवण्यात मदत होऊ शकते. तुमच्या 60 दिवसांच्या सरासरी भाड्याच्या 10% किंवा त्याहून अधिक सवलतींसाठी, गेस्ट्सना सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या लिस्टिंग पेजवर एक विशेष कॉलआऊट दिसतो.

अल्पकालीन सवलती सेट केल्याने तुम्हाला तुमचे मूळ भाडे न बदलता अधिक बुकिंग्ज मिळवण्यात मदत होऊ शकते. तुमच्या पात्रतेवर अवलंबून, तुम्हाला दोन प्रकारचे प्रमोशन्स दिसू शकतात.

  • नवीन लिस्टिंग प्रमोशन: तुम्हाला तुमचे पहिले गेस्ट्स आणि रिव्ह्यूज मिळवण्यात मदत करण्यासाठी नवीन लिस्टिंगच्या तुमच्या पुढील तीन बुकिंग्जवर 20% ची सूट ऑफर करा.
  • कस्टम प्रमोशन: तुमच्या तारखा आणि तुम्ही देऊ इच्छित असलेली सवलत निवडा. काही आवश्यकता लागू होतात, जसे की तुमच्या लिस्टिंगला किमान तीन बुकिंग्ज मिळालेल्या असणे आणि त्यापैकी किमान एक गेल्या वर्षभरातील असणे आणि तुम्ही निवडलेल्या तारखा किमान 28 दिवसांसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही 15% किंवा त्याहून अधिक सवलत ऑफर करता तेव्हा गेस्ट्सना सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या लिस्टिंग पेजवर एक विशेष कॉलआऊट दिसतो.

ऐच्छिक शुल्क जोडणे

तुम्ही तुमच्या भाड्यात तीन प्रकारचे शुल्क जोडू शकता. लक्षात ठेवा की शुल्क तुमचे एकूण भाडे वाढवू शकतात आणि गेस्ट्सना बुकिंग करण्यापासून परावृत्त करू शकतात—त्यामुळे तुमची कमाई कमी होऊ शकते.

  • स्वच्छता शुल्क: हे एकवेळचे शुल्क आहे जे वास्तव्याचे एकूण भाडे वाढवते आणि चेक आऊट करताना स्वतंत्र शुल्क म्हणून दाखवले जाते. तुमच्याकडे एक ते दोन रात्रींच्या वास्तव्यांसाठी कमी स्वच्छता शुल्क सेट करण्याचा पर्याय आहे.
  • पाळीव प्राणी शुल्क: तुमच्याकडे प्रत्येक पाळीव प्राण्यासाठी प्रत्येक रात्रीसाठी किंवा प्रत्येक वास्तव्यासाठी हे शुल्क आकारण्याचा पर्याय आहे. तुम्ही गेस्टकडून मदतनीस प्राण्यासाठी पाळीव प्राणी शुल्क आकारू शकत नाही आणि गेस्ट्सनी बुकिंग करण्यापूर्वी मदतनीस प्राण्याची उपस्थिती जाहीर करणे आवश्यक नाही. Airbnb च्या ॲक्सेसिबिलिटी धोरणाबद्दल अधिक जाणून घ्या.
  • अतिरिक्त गेस्टसाठी शुल्क: तुम्ही एका विशिष्ट संख्येपेक्षा जास्त प्रत्येक गेस्टसाठी प्रति रात्र शुल्क आकारू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही सहा गेस्ट्सना तुमच्या प्रति रात्र भाड्यावर राहू देऊ शकता, परंतु तुमच्या जास्तीत जास्त गेस्ट मर्यादेच्या संख्येपर्यंत प्रत्येक अतिरिक्त गेस्टसाठी प्रति रात्र $10 जास्तीचे शुल्क आकारू शकता.

तुमचे भाडे आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगळे असू शकतात.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

आमचे प्राईसिंग टूल्स वापरून पहा
तुमचे कॅलेंडर वापरणे
आमचे प्राईसिंग टूल्स वापरून पहा
Airbnb
9 जाने, 2025
हे उपयुक्त ठरले का?