तुमच्या लिस्टिंगची कामगिरी सुधारण्यासाठी उद्दिष्टे सेट करणे

तुमची धोरणे पुढे नेण्यासाठी ही Airbnb टूल्स आणि सुपरहोस्टचे सल्ले वापरून पहा.
Airbnb यांच्याद्वारे 25 फेब्रु, 2022 रोजी
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
25 फेब्रु, 2022 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • तुमच्या इतिहासाचा, गेस्ट रिव्ह्यूजचा आणि स्थानिक ट्रेंड्सचा रिव्ह्यू केल्याने तुम्हाला यशाची योजना आखण्यात मदत होऊ शकते

  • तुम्ही तुमच्या होस्ट अकाऊंटमधून तुमच्या लिस्टिंगच्या कामगिरीचा मागोवा घेऊ शकता

  • नवीन उद्दिष्टे सेट केल्यानंतर, त्यांची पूर्तता करण्यासाठी तुमची लिस्टिंग अपडेट करा

तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा संकल्प कधीही करू शकता, तो फक्त जानेवारीतच करता येतो असे नाही. तुमची प्रगती नियमितपणे तपासणे—आणि आवश्यकतेनुसार तुमची रणनीती समायोजित करणे—हे वर्षभर यशस्वी राहण्याचे रहस्य आहे.

तुमचे होस्टिंग टूल्स आणि संसाधने तुमच्या लिस्टिंगच्या कामगिरीचा मागोवा ठेवणे सोपे करतात, इतर होस्ट्ससाठी काय काम करते हे जाणून घ्या, आणि तुम्हाला हवे तसे परिणाम साध्य करण्यासाठी ध्येय ठेवा.

तुमच्या लिस्टिंगचा परफॉर्मन्स ट्रॅक करा

तुमच्या प्रगतीचे मोजमाप केल्याशिवाय कशामुळे चांगले परिणाम येत आहेत हे जाणून घेणे कठीण आहे. माहिती गोळा करण्यासाठी, तुमचा होस्टिंग डॅशबोर्ड यासाठी वापरा:

  • तुमच्या बुकिंग्ज आणि कमाईवर विचार करा
  • गेस्ट रिव्ह्यूज मधील फीडबॅक वाचा
  • सध्याच्या स्थानिक प्रवासाच्या ट्रेंड्सचा अभ्यास करा

तुमच्या होस्टिंग डॅशबोर्डचा इन्साईट्स विभाग तुमची मासिक कमाई, बुक झालेल्या रात्री, गेस्ट रिव्ह्यूज आणि एकूण रेटिंगसह मूलभूत आकडेवारी देतो. या विभागात संधी केंद्र देखील आहे, जे तुमच्या लिस्टिंगच्या प्रदेशातील प्रवासाचे ट्रेंड्स दाखवते, जसे की गेस्ट्स सर्वात जास्त कशा प्रकारची प्रकारच्या वास्तव्याच्या जागा आणि सुविधा शोधत आहेत.

तुम्ही तुमच्या आकडेवारीवर विचार करत असताना, तुमची भाड्याची रणनीती आणि कॅलेंडरची उपलब्धता, तुमच्या भागातील सध्याच्या प्रवासाच्या ट्रेंड्स आणि हंगामीपणाचा किंवा पीक कालावधीचा पूर्ण फायदा घेते की नाही याचा विचार करा. तुम्ही तुमच्या गेस्ट्सचा फीडबॅकसुद्धा वापरू शकता.

“गेस्ट्सचे म्हणणे ऐकून घ्या,” स्पेनच्या बॅलेरिक द्वीपसमूहातील सुपरहोस्ट एलेनला सल्ला देतात. “ते तुम्हाला साधारण अपेक्षेपेक्षा काय कमी पडते आहे याबद्दल बरेच काही सांगू शकतात. सुधारणा करण्याचा परिणाम म्हणजे तुम्ही जास्त भाडे मागू शकाल.”

तुमच्या डेटाचा सखोल अभ्यास करण्यासाठी, तुमचे व्यावसायिक टूल्स चालू करून पहा म्हणजे तुम्ही परफॉर्मन्स डॅशबोर्ड ॲक्सेस करू शकाल. (तुम्ही तुमच्या अकाऊंट सेटिंग्ज मध्ये कधीही परत स्विच करू शकता.)

हे प्रो टूल्स तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स ट्रॅक करू देतात—ऑक्युपन्सी दर, सरासरी रात्रीचे भाडे, गेस्ट व्ह्यूज आणि बरेच काही—गेल्या वर्षभरात एकापेक्षा जास्त लिस्टिंग्जसाठी. तुमची कोणती होस्टिंग धोरणे सर्वात प्रभावी आहेत हे ओळखण्यात मदत करण्यासाठी तुम्ही तुमच्या मेट्रिक्सची तुलना समान लिस्टिंग्जशी देखील करू शकता.

दुर्दैवाने, मला माझे हिशोब माझ्या जागेइतके व्यवस्थित ठेवता येत नाहीत! यावर्षी माझे ध्येय माझी हिशोब ठेवायची पद्धत अधिक चांगली बनवणे आहे.
Superhost John,
मुन्सविल, न्यूयॉर्क

इतर होस्ट्ससाठी काय कार्य करते ते जाणून घ्या

एकदा तुम्ही तुमच्या लिस्टिंगचा परफॉर्मन्स सुधारण्यास कशामुळे मदत होऊ शकते हे ओळखल्यानंतर, बदल कसे करावे याबद्दल तुम्ही विचार करणे सुरू करू शकता. अगदी सुरवातीपासून सुरू करण्याऐवजी, तुम्ही इतर यशस्वी होस्ट्सच्या अनुभवांवरून शिकू शकता.

येथे रिसोर्स सेंटरमध्ये, तुम्ही बिझनेस प्लॅन बनविणे आणि बजेट सांभाळून सुविधा जोडणे यासारख्या विषयांवर सुपरहोस्टचे सल्ले शोधू शकता. किंवा तुमच्या होस्टिंगला पुढील स्तरावर नेण्यासाठी आमचे संपूर्ण मार्गदर्शक तपासा.

कम्युनिटी सेंटर मध्ये तुमच्या गरजेशी संबंधित पोस्ट्स शोधून तुम्ही इतर होस्ट्सकडून देखील शिकू शकता. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमचे पैसे व्यवस्थापित करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहात. न्यूयॉर्क सिटीच्या सुपरहोस्ट ॲनने कम्युनिटी पोस्ट मध्ये तिचा दृष्टीकोन मांडला आहे.

“दररोजच्या खर्चापेक्षा जास्त दररोजचे सरासरी उत्पन्न मिळवणे हे माझे पहिले ध्येय असते,” ॲन लिहिते. “मी रनिंग बेरीजसह असलेली स्प्रेडशीट ठेवते. गेल्या दोन वर्षांपासून मी नफ्यात आहे, त्यामुळे मला हा ट्रेंड सुरू ठेवायचा आहे.”

यशस्वी होण्यासाठी तुमची उद्दिष्टे ठरवा

पुढील वर्षासाठी तुम्ही एकत्रित केलेली सर्व माहिती ध्येयांमध्ये रूपांतरित करणे ही पुढील पायरी आहे. तुमच्या प्रगतीला चालना देण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि तुम्ही कोणत्या कृती करू शकता याचा विचार करा.

उदाहरणार्थ, येथे काही सामान्य ध्येय आणि त्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग आहेतः

1. तुमचे बुकिंग्ज आणि कमाई वाढवा
तुमच्या भाड्याची रणनीती अचूक करण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करावा लागतो. गेस्ट्सना आकर्षक वाटावे त्याचबरोबर तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पाळीव प्राण्यांसाठी शुल्क जोडणे किंवा दीर्घकालीन वास्तव्यासाठी सवलत देणे याचा विचार करा.

तुमच्या लिस्टिंगमध्ये वेळेप्रमाणे बदल केल्याने यशस्वी होस्टिंगच्या दिशेने बरेच पुढे जाता येते. पीक, उच्च आणि कमी हंगामात स्थानिक प्रवासाच्या ट्रेंड्सच्या आकलनासह, तुमच्या कॅलेंडरच्या उपलब्धतेची योजना करा.

तुमच्यासाठी कोणती गोष्ट सर्वात चांगला परिणाम देते यावर विचार करत असताना, बर्लिनचे सुपरहोस्ट अँड्र्यू शिफारस करतात की धीर धरा आणि गेस्टच्या समाधानाकडे लक्ष केंद्रित करा: “काही Airbnb लिस्टिंग्ज वर्षभर पूर्णपणे बुक केलेली असतात, पण तुमच्या जागेला नीट समजून घेणे आणि रिव्ह्यूज द्वारे प्रतिष्ठा वाढवणे यास साधारण एक पूर्ण वर्ष लागते.”

2. अधिक चांगले गेस्ट रिव्ह्यूज मिळवा
तुमचे लिस्टिंगचे वर्णन स्पष्ट अपेक्षा सेट करण्यासाठी आणि गेस्ट्सना हव्या असलेल्या सुविधा हायलाईट करण्यासाठी; जसे हाय-स्पीड वायफाय आणि लागणाऱ्या सर्व गोष्टी असलेले स्वयंपाकघर; झकपक करा. तुमच्या जागेची लोकांवर खरोखरच छाप पाडतील असे उच्च गुणवत्तेचे फोटोज खात्रीने जोडा.

“लिस्टिंग विकण्याचा जवळजवळ संपूर्ण भार लीड फोटोजवर असतो,” अँड्र्यू म्हणतात. “लक्ष वेधून घेणाऱ्या आकर्षक रंगांच्या स्पष्ट इमेजेस, लहान स्वरूपात जे दाखवायचे आहे ते पूर्ण दिसेल असे, आवश्यक आहेत.”

गेस्ट्स स्वच्छतेबद्दल अत्यंत जागरूक असतात: लखलखणारी स्वच्छ जागा सकारात्मक रिव्ह्यूज मिळवून देऊ शकते. तुमची जागा स्वच्छ आणि सॅनिटाइझ करण्यासाठी तुम्ही काय करत आहात हे शेअर करून गेस्ट्सना आश्वस्त करा.

3. तुमचा होस्टिंग नित्यक्रम सुलभ करा
वारंवार करावी लागणारी कामे हाताळण्यासाठी अधिक कार्यक्षम मार्ग शोधल्याने होस्ट करणे आणि तुमचे ध्येय गाठणे सोपे होऊ शकते. गेस्ट्ससह तुमचा संवाद स्वयंचलित करण्यासाठी झटपट उत्तरे आणि शेड्युल केलेले मेसेजेस वापरून पहा.

इतर वेळेची बचत करण्याच्या युक्त्यांमध्ये तुमची चेक इन प्रक्रिया सुलभ करणे, तुमचा साफसफाईचा नित्यक्रम सुलभ करणे आणि तुमच्या घराचे नियम स्पष्ट करणे यांचा समावेश आहे. “घराचे नियम अनाकलनीय जड कायदेशीर भाषेसारखे असू नयेत,” रिओ डी जनेरोचे सुपरहोस्ट जे. रेनाटो म्हणतात. “जर ते तसे असले, तर कोणीही त्यांना वाचणार नाही.”

तुमचे होस्टिंग करण्यामागचे ध्येय काहीही असले तरी ते साध्य करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही हजर आहोत—आणि हे तुमचे आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष बनवण्यासाठी.

या लेखात दिलेली माहिती पब्लिकेशन झाल्यानंतर कदाचित बदलली असेल.

हायलाइट्स

  • तुमच्या इतिहासाचा, गेस्ट रिव्ह्यूजचा आणि स्थानिक ट्रेंड्सचा रिव्ह्यू केल्याने तुम्हाला यशाची योजना आखण्यात मदत होऊ शकते

  • तुम्ही तुमच्या होस्ट अकाऊंटमधून तुमच्या लिस्टिंगच्या कामगिरीचा मागोवा घेऊ शकता

  • नवीन उद्दिष्टे सेट केल्यानंतर, त्यांची पूर्तता करण्यासाठी तुमची लिस्टिंग अपडेट करा

Airbnb
25 फेब्रु, 2022
हे उपयुक्त ठरले का?