सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

तुमचे भाडे धोरण सेट करणे

गेस्ट्सच्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी तुमची उपलब्धता ॲडजस्ट करा आणि सवलती ऑफर करा.
Airbnb यांच्याद्वारे 1 डिसें, 2020 रोजी
14 जुलै, 2025 रोजी अपडेट केले
तुमचे भाडे धोरण सेट करणे
स्पर्धात्मक भाडे ठेवणे
तुमचे भाडे धोरण सेट करणे

तुमचे भाडे आणि उपलब्धता नियमितपणे अपडेट केल्याने तुम्हाला स्पर्धात्मक राहण्यात आणि तुमची कमाईची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत होऊ शकते. तुम्ही तुमचे भाडे धोरण कसे तयार करू शकता याचे काही मार्ग येथे दिले आहेत.

नियमितपणे आढावा घ्या

तुम्ही तुमचे भाडे आणि उपलब्धता सेट करत असताना काही गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे असते.

  • अधिक रात्री खुल्या ठेवा: यामुळे तुमची लिस्टिंग जास्त सर्च रिझल्ट्समध्ये दिसण्यात मदत होते. तुमच्या सेटिंग्जमुळे तारखा ब्लॉक होत असल्यास, तुम्हाला त्या अनब्लॉक करण्यासाठीचे सल्ले मिळतील. उदाहरणार्थ, तुमचा वास्तव्याचा किमान कालावधी 5 रात्री असल्यास आणि तुमच्याकडे रिझर्व्हेशन्स दरम्यान बुकिंग नसलेल्या 4 रात्री असल्यास, तुम्हाला त्या रात्रींसाठी तुमच्या ट्रिपचा किमान कालावधी कमी करण्याचा सल्ला दिसेल.
  • तुमच्या उपलब्धता सेटिंग्ज अपडेट करा: यामुळे तुम्हाला तुमच्या सोयीच्या शेड्युलवर होस्ट करण्यात मदत होते. तुमचा ट्रिपचा कालावधी, ॲडव्हान्स नोटिस, तयारीचा वेळ आणि इतर अनेक बाबी सहज ॲडजस्ट करा.
  • भाडे सल्ले आणि मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज तपासा: या टूल्समुळे तुम्हाला वेगवेगळ्या दिवसांसाठी, सीझन्ससाठी आणि विशेष इव्हेंट्ससाठी स्पर्धात्मक भाडे ठरवण्यात मदत होते. तुम्ही स्मार्ट रेट वापरत असल्यास तुम्हाला भाडे सल्ले किंवा मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज दिसणार नाहीत.

“मला मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज पाहायला आवडते, जेणेकरून मी माझ्या भाड्यांची तुलना करू शकेन, माझे भाडे खूप जास्त किंवा खूप कमी नाही याची खात्री करू शकेन आणि आदर्श भाडे किती असावे हे जाणून घेऊ शकेन,” नेल्सन, कॅनडामधील एक सुपरहोस्ट कॅरेन म्हणतात.

तुमचे भाडे ॲडजस्ट करताना, गेस्ट्स देत असलेले एकूण भाडे लक्षात ठेवा, ज्यात तुम्ही जोडलेले कोणतेही शुल्क समाविष्ट असतात.

कमी गर्दीच्या वेळांसाठी तयारी करा

सर्वात लोकप्रिय लिस्टिंग्जनासुद्धा कमी मागणीच्या काळात बुकिंग्ज कमी मिळतात. तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यासाठी मदत करणारे काही मार्ग येथे दिले आहेत.

  • सवलती ऑफर करा: साप्ताहिक आणि मासिक सवलतींमुळे तुमचे कॅलेंडर भरण्यात आणि चेक आऊटनंतरची तयारी कमी वेळा करण्यात मदत होऊ शकते. अखेरची सवलत आगमनाच्या 1 ते 28 दिवस आधी बुकिंग करणाऱ्या गेस्ट्सना आकर्षित करू शकते.
  • ॲडव्हान्स नोटिसचा कालावधी कमी करा: गेस्ट्सना चेक इनच्या जवळ बुकिंग करू देणे तुम्हाला अधिक बुकिंग्ज आकर्षित करण्यात मदत करू शकते. तुम्हाला किती तयारी हवी आहे यावर अवलंबून कमीत कमी लीड वेळ निवडा, तुम्ही अगदी बुकिंगचाच दिवससुद्धा निवडू शकता.
  • अल्पकालीन वास्तव्यांना परवानगी द्या: तुमचा किमान ट्रिपचा कालावधी कमी केल्यास ते कमी कालावधीसाठी बुकिंग करणाऱ्या गेस्ट्सना आकर्षित करते. तुम्ही चेक इन कोणत्या दिवशी आहे याच्या आधारे वास्तव्याच्या किमान रात्री सेट करू शकता.

“मला निश्चितच कमी कालावधीच्या वास्तव्यांची अधिक बुकिंग्ज मिळत आहेत,” पाम स्प्रिंग्ज, कॅलिफोर्नियामधील सुपरहोस्ट जिमी म्हणतात. “अखेरच्या क्षणी बुक होणारी वास्तव्ये अशी असतात जी लोकांनी अनेकदा प्लॅन केलेली नसतात, त्यामुळे त्यांना 2 दिवसांची सुट्टीसुद्धा छान वाटते. ही लवचिकता लोकांना आकर्षित करते.”

जास्त गर्दीच्या वेळांचा जास्तीत जास्त फायदा उचला

गेस्ट्सची मागणी जास्त असतानाच्या वेळेचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यात अनेक Airbnb टूल्स तुम्हाला मदत करू शकतात. विचार करण्याजोग्या काही युक्त्या येथे दिल्या आहेत.

  • सुट्ट्या आणि विशेष इव्हेंट्सकडे लक्ष द्या: तुमच्या बुकिंग्ज आणि कमाई वाढवण्यात मदत करण्यासाठी मोठे कॉन्सर्ट्स, फेस्टिव्हल्स, स्पोर्ट्स इव्हेंट्स आणि इतर विशेष इव्हेंट्सपूर्वी तुमची उपलब्धता आणि भाडे अपडेट करा. तुमचे कॅलेंडर तुमच्या परिसरातील बहुतेक सुट्ट्या आणि महत्त्वाची इव्हेंट्स हायलाईट करते.
  • अर्ली बर्ड सवलत जोडा: आधीपासून प्लॅन करणाऱ्या गेस्ट्सना आकर्षित करण्यासाठी 1 ते 24 महिने आधी केलेल्या बुकिंग्जसाठी तुमचे भाडे कमी करा.
  • तुमचा उपलब्धतेचा कालावधी वाढवा: किमान कालावधी 3 महिन्यांपेक्षा जास्त ठेवल्यास तुमची लिस्टिंग जास्त सर्च रिझल्ट्समध्ये दिसेल. तुम्ही तुमचे कॅलेंडर दोन वर्षे आधीपासून खुले करू शकता.

“कधीकधी लोकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी वर्षभर आधी किंवा ख्रिसमससाठी 6 महिने आधी केलेली बुकिंग्ज मला मिळतात,” टारागोना, स्पेनमधील सुपरहोस्ट अ‍ॅन म्हणतात. “आगाऊ बुकिंग करणारे लोक सहसा कॅन्सल करत नाहीत. हे यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे की पुढे काय होणार आहे हे तुम्हाला कळेल.”

तुमची भाडी आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगळे असू शकतात.

होस्ट्सना मुलाखतींमध्ये भाग घेतल्याबद्दल पैसे देण्यात आले होते.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

तुमचे भाडे धोरण सेट करणे
स्पर्धात्मक भाडे ठेवणे
तुमचे भाडे धोरण सेट करणे
Airbnb
1 डिसें, 2020
हे उपयुक्त ठरले का?