Airbnb.org सह निर्वासित गेस्ट्सना होस्ट करण्याची तयारी करणे

तुमच्या कम्युनिटीमधील नवागत लोकांचे स्वागत करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे शोधा.
Airbnb यांच्याद्वारे 29 ऑग, 2019 रोजी
वाचण्यासाठी 5 मिनिटे लागतील
25 ऑग, 2023 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • Airbnb.org च्या वास्तव्याच्या जागांसाठी Airbnb सर्व शुल्क माफ करते

  • तुमचे गेस्ट्स आणि (जेथे लागू असेल तेथे) Airbnb.org चे ना-नफा भागीदार यांच्याशी संवाद साधल्याने होस्ट्स आणि गेस्ट्ससाठी एक सुरळीत प्रक्रिया सुनिश्चित करण्यात मदत होते

  • तुम्ही होस्ट करण्यापूर्वी Airbnb च्या कोविड-19 आरोग्य आणि सुरक्षा आवश्यकतांचा आढावा घ्या

नवीन देशात स्थलांतर करताना, निर्वासित आणि आश्रय मागणाऱ्यांना  अनेक लॉजिस्टिक्स समस्या हाताळण्यासह, जसे की कागदपत्रांना अंतिम रूप देणे आणि नोकरी शोधणे, एक नवीन संस्कृती समजून घेण्याचाही सामना करावा लागतो.  बरेचदा, Airbnb.org च्या ना-नफा भागीदारांचे केस-वर्कर्स निर्वासित क्लायंट्सना या महत्त्वपूर्ण कामांमध्ये मदत करतात आणि त्यांना कायमस्वरूपी घरे शोधण्यात मदत करतात. कधी कधी, निर्वासित आणि आश्रय मागणाऱ्यांना स्वतःच या समस्यांमधून मार्ग काढावा लागतो.

ते तात्पुरते नवीन वातावरणात स्थायिक होत असताना, त्यांची भविष्यासाठीची योजना होईपर्यंत आणि सामान्यपणाची भावना परत येईपर्यंत, होस्ट म्हणून त्यांना राहण्यासाठी एक सुरक्षित आणि आरामदायक जागा देऊन तुम्ही एखाद्याच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षणांचा भाग होऊ शकता.

या लेखात, आपल्या जीवनाची पुनर्बांधणी करणाऱ्या गेस्ट्सना होस्ट करण्यासाठी तुम्ही कसे तयार व्हावे याबद्दल टिप्स मिळतील. या शिफारसी, ज्यांनी निर्वासित गेस्ट्सचे स्वागत केले आहे अशा इतर होस्ट्सच्या आणि निर्वासित क्लायंट्सना मदत करणाऱ्या ना-नफा केसवर्कर्सच्या सल्ल्यांवर आधारित आहेत.

1. तुमच्या जागेबद्दलचे तपशील स्पष्टपणे कळवा

बुकिंग करण्यापूर्वी, Airbnb.org च्या ना-नफा भागीदार संस्थांपैकी एकीचा—जसे की IRC आणि HIAS—एखादा ना-नफा केसवर्कर किंवा सशुल्क बुकिंग व्हाउचर प्राप्त झालेला एखादा संभाव्य गेस्ट तुमच्या जागेच्या तपशीलांची पुष्टी करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधू शकतो. हे सुलभ करण्यासाठी, कृपया तुमच्या लिस्टिंगचे तपशील पूर्ण आणि वर्तमान स्थितीत असल्याची खात्री करा आणि कोणत्याही चौकशीला त्वरित प्रतिसाद द्या.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की निर्वासित संकटाच्या वेळी, जसे की सध्या युक्रेनचे लोक ज्याने प्रभावित झाले आहेत ते संकट, घरांची गरज तातडीची आणि त्वरित असते. काही प्रकरणांमध्ये, Airbnb.org बुकिंगच्या विनंत्या 30 दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी असू शकतात, ज्या गेस्टच्या प्रारंभिक संपर्कानंतर केवळ एक किंवा दोन दिवसांनी सुरू होतात.

बुकिंग प्रक्रियेदरम्यान, तुम्ही गेस्ट किंवा केसवर्करला प्रश्न विचारू शकता आणि गरज भासल्यास, तुम्हाला Airbnb.org च्या विशेष प्रशिक्षित सपोर्ट टीमचा ॲक्सेस देखील मिळेल.

2. निर्वासित गेस्ट्सना अतिरिक्त मदतीची आवश्यकता असू शकते हे समजून घ्या

ना-नफा भागीदार बरेचदा त्यांच्या क्लायंट्सना अन्न आणि वाहतुकीसारख्या आवश्यक मूलभूत गोष्टी आणि आरोग्यसेवा, जॉब प्लेसमेंट आणि दीर्घकालीन निवासस्थान सहाय्य यासारख्या महत्त्वाच्या सेवा पुरवतात.

युक्रेन निर्वासितांच्या पुनर्वसन प्रयत्नांच्या मोठ्या व्याप्तीमुळे, या सपोर्ट सेवांची मागणी अत्यंत जास्त आहे. गेस्ट्सना प्रथम स्वतः या मूलभूत गोष्टींची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले जाते, जेणेकरून सर्वात जास्त गरज असलेल्या व्यक्तींना सपोर्ट दिला जाऊ शकेल.

होस्ट म्हणून, तुम्ही तुमच्या गेस्ट्सना त्यांच्या नवीन कम्युनिटीशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठी स्थानिक संसाधनांबद्दल मार्गदर्शन करणे निवडू शकता, परंतु हे नक्कीच आवश्यक नाही.

कॅनडातील व्हँकुव्हर येथील होस्ट सारा सांगतात, "आई म्हणून मी प्रॅक्टिकल मोडमध्ये गेले. "त्यांना कपड्यांची गरज होती का? आपण फ्रीजमध्ये अन्न ठेवावे का? त्यांना किराणा खरेदीसाठी मदत लागेल का?" त्यांनी हे प्रश्न त्यांच्या गेस्ट्सच्या ना-नफा केसवर्करला पाठवले, ज्याने परत मेसेज करून सांगितले की ज्या कुटुंबाला त्या होस्ट करणार आहेत त्या कुटुंबाला अतिरिक्त ब्लँकेट्स आणि मुलांसाठी लहान खेळणी मिळाली तर आवडेल.

त्यांचा युक्रेनियन वारसा आणि Airbnb.org द्वारे निर्वासितांना होस्ट करण्याचा पूर्वीचा अनुभव असल्यामुळे, कॅनडातील ऑन्टारियोचे होस्ट अ‍ॅडम, युक्रेनमधील संघर्षातून पलायन करणाऱ्या लोकांना निवासस्थान पुरवण्यात तत्पर होते. स्वतःच्या जागेचे आणि त्यांनी व्यवस्थापित केलेल्या प्रॉपर्टीजचे होस्टिंग करण्याव्यतिरिक्त, अ‍ॅडम म्हणतात की दुकाने, चर्च आणि स्थानिक युक्रेनियन कम्युनिटी सेंटरमधील व्यावसायिक विकास वर्गांसारख्या त्यांच्या क्षेत्रातील युक्रेनियन संस्कृती आणि कम्युनिटीशी जोडून गेस्ट्सना त्यांचे जीवन पुन्हा उभारण्यासाठी मदत करण्यात त्यांना आनंद होतो. "मी त्यांना विचारत असे, 'तुम्ही तुमच्या देशात काय काम करत होतात?' आणि त्यांना योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत असे," असे ते सांगतात.

3. गोपनीयतेची काळजी घ्या

प्रत्येक व्यक्ती किंवा कुटुंबाची गोपनीयतेची पसंती इतर कोणत्याही Airbnb गेस्ट प्रमाणेच बदलू शकते. गेस्ट्स खाजगीरित्या आराम करू शकतील किंवा एक कुटुंब म्हणून कनेक्ट होऊ शकतील अशा तुमच्या घरातील जागा— जसे की डेन, अंगण किंवा इतर जागा— ओळखण्याने संक्रमण सुलभ होऊ शकते आणि त्यांना आपलेपणा वाटण्यात मदत होऊ शकते.

“[आम्ही होस्ट केलेले] कुटुंब त्यांना पाहिजे तितके स्वावलंबी किंवा सामाजिक होऊ शकत असे," सारा म्हणतात. "आम्ही त्यांना बागेत पाहिले किंवा किराणा सामान घेऊन येताना बघितले तर आम्ही मैत्रीपूर्ण बोलत असू, परंतु आम्ही त्यांना त्यांच्या स्वत:च्या गोष्टी करण्यासाठी मोकळीक दिली."

4. कोविड-19 आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉल्स पाळा

Airbnb ने होस्ट्सना सुरक्षित वास्तव्य देण्यात मदत करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोग्राम्स सादर केले आहेत. येथे काही प्रमुख निष्कर्ष आहेत:

  • स्थानिक कायदे आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक असल्यास मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा
  • प्रत्येक वास्तव्यादरम्यान Airbnb च्या पाच पायऱ्यांच्या सुधारित स्वच्छता प्रक्रियेचे पालन करा
  • तुम्ही कोविड-19 च्या संपर्कात आला असाल किंवा तुमच्यात त्याची लक्षणे असतील तर प्रवास किंवा होस्ट करू नका
Airbnb च्या कोविड -19 आरोग्य आणि सुरक्षा आवश्यकतांबद्दल अधिक जाणून घ्या

5. आणखी संसाधने मिळवा

निर्वासित गेस्ट्सना त्यांच्या प्रवासादरम्यान अतिशय कठीण अडचणींचा सामना करावा लागला असेल. तुम्हाला निर्वासितांच्या अनुभवांबद्दल अधिक जाणून घेण्यात स्वारस्य असल्यास, आमच्या ना-नफा भागीदारांनी शिफारस केलेली ही संसाधने पहा:

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

युक्रेनमधून पलायन करणारे लोक त्यांचे तात्पुरते मुक्काम कसे बुक करत आहेत?
एकदा एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला तात्पुरत्या निवासस्थानाची गरज आहे असे ओळखले गेले की, एक ना-नफा केसवर्कर त्यांना वास्तव्य बुक करण्यात मदत करू शकेल किंवा गेस्टला बुकिंग व्हाऊचर मिळू शकेल, ज्यामुळे ते स्वतः तात्पुरती निवासस्थाने बुक करू शकतील.

जेव्हा Airbnb.org द्वारे आपत्कालीन निवासस्थानासाठी एखादी रिझर्व्हेशनची विनंती येईल तेव्हा बुकिंग प्रक्रियेदरम्यान होस्ट्सना सूचित केले जाऊ शकते.

निर्वासित गेस्ट्सना मी किती काळासाठी निवासस्थान पुरवणे अपेक्षित आहे?
Airbnb. org वास्तव्ये सहसा काही दिवसांपासून काही आठवड्यांपर्यंत बुक केली जातात. तथापि, लाखो लोक युक्रेनमधून पलायन करत असताना, ना-नफा संस्था आणि सरकारी एजन्सीज मोठ्या प्रमाणात मदतीच्या विनंत्या हाताळत आहेत, ज्यामुळे काही गेस्ट्सना 30 दिवस किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्ये पुरवण्याची गरज असते.

काही शहरांनी निर्वासितांच्या निवासस्थानासाठी राहण्याच्या कालावधीच्या मर्यादा माफ केल्या आहेत— तुमच्या भागात कोणते नियम लागू होतात हे जाणून घेण्यासाठी, कृपया संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

निर्वासित गेस्ट्सचे वास्तव्य संपल्यानंतर काय होते?
एखाद्या निर्वासित गेस्टच्या तात्पुरत्या वास्तव्यादरम्यान, ते दीर्घकालीन निवासस्थाने शोधण्यासह नवीन ठिकाणी त्यांचे जीवन स्थापित करण्यासाठी पुढील पायर्‍यांची योजना आखण्याचे काम करत असतील.

गेस्ट्सना Airbnb.org च्या विशेष सपोर्ट टीमचा थेट ॲक्सेस आहे, जे आवश्यक असल्यास अतिरिक्त सपोर्टसाठी स्थानिक ना-नफा संस्थांसोबत काम करतात.

युक्रेन संकटाच्या अभूतपूर्व व्याप्तीमुळे, ना-नफा संस्थांनी सर्वोच्च गरज असणार्‍या म्हणून मूल्यांकन केलेल्या व्यक्तींना अतिरिक्त मदत देण्यास प्राधान्य दिले पाहिजे. या वेळी, प्रत्येक गेस्टला दीर्घकालीन सपोर्ट मिळू शकेल याची खात्री करणे अशक्य आहे.

एखाद्या गेस्टना त्यांच्या वास्तव्याच्या शेवटी अतिरिक्त तात्पुरत्या निवासस्थानाची आवश्यकता भासल्यास, ते दोन आठवड्यांपर्यंतच्या अतिरिक्त निवासस्थानाची विनंती करण्यासाठी Airbnb.org शी संपर्क साधू शकतात.

लोक आपत्कालीन वास्तव्यासाठीपात्र कसे होतात?
Airbnb.org अनेकदा संभाव्य गेस्ट्सच्या गरजा आणि पात्रतेचे मूल्यांकन करण्यासह, प्रत्यक्ष सपोर्ट पुरवण्यासाठी संकटकालीन व्यवस्थापन आणि निर्वासितांच्या पुनर्वसनात तज्ञ असलेल्या ना-नफा संस्था आणि पुनर्वसन एजन्सीजसोबत काम करते.

स्वतःहून तात्पुरती निवासस्थाने बुक करणाऱ्या Airbnb.org गेस्ट्सना Airbnb अकाऊंट सेट अप करणे आवश्यक आहे, ज्यात आयडेंटिटी व्हेरिफिकेशन तपासणीचा समावेश असू शकतो.

Airbnb.org होस्टिंगचा माझ्या सुपरहोस्ट स्टेटसवर कसा परिणाम होतो?
1 एप्रिल 2022 सुपरहोस्ट मूल्यांकनासाठी (1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंतच्या डेटासह):

  • Airbnb.org बुकिंग्ज तुमच्या एकूण वास्तव्यांमध्ये जोडली जातील.
  • Airbnb.org च्या बुकिंग्जचा रिव्ह्यूज, कॅन्सलेशन्स आणि प्रतिसादक्षमता यासह त्रैमासिक सुपरहोस्ट मूल्यांकनादरम्यान विचारात घेतल्या जाणार्‍या इतर घटकांवर परिणाम होणार नाही.
सुरुवात करण्यास तयार आहात? Airbnb.org द्वारे गरजेच्या वेळी एकमेकांची मदत करण्याची क्षमता अनलॉक करणार्‍या या वाढत्या कम्युनिटीमध्ये सामील व्हा.

हायलाइट्स

  • Airbnb.org च्या वास्तव्याच्या जागांसाठी Airbnb सर्व शुल्क माफ करते

  • तुमचे गेस्ट्स आणि (जेथे लागू असेल तेथे) Airbnb.org चे ना-नफा भागीदार यांच्याशी संवाद साधल्याने होस्ट्स आणि गेस्ट्ससाठी एक सुरळीत प्रक्रिया सुनिश्चित करण्यात मदत होते

  • तुम्ही होस्ट करण्यापूर्वी Airbnb च्या कोविड-19 आरोग्य आणि सुरक्षा आवश्यकतांचा आढावा घ्या

Airbnb
29 ऑग, 2019
हे उपयुक्त ठरले का?