उपयुक्त घराचे नियम सेट करणे

तुमच्या घराचे रक्षण करण्यात आणि गेस्ट्ससाठी एक चांगला अनुभव तयार करण्यात मदत करा.
Airbnb यांच्याद्वारे 1 डिसें, 2020 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
4 फेब्रु, 2025 रोजी अपडेट केले

तुमच्या घराचे नियम गेस्ट्ससाठी अपेक्षा सेट करतात आणि त्यांना तुमच्या होस्टिंग शैलीचे पूर्वावलोकन देतात. गेस्ट्स तुमची जागा बुक करण्यापूर्वी त्यांच्यासाठी ती योग्य आहे का याचे मुल्याकंन करण्यासाठी देखील हे नियम गेस्ट्सची मदत करतात.

तुमच्या स्टॅंडर्ड घराचे नियम निवडणे

होस्ट्स या प्रदेशांमधील घराच्या नियमांच्या स्टँडर्ड संचामधून निवडू शकतात:

  • पाळीव प्राणी
  • इव्हेंट्स
  • धूम्रपान, व्हेपिंग आणि ई-सिगरेट्स <
  • शांतता राखण्याची वेळ 
  • चेक इन आणि चेक आऊटच्या वेळा
  • गेस्ट्सची कमाल संख्या
  • कमर्शियल फोटोग्राफी आणि चित्रीकरण 

तुमच्या घराचे नियम चार ठिकाणी ठळकपणे दिसतात: तुमच्या लिस्टिंग पेजवर, गेस्ट्स तुमची जागा बुक करतात तेव्हा स्क्रीनवर, गेस्ट्सच्या पॅक युवर बॅग्जच्या ईमेलमध्ये आणि गेस्ट्सना त्यांच्या ट्रिपपूर्वी मिळणाऱ्या आगमनाच्या गाईडमध्ये. 

घराचे नियम तुमचे संरक्षण कसे करतात

गेस्ट्ससाठी मुख्य नियमांसह, तुम्ही घराच्या स्टँडर्ड नियमांच्या यादीतून निवडलेला कोणताही नियम लागू केला जाऊ शकतो. एखाद्या गेस्टने घराच्या नियमाचे उल्लंघन केल्यास, तुमची पहिली पायरी म्हणजे गेस्टशी संवाद साधणे आणि थेट समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे. तुम्ही निराकरण करू शकत नसल्यास, मदतीसाठी कम्युनिटी सपोर्टशी संपर्क साधा.

अतिरिक्त नियम लिहिणे

तुमच्याकडे घराच्या नियमांच्या स्टँडर्ड संचामध्ये समाविष्ट नसलेल्या विशेष आवश्यकता असल्यास, तुम्ही त्या अतिरिक्त नियमांमध्ये लिहू शकता. बरेच नियम ठेवून गेस्ट्सना भांबावून टाकू नका, परंतु तुम्ही स्थानिक रीतिरिवाज किंवा आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दल काहीही महत्त्वाचे नियम जोडू शकता. होस्ट्सकडून काही उदाहरणे:  

  • “आमच्याकडे फुटपाथ नाहीत, आमच्या इथे माती आहे, घरी कार्पेट असल्यामुळे आम्ही शूज काढून ठेवण्यास सांगतो,” केनियाच्या नैरोबी येथील होस्ट सल्लागार बोर्डच्या सदस्या ज्युलिएट म्हणतात. 
  • “तुम्ही सूट सोडता तेव्हा कृपया सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा आणि लॉक करा,” कॅनडातील एडमंटनमधील होस्ट्स डेव्ह आणि डेब म्हणतात.
  • “कृपया बेडरूममध्ये कोणतेही खाद्यपदार्थ ठेवू नका,” होनोलुलूमधील होस्ट मोमी म्हणतात.

आमच्या सेवेच्या अटी आणि भेदभाव-विरोधी धोरणासह सर्व अतिरिक्त नियमांनी Airbnb ची धोरणे आणि अटींशी एकरूप असणे आवश्यक आहे.

पब्लिश झाल्यानंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.

Airbnb
1 डिसें, 2020
हे उपयुक्त ठरले का?