सादर करत आहोत लिस्टिंग टॅब

तुमची लिस्टिंग मॅनेज करण्यासाठी आणि तुमच्या घराचे तपशील दाखवण्यासाठी नवीन टूल्सचा सेट.
Airbnb यांच्याद्वारे 8 नोव्हें, 2023 रोजी
4 मिनिटांचा व्हिडिओ
3 एप्रि, 2025 रोजी अपडेट केले

एडिटरची टीपः हा लेख 2023 च्या विंटर रिलीझचा भाग म्हणून प्रकाशित झाला होता. प्रकाशनानंतर कदाचित माहितीमध्ये बदल झालेला असू शकेल. आमच्या नवीनतम उत्पादन रिलीझबद्दल अधिक जाणून घ्या.

लिस्टिंग मॅनेज करणे हा होस्टिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे कारण यामुळेच गेस्ट्सना तुमच्या घराबद्दल जाणून घेता येते. अधिकाधिक तपशील असलेल्या लिस्टिंग्जना 20% अधिक बुकिंग्ज मिळू शकतात, हे आम्हाला आढळून आले आहे. परंतु बर्‍याच लिस्टिंग्जमध्ये तपशील जोडणे अवघड झाल्यामुळे गेस्ट्सना हवे असलेले तपशीलच नसतात 

म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमचे लिस्टिंग सहज मॅनेज करू देणारा आणि तुमच्या घराचे तपशील शोकेस करणार्‍या नवीन टूल्सचा संच—लिस्टिंग्स टॅब सादर करत आहोत.

नवीन लिस्टिंग्ज टॅबची मुख्य वैशिष्ट्ये येथे दिली आहेतः

  • लिस्टिंग एडिटरतुमच्या लिस्टिंगबाबतचे तपशील जोडणे सोपे करते ज्यामध्ये—सुविधा, झोपण्याची व्यवस्था आणि बर्‍याच गोष्टींचा समावेश होतो. पुन्हा डिझाइन केलेला इंटरफेस गेस्ट्सना चेक-इन करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या आगमनाच्या माहितीमध्ये बदल करणे देखील सोपे करतो. 
  • AI-समर्थित फोटोटूरतुम्हाला तुमच्या लिस्टिंगची फोटो टूर त्वरित तयार करण्यात मदत करते. गेस्ट्सना तुमच्या घराचा लेआउट समजण्यास मदत करण्यासाठी ते रूमनुसार फोटो आयोजित करते. तुम्ही तुमच्या फोटो टूरमध्ये कधीही बदल करू शकता आणि प्रत्येक रूममध्ये सुविधा जोडू शकता.
  • स्मार्ट लॉक इंटिग्रेशनमुळे तुम्हाला तुमच्या Airbnb अकाऊंटशी सुसंगत स्मार्ट लॉक्स कनेक्ट करता येतात आणि प्रत्येक रिझर्वेशनसाठी एक युनिक कोड आपोआप तयार करता येतो.

लिस्टिंग्ज टॅबसह सुरुवात करणे

तुमच्या नेव्हिगेशन बारच्या मध्यभागी असलेल्या लिस्टिंग्ज टॅबवर

टॅप करा. आता तुम्ही लिस्टिंग एडिटरमध्ये आहात. रीडिझाइन केलेले टूल हे तुम्ही तुमच्या लिस्टिंगमध्ये माहिती जोडणे सुलभ करते आणि तपशील दाखवण्याच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल टिप्स देते.

लिस्टिंग एडिटरचे दोन विभाग आहेत: 

  • तुमची जागा मध्ये तुम्ही तुमचे लिस्टिंग पेज मॅनेज करता आणि तुमच्या घराबद्दलचे तपशील जोडता. 

  • तुम्हाला गेस्ट्सनी चेक इन करण्यापूर्वी आवश्यक असलेले तपशील

    आगमन गाईड मध्ये जोडता येतात.

तुमची जागा

तुम्ही तुमच्या लिस्टिंगचे शीर्षक, वर्णन आणि सुविधा यांसारखे तुमच्या घराबद्दलचे तपशील येथे जोडाल.

सुविधा जोडणे
तुमच्या लिस्टिंगमध्ये सुविधा जोडणे आता पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे. सुविधा वर जा आणि प्लस (+)चिन्हावर टॅप करा. तुम्ही एंटरटेनमेंट, फॅमिली आणि आऊटडोअरसह जवळपास 150 सुविधा अक्षरांच्या क्रमाने किंवा कॅटेगरीनुसार पाहू शकता. तुम्ही सुविधांना नावाद्वारे देखील शोधू शकता—स्क्रोलिंगची आवश्यकता नाही. तुमच्या घराच्या कोणत्याही वैशिष्ट्याच्या पुढे असलेले प्लस चिन्ह निवडा.

फोटो टूर तयार करणे
उच्च-गुणवत्तेचे फोटोज हे एका उत्कृष्ठ लिस्टिंगच्या सर्वात महत्वाच्या भागांपैकी एक आहेत. ते गेस्ट्सचे लक्ष वेधून घेतात आणि अधिक बुकिंग आकर्षित करण्यात उपयुक्त ठरू शकतात.

गेस्ट्सना तुमच्या घराचा लेआउट समजण्यात मदत करण्यासाठी तुम्ही तुमच्या लिस्टिंगमधील फोटोंना फोटो टूरमध्ये त्वरित आयोजित करण्यासाठी नवीन AI-समर्थित फोटो टूरचा वापर करू शकता. तुम्हाला फक्त तुमची फोटो टूर तयार करा वर टॅप करायचे आहे. बस्स,झाले.

कस्टम AI इंजिन अंतर्गत आणि बाह्यभागाचे फोटो ओळखते आणि प्रत्येक इमेज 19 प्रकारच्या रूम्स आणि इतर जागांना आपोआप नियुक्त करते.

त्यानंतर, तुम्ही प्रत्येक खोलीबाबत तपशील जोडू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही बेडरूममध्ये एक किंग-साईझ बेड आहे किंवा लिव्हिंग रूममध्ये टिव्ही आहे हे जोडू शकता. तुम्ही या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांविषयीची माहिती देखील समाविष्ट करू शकता.

तुम्ही फोटो काढून, हलवून किंवा जोडून कधीही तुमच्या फोटो टूरमध्ये बदल करू शकता. तुम्ही बदल करणे पूर्ण केल्यानंतर, पहा बटणावर टॅप करून तुमच्या लिस्टिंगचा प्रिव्ह्यू बघा.

आगमनाचे गाईड

गेस्ट्सनी बुक केल्यावर आणि ते येण्यापूर्वी त्यांना आवश्यक असलेले तपशील तुम्ही येथे जोडाल, ज्यामध्ये चेक-इनची वेळ आणि कोणतेही विशेष दिशानिर्देश किंवा पार्किंगबाबतच्या सूचनांंचा समावेश असेल. आणि पहिल्यांदाच, तुमच्या गेस्ट प्रमाणेच तुम्हीही तुमच्या आगमनाची माहिती पाहू शकाल. फक्त पहा बटणावर टॅप करा.

आगमन मार्गदर्शकासह चेक-इनचे तपशील दिल्यामुळे
तुम्ही बुकिंग केल्यानंतर गेस्ट्ससोबत चेक-इन तपशील सहजरीत्या शेअर करू शकता. तुम्ही तुमची चेक इन पद्धत आणि वेळ, दिशानिर्देश, सुविधा सूची, वायफायचा पासवर्ड आणि बरेच काही-सर्व एकाच ठिकाणी सेट किंवा ॲडजस्ट करू शकता. 

तुमचे स्मार्ट लॉक कनेक्ट करणे
तुम्ही लवकरच तुमच्या Airbnb अकाऊंटला स्मार्ट लॉक कनेक्ट करू शकाल आणि प्रत्येक रिझर्व्हेशनसाठी एक विशिष्ट डोअर कोड आपोआप तयार करू शकाल. बुकिंग्ज दरम्यान यापुढे कोड्स स्वतः बदलावे लागणार नाहीत. 

गेस्ट्सना हा कोड Airbnb वरील त्यांच्या रिझर्व्हेशनच्या तपशीलांमध्ये दिसेल आणि तो कसा एंटर करायचा अशा तपशीलांसह असेल. त्यांनी बुक केल्यावर त्यांना ईमेलमध्ये त्यांचा डोअर कोड देखील मिळेल आणि चेक इन करण्याची वेळ आल्यावर त्यांना एक नोटिफिकेशन येईल. प्रत्येक कोड फक्त गेस्ट्सच्या वास्तव्यादरम्यान सक्रिय असतो. तुम्ही तुमच्या गेस्ट्ससाठी ही वेळ स्वतः अ‍ॅडजस्ट केली नसल्यास चेकआऊटनंतर 30 मिनिटांनी कोड्सची मुदत संपते.

2024 च्या सुरुवातीस अमेरिका आणि कॅनडामधील लिस्टिंग्ज असलेल्या होस्ट्ससोबत आणि Schlage च्या काही लॉक्ससह स्मार्ट लॉक इंटिग्रेशन सुरू करण्यात येईल. जेव्हा ते तुमच्या लोकेशनला उपलब्ध असेल, तेव्हा तुम्हाला ते चेक इन पद्धतीमध्ये दिसेल. फक्त तुमच्या घराचे स्मार्ट लॉक तुमच्या Airbnb लिस्टिंगशी कनेक्ट करण्याच्या सूचनांचे पालन करा.

Airbnb
8 नोव्हें, 2023
हे उपयुक्त ठरले का?