तुम्हाला वाईट रिव्ह्यू मिळाल्यास काय करावे
वाईट रिव्ह्यूजमुळे निराश वाटू शकते, परंतु टॉप रेटिंग असलेल्या होस्ट्सनासुद्धा ते अधूनमधून मिळतात. गेस्टचा नकारात्मक फीडबॅक हाताळण्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत.
वाईट रिव्ह्यूजना प्रतिसाद देणे
सार्वजनिक प्रतिसाद दिल्याने तुम्ही सूचना स्वीकारण्यासाठी तयार आहात हे गेस्ट्सना दाखवता येते. एक छोटासा, मैत्रीपूर्ण प्रतिसाद दिल्याने इतर गेस्ट्सना दिलासा मिळू शकतो की तुम्ही त्यांच्या अनुभवाची पर्वा करता.
“मला नाही वाटत की कोणत्याही होस्टला 100% उत्तम रिव्ह्यूज मिळतील,” स्वतःदेखील एक सुपरहोस्ट असलेले बर्लिनमधील गेस्ट अँड्र्यू म्हणतात. “टीकात्मक फीडबॅक गांभीर्याने घेणाऱ्या लोकांचे मला अधिक कौतुक वाटते.”
वाईट रिव्ह्यूजना प्रतिसाद देण्यासाठी या टिप्सवर विचार करा:
- गेस्ट्सना त्यांच्या फीडबॅकबद्दल धन्यवाद द्या. हे इतके साधे असू शकते: “तुमच्या रिव्ह्यूबद्दल धन्यवाद. तुम्ही तुमच्या ट्रिपवर विचार करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.”
- तुम्ही तुमची जागा कशी सुधारत आहात ते शेअर करा. तुम्ही लिहू शकता: “बेड्स आरामदायक नव्हते याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुमची झोप महत्त्वाची आहे, म्हणून आम्ही आता मॅट्रेस टॉपर्स जोडले आहेत.”
तुम्हाला मिळालेला कोणताही रिव्ह्यू आमच्या रिव्ह्यूज धोरणाचे पालन करत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही तो काढून टाकण्याची विनंती करू शकता, जसे की सूडभावनेतून दिलेला रिव्ह्यू.
पुढे वाटचाल करताना सुधारणा करणे
गेस्ट्सनी पाचपेक्षा कमी स्टार देण्यामागील सर्वात सामान्य कारणे म्हणजे अचूकतेबाबत आणि स्वच्छतेबाबत समस्या. गेस्टचा फीडबॅक तुमच्या होस्टिंगमध्ये अधिक सुधारणा करण्याची संधी म्हणून वापरा.
तुम्ही सुधारणा करण्यासाठी नेहमीच तयार असता, असे गेस्ट्सना दाखवण्याचे काही मार्ग येथे दिले आहेत:
- फीडबॅककडे एक संधी म्हणून पहा. गेस्ट्स कदाचित तुम्ही विचारात न घेतलेले दृष्टिकोन लक्षात आणून देतात, उदा. तुम्ही चेक इन सुलभ करू शकता किंवा अधिक टॉवेल्स ठेवू शकता.
पारदर्शक रहा. तुम्ही सध्या काय ऑफर करत आहात, ते दर्शवण्यासाठी तुमचे फोटो आणि लिस्टिंगचे वर्णन अप टू डेट ठेवा. संभाव्य समस्यांवर तुम्ही कशी मात करता ते सांगा, उदा. तुमच्या रस्त्यावर गोंगाट असल्यास गेस्ट्सना इअरप्लग देणे.
- आपलेपणाने होस्टिंग करा. लिंग निरपेक्ष भाषा वापरून आणि ॲक्सेसिबल वैशिष्ट्ये हायलाईट करून प्रत्येक गेस्टला आपलेपणा वाटेल, यावर लक्ष केंद्रित करा.
- गेस्ट्सच्या वास्तव्यादरम्यान त्यांच्याशी संवाद साधा. सर्व काही ठीक आहे का, हे विचारण्यासाठी शेड्युल केलेले मेसेजेस वापरा आणि कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करा.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.