अनुभव होस्टिंग करून तुमचा बिझनेस कसा वाढवावा
होममेड ब्रेकफास्ट्स, वॉकिंग टूर्स, जवळपासच्या ॲक्टिव्हिटीज आणि बरेच काही—गेस्ट्सचे स्वागत करताना सुपरहोस्ट्स कोणतीही कसर सोडत नाहीत. खरं तर, सुमारे 30%* Airbnb होम होस्ट्सनी गेस्ट्सना टूर्स आणि अॅक्टिव्हिटीज ऑफर केल्या आहेत. आणि काही होस्ट्सनी या ऑफर्सचे अनुभवांमध्ये रूपांतर करून त्यांना अधिकृत बनवले आहे.
सुपरहोस्ट्स पॅट्रिशिया रामोस आणि ऑस्कर फर्नांडिसचे उदाहरण नजरेसमोर ठेवा, जे क्युबामधील पहिल्या अनुभव होस्ट्सपैकी एक होते. युनिव्हर्सिटी ऑफ हवानामध्ये दोघेही अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या या जोडप्याने, होम होस्ट्स म्हणून सुरुवात केली. आता, ते चार अनुभव देखील होस्ट करतात: हवाना आणि ग्रामीण भागातील दोन दिवसांचे सांस्कृतिक साहस, अस्सल हवानाचा अनुभव देणारी अर्धा दिवसाची पायी फिरण्याची टूर, क्युबन ग्रामीण भागात कॉफी उगवणे, पशुपालन करणे आणि शेती करण्यासाठी एका दिवसाची सहल, तसेच क्युबन अर्थव्यवस्था आणि समाजाबद्दल क्युबा लिब्रेस किंवा पसंतीच्या पेयाचा आनंद लुटत दोन तासांची चर्चा. तसेच, “आम्ही मित्रांना इतर 15 अनुभव होस्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे,” ऑस्कर म्हणाले.
पॅट्रिशिया आणि ऑस्कर यांनी त्यांच्या उद्योजकतेला पुढील स्तरावर कसे नेले याबद्दल आम्हाला सांगितले.
तर, तुम्ही तुमच्या अनुभवांची सुरुवात कशी केली?
ऑस्कर: “तर, आम्ही प्रत्येक चेक इनच्या वेळी प्रत्येक गेस्टसोबत दोन तास घालवत होतो कारण आम्हाला क्युबाबद्दल माहित असलेल्या सर्व गोष्टी त्यांना सांगायच्या होत्या. आणि आम्हाला ते करण्यात खूप आनंद येत होता कारण आम्हाला वाटत होते की आम्ही प्राध्यापक आहोत फक्त विद्यार्थी नवीन प्रकारचे आहेत."
पॅट्रिशिया: “मग लोकांनी आमच्याबद्दल रिव्ह्यू देण्यास सुरुवात केली आणि [आमच्या उत्स्फूर्त टूर्स] बद्दल लिहिले. म्हणून जेव्हा Airbnb ने क्युबामध्ये अनुभव सुरू केले, तेव्हा आम्ही विचार केला, ‘आपण चेक इनच्या वेळी करतो तसाच अनुभव आपण का तयार करत नाही?"
तुमच्या पहिल्या बिइंग क्युबन अॅडव्हेंचर अनुभवाविषयी आम्हाला सांगा. हा कशामुळे युनिक आहे?
पॅट्रिशिया: “बहुतेक वेळा, क्युबाला येणार्या आंतरराष्ट्रीय व्हिजिटर्सना तंबाखू, रम आणि साल्सा संगीताबद्दल ऐकायचे असते. परंतु आम्हाला गेस्ट्सना आणखी गोष्टी दाखवायच्या होत्या: शैक्षणिक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि मार्केट्समध्ये कसे काम होते; आणि लोक इतक्या कमी पगारावर कसा उदरनिर्वाह करतात. आम्ही शहराभोवती पायी फिरतो आणि त्यांना अशी ठिकाणे दाखवतो जी पर्यटकांसाठी नाहीत, जसे कोप्पेलिया, जे आईस्क्रीमचे राज्य आहे. येथे 25 सेंट्स USDमध्ये पाच आइस्क्रीमचे स्कूप्स मिळतात. 30 मिनिटे प्रतीक्षा करावी लागते, आणि लोक रांगेत वाट पाहत असताना लोकांसह गप्पा मारतात आणि अगदी मीटिंग्स देखील करतात—हे क्युबन समाजाचे सत्यचित्र आहे. आम्ही आमच्या गेस्ट्सना सार्वजनिक वाहतुकीने फिरायला देखील घेऊन जातो, जे [पर्यटकांसाठी] अजिबात सामान्य गोष्ट नाही. दिवसाच्या शेवटी, त्यांना असे वाटते की त्यांनी खरोखर काहीतरी मोठे केले आहे आणि क्युबन्स समाजवादी समाजात खरच कसे राहतात याबद्दल ते बोलू शकतात."
अनुभव होस्ट होण्याबद्दल सर्वात चांगला भाग काय आहे?
ऑस्कर: “ज्ञान आणि सांस्कृतिक समृद्धी मिळते जे आश्चर्यकारक आहे. प्रत्येक वेळी, तुम्ही तुमच्या संस्कृतीविषयी सांगता. आम्ही अजूनही विद्यापीठात प्राध्यापक आहोत, म्हणून आम्ही आमच्या तरुण सहकाऱ्यांना आमच्यासोबत मिळून अनुभव को-होस्ट करण्यासाठी प्रोत्साहित करतो. आम्हाला असे वाटते की Airbnb ने रोजगार आणि जीवन सुधारले आहे. आमच्या “ग्रामीण भागातील जीवन” अनुभवासाठी, आम्ही आमच्या गेस्ट्सना ग्रामीण भागात मासेमारी करून आणि फळे आणि कॉफी उगवून उदरनिर्वाह करणार्या आमच्या कुटुंबातील मित्रांना भेटण्यासाठी घेऊन जातो. आता, आम्ही आठवड्यातून तीन वेळा गेस्ट्सना तेथे आणतो आणि आमचे मित्रही आता उद्योजक आहेत.”
अनुभव तयार करण्याबद्दल विचार करणार्या इतर होस्ट्ससाठी काही सल्ला द्यायचा आहे का?
पॅट्रिशिया: “तुमच्याकडे सांगण्यासाठी काही आहे का आणि तुम्हाला ती माहिती इतरांना सांगायची आहे का याबद्दल सर्व काही आहे."
ऑस्कर: “कारण गेस्ट्सना स्वतःबद्दल सर्व काही सांगितल्याने सर्व कामे सोपी होतात. तुम्ही खरे आणि प्रामाणिक असले पाहिजे, अन्यथा तुम्ही यशस्वी होणार नाही.”
*100 हून अधिक होस्ट्सच्या Airbnb अंतर्गत संशोधनावर आधारित.
या लेखात दिलेली माहिती प्रकाशनानंतर बदलली असल्याची शक्यता असू शकते.