Airbnb बुकिंग प्रक्रिया कशी काम करते?

चौकशी, बुकिंगच्या विनंत्या, तात्काळ बुकिंग आणि अशा बऱ्याच गोष्टींविषयी तपशील मिळवा.
Airbnb यांच्याद्वारे 9 फेब्रु, 2021 रोजी
2 मिनिटांचा व्हिडिओ
18 ऑग, 2022 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • गेस्ट्सना तुमच्या जागेबद्दल प्रश्न असल्यास ते बुकिंग चौकशी पाठवू शकतात

  • तुम्ही तात्काळ बुकिंग वापरू शकता किंवा मॅन्युअल रिझर्व्हेशनच्या विनंत्या मागवू शकता

  • आपलेपणाने होस्ट करणे यशस्वी होस्ट होण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे

Airbnb मधील बुकिंग प्रक्रिया सुलभ आणि सरळ असावी अशी डिझाईन केलेली आहे. परंतु नवीन होस्ट म्हणून, हे कसे काम करते याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असू शकतात. 

बुकिंग चौकशी प्राप्त करणे आणि त्यास प्रतिसाद देणे, तात्काळ बुकिंग चालू किंवा बंद करणे, रिझर्वेशन्सचा मागोवा ठेवणे आणि तुमच्या कॅलेंडरचा वापर करून आगाऊ नियोजन करण्याची प्रक्रिया तुम्हाला समजल्यानंतर, तुम्ही तुमच्या पहिल्या गेस्ट्सचे स्वागत करण्यास तयार असाल.

बुकिंग चौकशी प्राप्त करणे

काही गेस्ट्सना प्रश्न असू शकतात—उदाहरणार्थ, लवकर चेक इन करण्याबद्दल किंवा तुमचे अचूक लोकेशन. हे गेस्ट्स तुम्हाला रिझर्व्हेशन करण्यापूर्वी बुकिंगची चौकशी पाठवू शकतात. चौकशी मिळाल्यावर, तुम्हाला तुमच्या सेटिंग्जनुसार, तुमच्या Airbnb इनबॉक्समध्ये एक ईमेल, एक सूचना किंवा दोन्ही मिळेल.

तुम्ही तात्काळ बुकिंग वापरत असलात तरीही, गेस्ट्स रिझर्व्हेशन करण्यापूर्वी थोडी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला बुकिंगची चौकशी पाठवू शकतात. त्यांच्या मेसेजला उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 24 तास असतील. तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर, तुम्ही पाठवू शकता:

  • एक आगाऊ बुकिंग ऑफर, जी तुम्ही तात्काळ बुकिंग बंद केले असल्यास, 24 तासांच्या आत गेस्ट्सना तुमची जागा तुमच्याकडून कोणतीही अतिरिक्त कृती न करता बुक करू देते
  • एक विशेष ऑफर, जी तुम्हाला सवलत देऊ देते (बऱ्याचदा दीर्घकाळ वास्तव्यासाठी वापरली जाते)
  • जोपर्यंत तुम्ही आमचे भेदभाव-विरोधी धोरण पाळत आहात तोपर्यंत तुम्ही गेस्टची सोय करून देऊ शकत नसल्यास नाकारण्याचे नोटिफिकेशन द्यावे

बुकिंग चौकशी स्क्रीनमध्ये तीन पर्याय आहेतः आगाऊ बुकिंग ऑफर देणे, विशेष ऑफर किंवा नाकारणे.
तुम्हाला सुपरहोस्ट व्हायचे असल्यास, तुम्हाला 90% प्रतिसाद दर ( इतर घटकांसह) आवश्यक असेल, म्हणून 24 तासांच्या आत गेस्ट्सना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा.

गेस्ट्स तुमची जागा कशी बुक करू शकतात

ज्या गेस्ट्सना कोणतेही प्रश्न नाहीत ते तात्काळ बुकिंगसह वास्तव्य बुक करू शकतात, जर तुम्ही ते चालू केले असेल तर किंवा तुम्ही तात्काळ बुकिंग बंद केले असेल तर रिझर्व्हेशनची विनंती करून वास्तव्य बुक करू शकतात. 

  • तात्काळ बुकिंग सर्व लिस्टिंग्जसाठी डिफॉल्ट बुकिंगचा पर्याय आहे. तुम्ही हे वापरल्यास, तुमच्या सर्व आवश्यकता पूर्ण करणारे आणि तुमच्या घराच्या नियमांना सहमती देणारे गेस्ट्स कोणत्याही उपलब्ध तारखांसाठी तुमची जागा त्वरित बुक करू शकतील. तात्काळ बुकिंग हे देखील सूचित करते की तुम्ही तुमच्या बुकिंगच्या निकषांमध्ये बसणाऱ्या कोणालाही होस्ट करण्यास तयार आहात, आपलेपणाने होस्ट करण्याचा एक महत्त्वाचा भाग.
  • रिझर्व्हेशन विनंत्या सबमिट केलेल्या प्रत्येक बुकिंग विनंतीला रिव्ह्यू करण्यासाठी आणि ती स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी तुम्हाला 24 तास देतात. तुम्ही गेस्ट्सचे रिव्ह्यूज आणि प्रोफाईल्स ॲक्सेस करू शकाल. काही होस्ट्स, विशेषत: अद्वितीय जागा किंवा विसंगत शेड्यूल्स असलेले, मॅन्युअल बुकिंग विनंत्यांना प्राधान्य देतात.
तुम्हाला रिझर्व्हेशनची विनंती मिळाल्यावर, गेस्टचे प्रोफाईल आणि अलीकडील रिव्ह्यूज ॲक्सेस करण्यासाठी खाली स्क्रोल करा.
आम्ही शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो आणि शक्य तितक्या विनंत्या स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. सर्चमध्ये तुमचे रँकिंग वाढवण्याचा हा एक अत्यंत सोपा उपाय आहे.
Superhosts Danielle and Eli,
टॅनर्सविले, न्यूयॉर्क

तुमचे कॅलेंडर अद्ययावत ठेवणे

वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे भाडे आणि सेटिंग्ज ॲडजस्ट करू शकता. काही झटपट कॅलेंडर सल्ले:

  • तुम्हाला होस्ट करणे शक्य नाही अशा माहित असलेल्या विशिष्ट तारखा ब्लॉक करा
  • वास्तव्याचा किमान आणि कमाल कालावधी सेट करा
  • तुमच्याकडे इतर ऑनलाइन कॅलेंडर्स असल्यास, आगामी बुकिंग्जबद्दल तुम्हाला नेहमी माहिती असेल याची खात्री करण्यासाठी तुमचे Airbnb कॅलेंडर त्यांच्याशी सिंक करा

कॅलेंडर आणि बुकिंग सेटिंग्जबद्दल अधिक माहिती मिळवा

गेस्ट्स तुमची जागा कशी बुक करू शकतात आणि त्यांचा बुकिंगचा अनुभव कसा आहे हे तुम्हाला समजल्यानंतर, तुम्ही होस्टिंगच्या मनोरंजक भागावर लक्ष केंद्रित करण्यास तयार असाल: तुमच्या गेस्ट्सचे स्वागत करणे.

या लेखातील माहिती पब्लिकेशननंतर बदलली असल्याची शक्यता असू शकते.

हायलाइट्स

  • गेस्ट्सना तुमच्या जागेबद्दल प्रश्न असल्यास ते बुकिंग चौकशी पाठवू शकतात

  • तुम्ही तात्काळ बुकिंग वापरू शकता किंवा मॅन्युअल रिझर्व्हेशनच्या विनंत्या मागवू शकता

  • आपलेपणाने होस्ट करणे यशस्वी होस्ट होण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे

Airbnb
9 फेब्रु, 2021
हे उपयुक्त ठरले का?