कमाईचे डॅशबोर्ड: तुमच्या आर्थिक स्थितीचे सखोल निरीक्षण
तुमची कमाई समजून घेणे तुम्हाला अधिक यशस्वी होस्टिंग बिझनेस चालवण्यात मदत करू शकते. म्हणूनच आम्ही होस्टच्या फीडबॅकने प्रेरित होऊन कमाई डॅशबोर्डवर नवीन वैशिष्ट्ये जोडत आहोत.
- सखोल इनसाईट्ससाठी इंटरॲक्टिव्ह चार्ट्स. मासिक आणि वार्षिक व्ह्यूजद्वारे तुमची कमाई पहा, तसेच लिस्टिंगनुसार फिल्टर करा आणि मागील वर्षे आणि भविष्यातील अंदाजांबद्दल अधिक तपशील मिळवा.
- कमाईचा सारांश एका नवीन उपयुक्त हबमध्ये. स्वयंचलितपणे मासिक आणि वार्षिक रिपोर्ट्स प्राप्त करा आणि त्यांना PDFs म्हणून डाऊनलोड करा. रिपोर्ट्समध्ये लिस्टिंग आणि पेआऊट पद्धतीनुसार विश्लेषणाचा समावेश आहे.
मेनू टॅबमध्ये कमाई डॅशबोर्ड अॅक्सेस करा. ते उघडण्यासाठी कमाई निवडा.
वर्धित कमाई डॅशबोर्डमध्ये तुम्हाला जे काही सापडेल ते येथे आहे.
नवीन इंटरॲक्टिव्ह कमाईचे चार्ट्स
डॅशबोर्डच्या वरच्या भागात असलेला कमाईचा चार्ट हे दाखवतो:
- मागील सहा महिन्यांतील प्रत्येक महिन्यात तुम्ही किती कमाई केली आहे
- या महिन्यात तुम्ही आतापर्यंत किती कमाई केली आहे
- आगामी बुकिंग्जच्या आधारावर पुढील पाच महिन्यांतील प्रत्येक महिन्यात तुम्ही किती कमाई कराल याचा अंदाज लावला आहे
कमाईच्या चार्टचा विस्तार करण्यासाठी आणि त्यामध्ये फेरबदल करण्यासाठी डबल अॅरोवर टॅप करा. हे नवीन दृश्य तुमची कमाई महिन्यानुसार किंवा वर्षानुसार आणि लिस्टिंगद्वारे दाखवते. दाखवण्याजोगी लिस्टिंग किंवा लिस्टिंग्ज निवडण्याकरता फिल्टरचा वापर करा.
कमाईच्या प्रकारानुसार फिल्टर करण्याचा नवीन पर्याय
आगामी किंवा सशुल्क व्यवहारांचा आढावा घेताना तुमची कमाई त्याच्या प्रकारानुसार फिल्टर करा. प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे:
- वास्तव्याच्या जागा
- अनुभव
- क्रेडिट्स
- रिझोल्युशन्स
तुम्ही तारीख, लिस्टिंग आणि पेआऊट पद्धतीनुसारही व्यवहार फिल्टर करू शकता.
नवीन कमाईचे रिपोर्टिंग हब
Airbnb आता नवीन रिपोर्टिंग हबमध्ये तुमच्यासाठी मासिक आणि वार्षिक स्टेटमेंट्स आपोआप जनरेट करते. तुम्ही ज्या वर्षापासून होस्टिंग करणे सुरू केले त्या वर्षापर्यंतचे रिपोर्ट्स तुम्ही अॅक्सेस करू शकता किंवा ते डाऊनलोड करू शकता किंवा PDFs म्हणून ईमेल करू शकता.
इंटरॲक्टिव्ह कमाई चार्ट
डॅशबोर्डच्या वरच्या भागात असलेला कमाईचा चार्ट हे दाखवतो:
- मागील सहा महिन्यांतील प्रत्येक महिन्यात तुम्ही किती कमाई केली आहे
- या महिन्यात आतापर्यंत तुम्ही किती कमाई केली आहे
- आगामी बुकिंग्जच्या आधारावर पुढील पाच महिन्यांतील प्रत्येक महिन्यात तुम्ही किती कमाई करण्याचा अंदाज आहे
तुमची कमाई महिन्यानुसार किंवा वर्षानुसार पाहण्यासाठी चार्ट मोठा करा आणि लिस्टिंगनुसार पाहण्यासाठी फिल्टर वापरा.
कमाईच्या इंटरॲक्टिव्ह चार्टखाली, कामगिरीची आकडेवारी बुक झालेल्या एकूण रात्री आणि वास्तव्याचा सरासरी कालावधी दाखवते.
कमाईचा सारांश चालू वर्षाच्या 1 जानेवारीपासून तुमची एकूण कमाई, वजावटी आणि एकूण निव्वळ पेमेंट हायलाईट करतो.
सेटिंग्ज आणि डॉक्युमेंट्स
कमाईच्या डॅशबोर्डच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या गिअर आयकॉनद्वारे तुम्ही या गोष्टी ॲक्सेस करू शकता:
- पेआऊट पद्धती आणि पेआऊट विभाजनाचे पर्याय
- करदात्यांचे तपशील आणि करासंबंधी डॉक्युमेंट्स
- कोणत्याही लिस्टिंगसाठी आणि तारखांच्या रेंजसाठी कमाईचे रिपोर्ट्स
- संकटाच्या वेळी लोकांना सहाय्य करण्यासाठी प्रत्येक पेआऊटच्या काही टक्के रक्कम Airbnb.org ला आवर्ती स्वरूपात देणगी देणे
कमाई डॅशबोर्डची नवीन वैशिष्ट्ये वापरून पाहण्यासाठी आजच अर्ली ॲक्सेस मिळवा.
लोकेशननुसार युझरचा अनुभव बदलू शकतो.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.