तुमचे प्रति रात्र भाडे निश्चित करा
तुमच्यासाठी योग्य असलेले आणि गेस्ट्ससाठी आकर्षक असे प्रति रात्र भाडे शोधण्यासाठी वेळ लागू शकतो आणि थोडे फाईन-ट्यूनिंग करावे लागू शकते. तुमचे भाडे नेहमी तुमच्याच नियंत्रणात असते आणि तुम्ही ते कधीही बदलू शकता.
तुमचे भाडे सेट करणे
तुम्ही Airbnb वर तुमची जागा लिस्ट करता तेव्हा तुम्ही तुमचे सुरुवातीचे भाडे सेट करता. Airbnb Setup मध्ये सुचवले जाणारे भाडे हे लोकेशन, सुविधा आणि मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जसाठी गेस्ट्सची मागणी यासारख्या घटकांवर आधारित असते.
तुमचे खर्च आणि गेस्ट्स जितके पेमेंट करण्यास इच्छुक आहेत त्यामध्ये संतुलन साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. विचारात घेण्याजोग्या गोष्टी या आहेत:
- होस्टिंगचे खर्च, जसे की मॉर्गेज, देखभाल आणि कर.
- तुम्ही प्रदान करत असलेले मूल्य, जसे की लोकप्रिय सुविधा किंवा स्थानिक आकर्षणे जवळपास असणे.
- गेस्ट्स एकूण किती भाड्याचे पेमेंट करतील, ज्यात तुम्ही जे शुल्क आकारणार आहात तेदेखील समाविष्ट आहे.
तुमचे लिस्टिंगचे वर्णन, फोटो आणि सुविधा अप टू डेट ठेवल्याने तुम्ही ऑफर करत असलेले मूल्य स्पष्ट करण्यात आणि गेस्ट्सच्या अपेक्षा सेट करण्यात मदत होते.
तुमचे भाडे अपडेट करताना, तुम्ही करांपूर्वी गेस्टचे भाडे यावर टॅप करून तुमचे किमान भाडे तसेच गेस्ट सेवा शुल्काचे विवरण मिळवू शकता. होस्ट सेवा शुल्क वजा करून तुमचे किमान भाडे पाहण्यासाठी तुमची कमाई यावर टॅप करा.
मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करणे
तुमच्या भागातील मिळत्या-जुळत्या घरांच्या भाड्यांची तुलना केल्याने तुम्हाला स्पर्धात्मक भाडे सेट करण्यात आणि अधिक बुकिंग्ज आकर्षित करण्यात मदत होऊ शकते. तुम्ही रोज रात्रीसाठी समान भाडे ऑफर करत असल्यास, वीकडे आणि वीकेंड भाडी जोडण्याचा विचार करा. वेगवेगळ्या रात्रींनुसार तुमच्या भाड्यात बदल केल्याने तुम्हाला जास्तीत जास्त बुकिंग्ज मिळवण्यात मदत होऊ शकते.
मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करण्यासाठी:
- तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमधील भाडे टॅबवर जा.
- 31 दिवसांपर्यंतची तारखेची रेंज निवडा.
- मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज पहा वर टॅप करा.
तुम्हाला तुमच्या भागाच्या नकाशावर जवळपासच्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची सरासरी भाडी दिसतील. नकाशावरील बटणे वापरून तुम्ही बुक झालेल्या किंवा न झालेल्या लिस्टिंग्ज पाहू शकता. कोणत्या लिस्टिंग्ज मिळत्या-जुळत्या आहेत हे ज्या घटकांवरून ठरवले जाते त्यांच्यामध्ये लोकेशन, आकार, वैशिष्ट्ये, सुविधा, रेटिंग्ज, रिव्ह्यूज आणि गेस्ट्सनी तुमच्या लिस्टिंग्जचा विचार करताना बघितलेल्या इतर लिस्टिंग्जचा समावेश होतो.
होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्या आणि पाम स्प्रिंग्ज, कॅलिफोर्नियामधील सुपरहोस्ट केटी म्हणतात, “जर मला कमी भाडे असलेल्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज दिसत असतील आणि माझ्याकडे अजूनही उपलब्धता असेल तर मी यावर विचार करून कारण जाणून घेईन”. “मी माझ्या लिस्टिंगची सजावट, माझ्या सुविधा, माझे कॅन्सलेशन धोरण, माझे स्वच्छता शुल्क यांचे विश्लेषण करते. अनेक कारणांमुळे माझ्याऐवजी दुसरी एखादी लिस्टिंग बुकिंग मिळवू शकते.”
तुमची भाडी आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगळे असू शकतात.
होस्ट्सना मुलाखतींमध्ये भाग घेतल्याबद्दल पैसे देण्यात आले होते.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.