5-स्टार वास्तव्य ऑफर करणे
अपेक्षा सेट करणे
तुमच्या लिस्टिंगचे वर्णन तुमच्या जागेची संपूर्ण आणि अचूक माहिती देत असल्याची खात्री करा.
तुमच्या जागेची वाजवीपेक्षा जास्त महत्ता सांगू नका. साधकबाधक असे दोन्ही मुद्दे शेअर करा. जसे हॉट टब किंवा फायरप्लेसबद्दल सांगता तसेच चरचरणारे फ्लोअरबोर्ड्स किंवा रस्त्यावरच्या आवाजाबद्दल माहिती द्या.
उच्च-गुणवत्तेचे फोटोज अपलोड कराआणि फोटो कॅप्शन्समध्ये तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनामधील कोणत्याही संभाव्य समस्यांना स्पष्टपणे दाखवा. प्रत्येक रूम किंवा जागेचे दोन ते तीन फोटोज अपलोड करण्याचे लक्ष्य ठेवा ज्यामध्ये सर्वात उत्कृष्ट सुविधेचा फोटो देखील असल्याला पाहिजे.
अल्ट्रा-वाईड अँगल्स वापरू नका किंवा रूम्स आहेत त्यापेक्षा मोठ्या किंवा अधिक प्रकाशमान दिसू शकतील असे तुमच्या फोटोमध्ये खूप बदल करू नका.
यशस्वीरित्या संवाद साधणे
तुमच्या जागेवर वास्तव्य करणाऱ्या गेस्ट्ससाठी तुम्ही एकमेव संपर्काचा पॉइंट आहात हे लक्षात ठेवा.
सक्रिय रहा आणि चेक इन करण्यापूर्वी गेस्ट्सकडे आवश्यक असलेले सर्व काही असल्याचे कन्फर्म करा, जसे की आत जाण्यासाठी दिशानिर्देश आणि सूचना.
गेस्ट्सच्या मेसेजेसना शक्य तितक्या लवकर प्रतिसाद द्या.
तुमच्या मेसेजेसमध्ये सर्वसमावेशक भाषा वापरा जी सर्व प्रकारच्या गेस्ट्सचे स्वागत करण्यासाठी महत्त्वाची आहे.
संवाद सुलभ करण्यासाठी Airbnb ॲप आणि झटपट उत्तरे आणि शेड्युल केलेले मेसेजेस यांसारखी साधने वापरा.
चेक इन सूचना किमान 24 तास अगोदर पाठवा जेणेकरून गेस्ट्सना ते वाचण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी वेळ मिळेल. ॲक्सेसिबिलिटीच्या गरजा असलेल्या गेस्ट्ससाठी हे विशेषकरून महत्त्वाचे आहे.
गेस्ट्सचे स्वागत करणे
काहीवेळा चार- आणि पाच-स्टार रिव्ह्यू देण्यामागचा फरक अगदी बारीक असू शकतो, उदाहरणार्थ तुम्ही तपशीलांकडे लक्ष न दिल्यामुळे तुम्हाला पाच-स्टार ऐवजी चार स्टार मिळाले.
स्वच्छता महत्त्वाची आहे. सर्व पृष्ठभाग, फरशा आणि कपडे झटकून साफ केले असल्याची आणि ते स्वच्छ असल्याची खात्री करा. साफसफाईनंतर कुठे केस किंवा घाण किंवा धूळ आहे का ते तपासून घ्या. जरी तुमची जागा अतिशय आकर्षक असली तरीही, पाच-स्टार रिव्ह्यूज मिळवण्यासाठी ती चकचकीत असली पाहिजे.
एक वेलकम टीप सोडून किंवा ॲपमध्ये वेलकम मेसेज पाठवून वैयक्तिक स्पर्श जोडा.
तुमच्या जागेत घरपण जाणवले पाहिजे. उदाहरणार्थ, किचन असल्यास, ताट-वाट्या-चमचे अशी भांडी आणि स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टी ठेवा.
गेस्ट्सच्या वापरासाठी सोफ्यावर ब्लँकेट ठेवणे किंवा त्यांच्या सोबत मिळून चहा-कॉफी घेणे अशा लहान-सहान गोष्टी मनाला भावून जातात.
रिझर्व्हेशन्ससाठी वचनबद्ध असणे
होस्ट्ससाठीच्या मुख्य नियमांचा एक भाग म्हणून, तुम्ही कन्फर्म केलेली रिझर्व्हेशन्स कॅन्सल करू नये. कॅन्सलेशन टाळता येणे शक्य नसल्यास, तुम्ही शक्य तितक्या लीड वेळेसह कॅन्सल करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला मदत हवी असल्यास Airbnb शी संपर्क साधा.