होस्टकडून होस्टला मिळणाऱ्या सपोर्टच्या शक्तीला टॅप करा

सल्ले शोधण्यासाठी आणि कम्युनिटी तयार करण्यासाठी इतर होस्ट्ससह कनेक्ट व्हा.
Airbnb यांच्याद्वारे 25 जून, 2021 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
3 मे, 2023 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

2007 पासून, 40 लाखांपेक्षा अधिक होस्ट्सनी त्यांच्या जागा Airbnb वर लिस्ट केल्या आहेत. यापैकी बऱ्याच होस्ट्सना त्यांना गरजेचे असलेले कनेक्शन आणि सपोर्ट स्थानिक होस्ट क्लब्ज किंवा Airbnb कम्युनिटी सेंटरमधून मिळाला आहे.

स्थानिक सपोर्टसाठी होस्ट क्लबमध्ये सामील व्हा

होस्ट क्लब्ज हे जगभरातील कम्युनिटीजमधील होस्ट्सद्वारे आणि होस्ट्ससाठी, Facebook ग्रुप्स आणि भेटींमधून चालवले जातात. स्थानिक होस्ट क्लबमध्ये सामील झाल्यास तुम्हाला खालील ॲक्सेस मिळतात:

  • तुमच्या भागातील अल्पकालीन रेंटलचे नियम आणि त्यासारख्या गोष्टींचा अनुभव असलेल्या होस्ट्सच्या टिप्स
  • प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल भेटीगाठी ज्यांच्यातून अर्थपूर्ण संबंध निर्माण होऊ शकतात
  • ताज्या Airbnb बातम्या आणि उत्पादन अपडेट्सचा इनसायडर ॲक्सेस
  • मिळालेली विनंती स्वीकारू शकत नसलेल्या होस्ट्सकडून संभाव्य गेस्ट रेफरल्स
  • कम्युनिटीची भावना आणि सतत मिळणारा सपोर्ट

“फार जुनी गोष्ट नाही, आमच्या कम्युनिटीमधील गेस्ट्सपैकी एकीला फार बुकिंग मिळत नव्हत्या,” केनियामधील एक कम्युनिटी लीडर जानवी सांगतात. “काही मिनिटांतच, ग्रुपमधील इतरांनी त्याला प्रतिसाद देत आमच्या प्रदेशातील स्पर्धात्मक प्रति रात्र दर सेट करणे, तिची जागा कॅप्चर करण्यासाठी स्थानिक फोटोग्राफरला हायर करणे आणि तिचे डेकोर अपडेट करणे याबद्दल टिप्स दिल्या. कम्युनिटी एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी ज्या प्रकारे एकत्र येते ते खूपच प्रेरणादायक असते.

कम्युनिटी सेंटरवरील संभाषणात सामील व्हा

Airbnb कम्युनिटी सेंटर एक असा ऑनलाईन फोरम आहे जो जगभरातील नवीन आणि अनुभवी होस्ट्सना एकमेकांशी जोडतो. सहकाराला प्रोत्साह्न देणाऱ्या आणि उत्साहवर्धक अशा जागेत होस्ट्सचे स्वागत केले जाते जिथे ते:

  • विविध विषयांवरील उपलब्ध संभाषणे शोधू शकतात आणि टिप्स मिळवू शकतात
  • एखाद्या विशिष्ट परिस्थितीला कसे हाताळावे याबद्दल सल्ला विचारू शकतात, जसे की गेस्टच्या मेसेजला किंवा नकारात्मक रिव्ह्यूला कसा प्रतिसाद द्यावा
  • त्यांची लिस्टिंग इतर होस्ट्ससह शेअर करून सुधारणा करण्यासाठी फीडबॅक आणि टिप्स मिळवू शकतात
  • एकमेकांना होस्टिंगच्या आपापल्या कहाण्या सांगू शकतात, जसे की त्यांना गेस्टकडून मिळालेली प्रशंसेची नोट किंवा त्यांना कॅलेंडरबद्दल आलेली एखादी समस्या
  • Airbnb कर्मचार्‍यांना थेट फीडबॅक द्या

“मी होस्टिंग सुरू केल्यानंतर तीन वर्षांनी मी तंत्रज्ञानाशी संबंधित एका विशिष्ट समस्येचे निराकरण शोधण्यासाठी कम्युनिटी सेंटरमध्ये आलो,” कॅनडाच्या नोव्हा स्कॉटियामधील होस्ट लॉरेन सांगतात. “संभाषणे वाचत असताना माझ्या लक्षात आले की मी आधीच सामील झालो असतो तर मी अनेक सामान्य अडचणी टाळू शकलो असतो.

“ही खरोखर एक कम्युनिटी आहे. इथे लोक स्वत:च्या नावाने सल्ला आणि सपोर्ट देतात—अवतार आणि युजरनेम्सच्या मागे लपून नाही. ही उदार मनाची माणसं आहेत ज्यांना इतरांबद्दल काळजी वाटते. मला ज्यांच्यासोबत एक संपूर्ण दिवस रहायचे आहे असे अनेक होस्ट्स इथे आहेत.

या लेखात दिलेल्या माहितीमध्ये पब्लिकेशननंतर कदाचित बदल झालेला असू शकेल.

हायलाइट्स

Airbnb
25 जून, 2021
हे उपयुक्त ठरले का?