सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

होस्ट क्लब्ज म्हणजे काय?

तुमच्या जवळपासच्या होस्ट्सशी कनेक्ट होण्यासाठी तुमच्या स्थानिक क्लबमध्ये सामील व्हा.
Airbnb यांच्याद्वारे 6 नोव्हें, 2025 रोजी

होस्ट क्लब्ज ह्या स्थानिक होस्ट्सच्या कम्युनिटीज असून त्यात प्रश्न विचारण्यासाठी, टिप्स शेअर करण्यासाठी, यश साजरे करण्यासाठी आणि होस्ट करणे खरोखर कसे असते यावर चर्चा करण्यासाठी होस्ट्स ऑनलाईन आणि वैयक्तिकरित्या एकमेकांशी कनेक्ट होतात.

तुम्हाला काय मिळेल

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, होस्ट क्लब्ज हे एक मदत करणारे नेटवर्क आहे—तुम्हाला सल्ल्याची गरज असेल किंवा तुम्हाला इतर होस्ट्सशी बोलायचे असेल तेव्हा उपयुक्त ठिकाण आहे.

क्लब्ज फक्त होस्ट्ससाठी आहेत. कम्युनिटी लीडर्स म्हणून ओळखले जाणारे स्वयंसेवक होस्ट्स प्रत्येक ग्रुपला सपोर्ट करतात. ते चर्चा सुरू करतात आणि मीटअप्स आयोजित करतात तसेच स्वयंसेवक बनण्याच्या संधी पुरवतात. काही क्लब्जमध्ये प्रत्यक्ष मीटअप्स होतात तर काही ऑनलाईन भेटतात.

सदस्य होण्याचे फायदे

Airbnb च्या डेटानुसार, होस्ट क्लब्जचे सदस्य अनेकदा इतर होस्ट्सपेक्षा जास्त कमाई करतात आणि त्यांची सुपरहोस्ट्स होण्याची शक्यता जास्त असते.*

प्रत्येक क्लबचे मिशन असते एक मदतशील, सर्वसमावेशक आणि उपयुक्त जागा तयार करणे, जिथे होस्ट्स खालील गोष्टी करू शकतात:

  • आत्मविश्वासाने त्यांचे बिझनेस वाढवणे
  • प्रश्न विचारणे आणि सल्ले शेअर करणे
  • Airbnb चे अपडेट्स आणि संसाधनांबद्दल माहिती मिळवत राहणे
  • यश साजरे करणे आणि समस्यांचे निराकरण करणे
  • स्थानिक पातळीवर आणि व्हर्च्युअल पद्धतीने एकत्र भेटण्याच्या संधी शोधणे

सहभागी कसे व्हावे

एखाद्या होस्ट क्लबमध्ये सामील होण्यासाठी तुमच्याकडे फक्त घराची किंवा अनुभवाची ॲक्टिव्ह लिस्टिंग असलेले एक Airbnb अकाऊंट असणे आवश्यक आहे.

सामील होणे सोपे आहे:

  • तुमच्या Airbnb अकाऊंटमध्ये लॉग इन करा
  • तुमच्या लिस्टिंगचे लोकेशन आणि प्रकार यावर आधारित स्थानिक होस्ट क्लब्ज शोधा
  • ग्रुपमध्ये सामील व्हा वर टॅप करा आणि कम्युनिटी गाईडलाईन्सना सहमती द्या

तुमच्या भागात कोणताही क्लब उपलब्ध नसल्यास, जवळपास एखादा क्लब लाँच झाल्यावर तुम्हाला सूचित केले जाण्याचा पर्याय असेल.

*जून 2025 पर्यंत घरांच्या होस्ट्सच्या जागतिक Airbnb डेटावर आधारित. कमाईची हमी नाही आणि तुमची उपलब्धता, भाडे आणि तुमच्या क्षेत्रातील मागणी यासारख्या अनेक घटकांवर ती अवलंबून असते.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदलली असू शकते.

Airbnb
6 नोव्हें, 2025
हे उपयुक्त ठरले का?