प्रभावी शीर्षक आणि वर्णन कसे लिहावे
तुमच्या सेवेला नाव देण्यासाठी आणि तुमच्या कौशल्यांचे वर्णन करण्यासाठी स्पष्ट, संक्षिप्त भाषा वापरा. तुमच्या लिस्टिंगचे वेगळेपण दाखवण्याची, तुमच्या पात्रता हायलाईट करण्याची आणि गेस्ट्सना अपील करण्याची ही संधी आहे.
तुमच्या सेवेला नाव देणे
काही वर्णनात्मक शब्दांसह प्रारंभ करा जे स्पष्टपणे सांगतील की ही सेवा काय आहे, ती कोण प्रदान करीत आहे आणि ती कशाप्रकारे अनोखी आहे.
तुमच्या शीर्षकाच्या शेवटी तुमचे नाव समाविष्ट करा. तुमचे शीर्षक 50 किंवा त्यापेक्षा कमी कॅरॅक्टर्सचे असू द्या.
सेवेच्या चांगल्या शीर्षकांची उदाहरणे:
- मो सादर करत आहे रोमँटिक पॅरिस पोर्ट्रेट्स
- सबरीना सादर करत आहे लिम्फॅटिक मसाज
- कोरी सादर करत आहे माईंडफुल स्ट्रेंथ बिल्डिंग
तुमचे कौशल्य हायलाईट करणे
तुमच्या कौशल्याचे वर्णन तुमच्या शीर्षकाला पूरक आणि विस्तृत असावे. तुमची सेवा होस्ट करण्यासाठी तुम्ही अद्वितीयपणे पात्र का आहात ते स्पष्ट करा. थेट, संक्षिप्त आणि स्पष्ट बोला.
तुमची क्रेडेन्शियल्स तसेच करिअर हायलाईट्स शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका. तुम्ही सेटअपमध्ये आधी जोडलेली माहिती रिपीट करणे टाळा. तुमच्या वर्णनाची लांबी 90 कॅरॅक्टर्स किंवा त्यापेक्षा कमी ठेवा.
या सर्वोत्तम पद्धतींचा विचार करा:
- संभाषणात्मक बना.
- पूर्ण वाक्य लिहा आणि तुकड्यांमध्ये लिहिणे आणि लिस्ट्स टाळा.
- तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारासारख्या एखाद्या सर्वात प्रभावी गोष्टीपासून सुरुवात करा.
- संदर्भ जोडा किंवा तुमच्या कौशल्यांवर भर द्या.
- तुमचे वर्णन अचूक असल्याची खात्री करा.
- तुमचा स्वतःचा दृष्टिकोन वापरा.
उत्तम वर्णनांची उदाहरणे:
- मी मिशेलिन स्टार प्राप्त Le Bernardin मध्ये कुकिंग केले आहे—आता मी तेच फाईन डायनिंग तुमच्या घरी घेऊन येत आहे.
- मी एक पुरस्कार प्राप्त फोटोग्राफर असून माझे काम Elle आणि The New York Times मध्ये प्रकाशित झाले आहे.
- मी बालीमधील सर्वोत्कृष्ट एक्सपर्ट्सकडून डीप टिश्यू टेक्निक्स शिकले आहे आणि मला 5 वर्षांचा अनुभव आहे.
होस्ट्स, फोटोज आणि लिस्टिंगचे सर्व तपशील Airbnb सेवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.