तुम्ही पब्लिश केल्यानंतर काय होते?
अभिनंदन! तुम्ही तुमची लिस्ट पब्लिश करण्यास तयार आहात. 24 तासांच्या आत गेस्ट्सना तुमची पब्लिश केलेली लिस्टिंग Airbnb च्या सर्च रिझल्ट्समध्ये दिसू लागेल.
तुमच्या कॅलेंडरमध्ये आणि लिस्टिंग्ज टॅबमध्ये या अंतिम पायऱ्या पूर्ण करून तुम्ही बुकिंग्जसाठी तयार असल्याची खात्री करा.
तुमचे कॅलेंडर सेट अप करणे
तुम्ही पब्लिश करताच तुमचे कॅलेंडर खुले आणि बुक करण्यायोग्य होते, त्यामुळे तुमची उपलब्धता त्वरित अपडेट करण्याची खात्री करा. तुम्ही होस्ट करू शकत नाही अशा कोणत्याही तारखा ब्लॉक करा. पुढील 2 वर्षात तुमची लिस्टिंग कधी उपलब्ध असेल ते निवडा. गेस्ट्स किती आधी बुक करू शकतात आणि दोन रिझर्व्हेशन्सच्या दरम्यान तुम्हाला किती वेळ हवा आहे यासारखी सेटिंग्ज तुम्ही ॲडजस्ट करू शकता.
तुमच्या घराचे नियम तयार करणे
तुमच्या घराचे नियम गेस्ट्सनी कशाची अपेक्षा करावी हे स्पष्ट करतात आणि तुमचे घर त्यांच्या ट्रिपसाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यात त्यांना मदत करतात. तुमच्या लिस्टिंगमधील गेस्ट्सची कमाल संख्या, शांततेचा कालावधी आणि चेक इन आणि चेक आऊटच्या वेळा सेट करून तुमच्या घराचे नियम तयार करा.
तुम्ही घराच्या स्टँडर्ड नियमांच्या संचामधूनदेखील तुमचे नियम निवडू शकता, जसे की तुम्ही खालील गोष्टींना परवानगी देता की नाही:
- पाळीव प्राणी
- इव्हेंट्स
- धूम्रपान, व्हेपिंग आणि ई-सिगारेट्स
- व्यावसायिक फिल्मिंग आणि फोटोग्राफी
कॅन्सलेशन धोरण निवडणे
गेस्ट्सनी चेक इनच्या किती आधी कॅन्सल केल्यास त्यांना पूर्ण किंवा अंशतः रिफंड मिळेल यावर विचार करा. तुमच्याकडे 28 पेक्षा कमी रात्रींच्या बुकिंगसाठी तसेच 28 किंवा त्याहून अधिक सलग रात्रींच्या दीर्घकालीन वास्तव्यांसाठी, अशी दोन्ही कॅन्सलेशन धोरणे निवडण्याचा पर्याय आहे.
तुमच्यासाठी योग्य पॉलिसी निवडताना संतुलन साधण्यावर भर द्या. तुम्हाला एका बाजूला ट्रिप्स प्लॅन करत असताना सोयीस्करपणा हव्या असलेल्या गेस्ट्सना आकर्षित करायचे आहे तर दुसरीकडे स्वतःला कॅन्सलेशन्सपासून वाचवायचे आहे. अधिक सोयीस्कर कॅन्सलेशन धोरण निवडल्याने तुमच्या बुकिंग्ज वाढू शकतात.
आणखी सुविधा जोडणे
तुम्ही तुमची लिस्टिंग सेट अप करत असताना लोकप्रिय सुविधांच्या शॉर्ट लिस्टमधून आधीच निवड केली आहे. ती पब्लिश केल्यानंतर, तुम्ही आमच्या जवळपास 150 पर्यायांच्या पूर्ण लिस्टमधून तुमच्या उर्वरित सुविधा जोडू शकता.
अनेक गेस्ट्स त्यांना हव्या असलेल्या विशिष्ट सुविधा असलेली घरे शोधण्यासाठी फिल्टर्स वापरतात. तुमची सुविधांची लिस्ट पूर्ण केल्याने तुमची लिस्टिंग सर्च रिझल्ट्समध्ये नजरेत भरते आणि गेस्ट्सच्या अपेक्षा सेट करते.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.