सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

तुमचे सुरुवातीचे भाडे सेट करणे

वीकडेज आणि वीकेंड्ससाठी भाडे निवडा आणि गेस्ट्सना आकर्षित करण्यासाठी सवलती जोडा.
Airbnb यांच्याद्वारे 17 जून, 2025 रोजी
17 जून, 2025 रोजी अपडेट केले

स्पर्धात्मक भाडे सेट केल्याने तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यात मदत होऊ शकते आणि गेस्ट्सना बुक करण्यास प्रोत्साहन मिळू शकते. तुमचे भाडे नेहमी तुमच्याच नियंत्रणात असते आणि तुम्ही ते कधीही बदलू शकता.

वीकडेज आणि वीकेंड्सची भाडी

तुम्ही आधी वीकडेजसाठी किमान भाडे निवडता. हे तुमच्या कॅलेंडरवरील सर्व रात्रींचे डिफॉल्ट भाडे आहे. तुमच्याकडे वीकेंड्ससाठीचे, म्हणजेच शुक्रवार आणि शनिवारसाठी प्रीमियम भाडे जोडण्याचा पर्याय आहे.

दाखवलेले भाडे सल्ले हे लोकेशन, सुविधा, तुमची मागील बुकिंग्ज आणि तुमच्या भागातील नवीनतम भाड्यांसारख्या घटकांवर आधारित असतात. तुम्हाला सुचवलेल्या भाड्यापेक्षा वेगळे भाडे सेट करायचे असल्यास, तुमचे खर्च आणि गेस्ट्स किती पेमेंट करण्यास इच्छुक आहेत त्यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. या काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

  • तुमचे होस्टिंगचे खर्च: यामध्ये मॉर्गेज, अत्यावश्यक सुविधा, देखभाल आणि कर समाविष्ट असू शकतात.
  • तुम्ही देत असलेले मूल्य: तुम्ही तुमच्या लिस्टिंगमध्ये काय शोकेस करत आहात याचा विचार करा, जसे की लोकप्रिय सुविधा, ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये आणि स्थानिक आकर्षणे जवळपास असणे.
  • गेस्ट्सना द्यावे लागणारे एकूण भाडे: हे लक्षात असू द्या की तुम्हाला जोडायचे असलेले कोणतेही शुल्क, जसे की पाळीव प्राण्यांचे शुल्क, एकूण भाड्यावर परिणाम करतात.

कमी भाड्यापासून सुरुवात केल्याने तुम्हाला तुमच्या पहिल्या गेस्ट्सना आकर्षित करण्यात आणि रिव्ह्यूज मिळवण्यात मदत होऊ शकते.

सवलती जोडणे

प्रमोशन्स आणि सवलतींमुळे तुमच्या लिस्टिंगचे सर्च रँकिंग चांगले होण्यात आणि गेस्ट्सना आकर्षित करण्यात मदत होऊ शकते.

  • नवीन लिस्टिंग प्रमोशन: तुम्हाला तुमचे पहिले गेस्ट्स आणि रिव्ह्यूज मिळवण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या पुढील 3 बुकिंग्जवर 20% ची सूट ऑफर करा.
  • अखेरची सवलत: तुमच्या कॅलेंडरमधील रिकाम्या जागा भरण्यात मदत व्हावी म्हणून चेक इनच्या आधी 1 ते 28 दिवसांमध्ये कधीही केलेल्या बुकिंग्जचे भाडे कमी करा.
  • साप्ताहिक आणि मासिक सवलती: दीर्घकालीन वास्तव्यांवरील सवलतींमुळे तुमचे कॅलेंडर लवकर भरण्यात आणि चेक आऊटनंतरची तयारी कमी वेळा करण्यात मदत होऊ शकते.

तुमचे सवलत दिलेले भाडे तुमच्या मूळ भाड्याच्या बाजूला दिसते, ज्यावर काट मारलेली असते.

तुम्ही तुमची लिस्टिंग पब्लिश केल्यानंतर तुम्हाला आणखी प्राईसिंग टूल्सचा ॲक्सेस मिळेल. Airbnb ची टूल्स वापरून तुमचे भाडे नियमितपणे अ‍ॅडजस्ट केल्यास तुम्हाला तुमची कमाईची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत होऊ शकते.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
17 जून, 2025
हे उपयुक्त ठरले का?