अचूक लोकेशनसह अपेक्षा ठरवणे
गेस्ट्स रिझर्व्हेशन करण्याचा निर्णय घेतात की नाही यात लिस्टिंगचे लोकेशन मोठी भूमिका बजावू शकते. आणि गेस्ट्सना बुक केल्यावर, त्यांना अडचणीशिवाय चेक इनसाठी तुमचे अचूक लोकेशन आवश्यक असते.
अचूक लोकेशन ॲड करणे
तुम्ही तुमच्या Airbnb लिस्टिंगवर अचूक लोकेशन दाखवणे महत्त्वाचे आहे. तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनात अशीच मिळतीजुळती माहिती देणे देखील चांगली कल्पना आहे. नैरोबी, केनिया येथील होस्ट सल्लागार बोर्डच्या सदस्या ज्युलिएट म्हणतात, “घर कुठे आहे हे मी माझ्या वर्णनात सांगते.”
तुम्ही तुमचे पहिले बुकिंग स्वीकारेपर्यंतच तुमच्या पत्त्यामध्ये बदल करू शकता. त्यानंतर, मदतीसाठी तुम्हाला कम्युनिटी सपोर्टशी संपर्क साधावा लागेल.
तुमची जागा गेस्ट्सना सहजपणे सापडेल याची खात्री करणे
चेक इन करण्यापूर्वी गेस्ट्सना तुमच्या ठिकाणी निर्देशित करताना जास्तच बारकाईने सूचना दिल्या अशासारखी कोणतीच गोष्ट नसते. ज्युलिएट गेस्ट्ससह तिचे GPS कोऑर्डिनेट्स शेअर करते. ती म्हणते की ती तिच्या गेटचा रंग आणि त्यावर काय लिहिले आहे यासारखे अचूक तपशील देखील शेअर करते.
गेस्ट्सना जागा शोधण्यात काही अडचण आल्यास ज्युलिएट चेक इनच्या आसपास उपलब्धही असते. “आमचे संपर्क त्यांच्याकडे असल्याने ते सहसा आम्हाला कोणतीही समस्या आल्यास कॉल करतात,” त्या म्हणतात.
तुम्ही तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनात, आसपासच्या परिसराबद्दल आणि पार्किंगबद्दलच्या तपशिलासारखी अधिक माहितीही जोडू शकता. नकाशासह, हे गेस्ट्सना कशाची अपेक्षा करावी हे जाणून घेण्यात मदत करू शकते आणि त्यांच्या बुकिंगच्या निर्णयावर त्यांना विश्वास देऊ शकते.
जनरल किंवा अचूक लोकेशन निवडणे
Airbnb सर्च रिझल्ट्समध्ये तुमचे लोकेशन कसे दिसते ते तुम्ही निवडू शकता:
- सामान्य लोकेशन: तुमच्या लिस्टिंगचा नकाशा रस्त्याच्या पत्त्याच्या सुमारे अर्धा मैल (1 किमीपेक्षा कमी) त्रिज्येच्या आत, आसपासचे क्षेत्र दर्शवितो.
- अचूक लोकेशन: नकाशा जवळच्या क्रॉस स्ट्रीटवर पिन दाखवतो, परंतु अचूक जागा चिन्हांकित करत नाही. पिन योग्य लोकेशनवर इशारा करेपर्यंत तुम्ही नकाशा ड्रॅग करू शकता.
गेस्ट्सचे रिझर्व्हेशन कन्फर्म होईपर्यंत त्यांना तुमचा रस्त्याचा पत्ता मिळत नाही. डीफॉल्ट सेटिंग सामान्य लोकेशनसाठी आहे.
आणखी माहिती जोडणे
गेस्ट्सना तुमची जागा शोधण्यात अडचण येत असल्यास, तुमच्या समोरच्या दारावर स्ट्रीट नंबर जोडण्याचा किंवा ड्राइव्हवेवर अधिक चांगल्या प्रकारे लाइटिंग करण्याचा विचार करा.
काही वेळेस तुम्हाला थोडे क्रिएटिव्ह व्हावे लागेल. नवी दिल्लीतील होस्ट सल्लागार बोर्डचे सदस्य केशव म्हणाले की, “आमची मातीची घरे शोधणे कठीण आहे”. “रस्त्याची रचना थोडी वेगळी आहे. तुम्हाला तिथे नेण्यासाठी खरोखरच कुणाची गरज आहे.”
गेस्ट्सना मदतीशिवाय चेक इन करणे सुलभ कसे करावे याबद्दल केशव समस्यानिवारण करत आहेत. “आम्ही मुख्य रस्त्यावर, कायमस्वरुपी एक लहान बोर्ड कसा ठेवू शकतो याबद्दल विचार करण्यास सुरवात केली आहे,” ते म्हणतात.
तुमच्या पर्यायांची तुलना करणे
लोकेशनसह तुमच्या लिस्टिंगचे तपशील, गेस्टची अपेक्षा सेट करण्यात मदत करतात आणि तुमची जागा त्यांच्या गरजा पूर्ण करते की नाही याबद्दलच्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. हे गेस्ट्सना बुकिंगबद्दल अधिक आत्मविश्वास देऊ शकते आणि तुम्हाला नकारात्मक रिव्ह्यूज टाळण्यात मदत करू शकते.
उदाहरणार्थ, गेस्ट्सना जवळच्या ट्रान्झिट स्टॉपच्या अंतराचा अंदाज घ्यायचा असेल किंवा तुमची बीचफ्रंट प्रॉपर्टी किनाऱ्याच्या अगदी जवळ आहे का हे कन्फर्म करायचे असेल. शोध परिणामांमध्ये अचूक लोकेशन दाखवण्याचे निवडणे तुमची जागा अधिक आकर्षक बनवू शकते.
दरम्यान, सामान्य लोकेशन सेटिंग ठेवणे तुम्हाला गोपनीयता आणि सुरक्षा समस्यांचे व्यवस्थापन करण्यात मदत करू शकते. शोध परिणामांमध्ये तुमच्या जागेच्या आसपासचे क्षेत्र दाखवण्याचे निवडणे तुम्हाला आणि तुमच्या गेस्ट्सना अधिक मनःशांती देऊ शकते.