तुमच्या स्थानिक टिप्स शेअर करण्यासाठी एक गाईडबुक तयार करा

कस्टम डिजिटल ट्रॅव्हल गाईडद्वारे गेस्ट्सना तुमची जागा जाणून घेण्यात मदत करा.
Airbnb यांच्याद्वारे 29 ऑक्टो, 2019 रोजी
वाचण्यासाठी 1 मिनिट लागेल
4 फेब्रु, 2025 रोजी अपडेट केले

गेस्ट्स बऱ्याचदा खाण्याची ठिकाणे, प्रेक्षणीय स्थळे, शॉपिंग आणि निसर्ग अनुभवण्यासाठी स्थानिक शिफारसी विचारतात. तुम्ही तुमची आवडती ठिकाणे गाईडबुकमध्ये शेअर करू शकता, जसे की कॉफी कुठून घ्यावी किंवा एक संस्मरणीय हाईक कुठे करावी.

गाईडबुक तयार केल्याने तुमच्या सर्व सूचना एकाच ठिकाणी ठेवता येतात जेणेकरून ते शेअर करणे आणि अपडेट करणे सोपे होते आणि तुमचा वेळ वाचवते.

गाईडबुक तयार करण्यासाठी टिप्स

  1. थोडक्यात मांडणी करा. गेस्ट्सना तुमच्या सूचनांवर नजर फिरवणे सोपे करा. ती जागा किंवा अनुभव काय आहे आणि त्यांनी तो का अनुभवून पाहिला पाहिजे ते स्पष्ट करा.

  2. वैयक्तिक करा. उत्तम शिफारसी थेट ज्ञान आणि अनुभवातून येतात. तुम्ही वैयक्तिकरित्या आनंद घेतलेल्या ठिकाणांचीच शिफारस करणे चांगले असते.

  3. विशेष आकर्षणे सांगा. रेस्टॉरंटच्या बाहेरील पॅटीयो किंवा स्थानिक वस्तूंचा स्टोअरचा विभाग अशा विशेष वैशिष्ट्यांचा उल्लेख करा.

  4. एखादा फोटो समाविष्ट करा. Airbnb बहुतेक शिफारसींमध्ये ऑटोमॅटिक इमेजेस जोडते. तुम्ही समाविष्ट केलेल्या कोणत्याही जागेसाठी तुम्हीघेतलेले फोटोज देखील अपलोड करू शकता.

  5. नियमित अपडेट करा. नवीन सूचना जोडण्यासाठी आणि सर्व माहिती अद्याप अचूक आहे हे तपासण्यासाठी वेळोवेळी तुमच्या गाईडबुकचा आढावा घ्या.

तुमच्या लिस्टिंगमध्ये गाईडबुक कसे जोडावे ते शिका

गेस्ट्स तुमचे गाईडबुक कसे ॲक्सेस करतात

गेस्ट्सना तुमचे गाईडबुक तुमच्या लिस्टिंग आणि प्रोफाईल पेजेसवर आणि त्यांच्या ट्रिप्स टॅबमध्ये दिसेल. 

तुम्ही तुमच्या गाईडबुकसाठी झटपट उत्तर देखील सेट करू शकता आणि जेव्हा ते शिफारसी विचारतात तेव्हा ते थेट गेस्ट्सना पाठवू शकता.

पब्लिश झाल्यानंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.
Airbnb
29 ऑक्टो, 2019
हे उपयुक्त ठरले का?