Airbnb आता आधीच्या Airbnb पेक्षा अधिक उपयुक्त आहे

आम्ही सादर करत आहोत Airbnb सेवा, Airbnb अनुभव आणि एक पूर्णपणे नवीन अ‍ॅप.
Airbnb यांच्याद्वारे 13 मे, 2025 रोजी
13 मे, 2025 रोजी अपडेट केले

2007 मध्ये आम्हाला एक कल्पना सुचली: जर आम्ही लोकांना हॉटेल बुक करता येईल तितक्या सहजतेने एखादे घर बुक करण्याचा मार्ग तयार केला तर? तेव्हापासून, Airbnb ने 2 अब्ज गेस्ट्सची संख्या ओलांडली आहे आणि लोकांच्या प्रवासाची पद्धतच बदललेली आहे. पण तुम्ही ज्या घरात राहता त्याहून अनेक गोष्टी ट्रिप चांगली होण्यासाठी आवश्यक असतात. म्हणूनच आम्ही या नवीन गोष्टी सादर करत आहोत:

  • Airbnb सेवा – गेस्टचे वास्तव्य अजून खास बनवणाऱ्या अविश्वसनीय सेवा.
  • Airbnb अनुभव – एखाद्या शहराबद्दलची सर्वात चांगली माहिती असलेल्या स्थानिकांसह ते शहर जाणून घ्या.
  • पूर्णपणे नवीन Airbnb ॲप – नव्याने डिझाईन केलेले ॲप होस्ट्सना त्यांचे घर, सेवा किंवा अनुभव मॅनेज करणे आणि गेस्ट्सना ते बुक करणे सोपे करते—सर्व काही एकाच ठिकाणी.

“सतरा वर्षांपूर्वी, लोकांची प्रवासाची पद्धत आम्ही बदलली. 2 अब्जाहून अधिक गेस्ट्स राहून गेल्यावर, Airbnb हा आता राहण्याच्या जागेसाठी समानार्थी शब्द बनला आहे,” Airbnb चे सह-संस्थापक आणि CEO ब्रायन चेस्की म्हणाले. “सेवा आणि अनुभव सुरू केल्यामुळे आम्ही पुन्हा प्रवासाचे स्वरूप बदलत आहोत. Airbnb आता आधीच्या Airbnb पेक्षा अधिक उपयुक्त आहे.”

Airbnb सेवा

रूम सर्व्हिस, जिमला ॲक्सेस किंवा स्पामध्ये अपॉईंटमेंट यासारख्या सेवांमुळे लोक अनेकदा हॉटेल्सची निवड करतात. आजपासून, गेस्ट्स थेट त्यांच्या Airbnb मध्ये सेवा मिळवू शकतात.

आम्ही सादर करत आहोत Airbnb सेवा—वास्तव्य आणखी खास बनवण्यासाठी अविश्वसनीय सेवा. Airbnb ॲपमध्ये आम्ही निवडक शहरांमध्ये 10 कॅटेगरीजमध्ये सादर करत असून नवीन ऑफर्स आणि लोकेशन्स नियमितपणे समाविष्ट करत आहोत. या पहिल्या दहा कॅटेगरीज आहेत:

  • शेफ्स – प्रोफेशनल शेफ्सकडून पूर्णपणे कस्टमाईझ करता येणारी मील्स घरात उपलब्ध.
  • फोटोग्राफी – अनुभवी फोटोग्राफर्सकडून पर्सनलाइज्ड फोटो सेशन्स.
  • मसाज – अनुभवी थेरपिस्ट्सकडून स्वीडिश, डीप टिश्यू आणि रिफ्लेक्सोलॉजीसह रिस्टोरेटिव्ह मसाजेस.
  • स्पा ट्रीटमेंट्स – फेशियल, मायक्रोडर्माब्रेशन, बॉडी स्क्रब्ज आणि इतर ट्रीटमेंट्स, प्रोफेशनल एस्थेटिशियन्सद्वारे प्रदान केल्या जातात.
  • पर्सनल ट्रेनिंग – योगा, स्ट्रेंथ ट्रेनिंग, HIIT आणि बरेच काही, पर्सनल ट्रेनर्ससह, ज्यांच्यात नामांकित फिटनेस व्यावसायिक आणि जगज्जेत्या खेळाडूंचा समावेश आहे.
  • हेअर स्टाईल – अनुभवी स्टायलिस्ट्सकडून व्यावसायिक हेअरकट्स, ब्लोआऊट्स आणि बरेच काही.
  • मेकअप – व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट्सकडून दररोजचा किंवा विशेष प्रसंगासाठी मेकअप.
  • नेल सर्व्हिस – अनुभवी नेल स्पेशालिस्ट्सकडून मॅनिक्युअर्स आणि पेडिक्युअर्स.
  • तयार मील्स – व्यावसायिक शेफ्सनी तयार केलेली रेडी टू इट मील्स.
  • केटरिंग – कस्टम मेनूज, सजावट आणि उपकरणे तसेच सेटअप आणि साफसफाईसह संपूर्ण सेवा असलेले केटरिंग.

Airbnb सेवांची ज्ञान, शिक्षण, नावलौकिक आणि अशा अनेक निकषांचा विचार करून तपासणी केली जाते. सेवा होस्ट्सना अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी Airbnb ची ओळख व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केली आहे. अनेकजण त्यांच्या क्षेत्रांमध्ये प्रसिद्ध आहेत—उदा. मिशेलिन-स्टार मिळालेल्या रेस्टॉरंट्समधील शेफ्स, पुरस्कार विजेते फोटोग्राफर्स आणि प्रख्यात ट्रेनर्स.

Airbnb सेवा जवळपास प्रत्येक भाड्यामध्ये उपलब्ध आहेत आणि अनेक सेवांकरता $50 USD पेक्षा कमी एन्ट्री ऑफर समाविष्ट आहे. कोणत्याही प्रकारच्या ट्रिपसाठीच्या सेवांसह, तुम्हाला परवडणाऱ्या तयार मील्सपासून ते सेलिब्रिटी ट्रेनरसह दैनंदिन वर्कआऊट्सपर्यंत सर्व काही मिळू शकते.

सेवांचा लाभ घरात, सेवा होस्टच्या बिझनेसच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक जागेत घेता येऊ शकतो. तुम्ही घर होस्ट करत असल्यास, सेवांना ऑटोमॅटिक पद्धतीने परवानगी आहे. गेस्ट्सचे वास्तव्य आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही तयार आहात, हे दाखवण्याचा हा एक मार्ग आहे.

तुम्ही तुमच्या घरात सेवांना परवानगी न देण्याचा निर्णय घेऊ शकता. तुम्हाला परवानगी द्यायची नसलेल्या कोणत्याही सेवा निर्दिष्ट करण्यासाठी Airbnb सपोर्टशी संपर्क साधा आणि ते तुमच्या घराचे नियम अपडेट करतील.

आजपासून, अनुभवी व्यावसायिक हे सेवा होस्ट बनू शकतात. तुमचे कौशल्य शेअर करण्याचा आणि तुमचा बिझनेस वाढवण्याचा हा एक नवीन मार्ग आहे.

Airbnb अनुभव

Airbnb वर लोक बुकिंग करतात याचे एक प्रमुख कारण म्हणजे ते स्थानिक लोकांप्रमाणे राहू शकतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी नवीन असता तेव्हा सर्वोत्तम आकर्षणे शोधणे कठीण असते. बऱ्याचदा तुम्ही एखाद्या मोठ्या ग्रुपचा भाग असता, मेगाफोनवरून मागर्दर्शन करणाऱ्या टूर गाईडच्या मागे जात असता आणि एखादे काम उरकल्याप्रमाणे ॲक्टिव्हिटीज पूर्ण करता. एखादे शहर अनुभवण्यासाठी अधिक खराखुरा मार्ग असता तर?

ज्यांना शहराची सर्वोत्तम माहिती आहे अशा स्थानिकांनी होस्ट केलेले, पूर्णपणे नव्याने तयार केलेले Airbnb अनुभव आज आम्ही सादर करत आहोत. आम्ही जगभरातील विविध शहरांमध्ये अनुभव लाँच करत आहोत आणि दररोज आणखी काही जोडत आहोत. यासारख्या अनुभवांद्वारे गेस्ट्स शहरातील सर्वोत्तम भाग पाहू शकतातः

  • लँडमार्क, संग्रहालय आणि सांस्कृतिक अनुभव – नॉट्रे-डेमच्या रिस्टोरेशन टीममधील आर्किटेक्टच्या नजरेतून त्याच्या रिस्टोरेशनच्या जगात प्रवेश करा.
  • खाण्यापिण्याशी संबंधित सैर, कुकिंग क्लासेस आणि डायनिंगचे अनुभव – मिशेलिन बिब गुरमाँ-पुरस्कार विजेत्या रेस्टॉरंटमधील शेफसह रामेन बनवण्याची कला आत्मसात करा.
  • आऊटडोअर्स, वॉटर स्पोर्ट्स आणि वन्यजीव अनुभव – घोड्यावर स्वार होऊन अँडीयन संस्कृती आणि मानववंशशास्त्रातील स्थानिक तज्ञासह पवित्र इंका साईट्स आणि जबरदस्त अँडीयन लँडस्केप्सचा अनुभव घ्या.
  • गॅलरीची सैर, आर्ट वर्कशॉप्स आणि शॉपिंगचे अनुभव – हॉलिवूड फॅशन कन्सल्टंटकडून वैयक्तिक स्टायलिंग सेशनद्वारे वॉर्डरोब रिफ्रेश करा.
  • वर्कआऊट, वेलनेस, आणि ब्युटी अनुभव – व्यावसायिक मेक्सिकन कुस्तीगीरासह अस्सल लुचा लिब्रे प्रशिक्षण अनुभवासाठी रिंगमध्ये पाऊल ठेवा.

ज्ञान, लौकिक आणि अस्सलतेवर लक्ष केंद्रित करून Airbnb अनुभवांची गुणवत्ता तपासली जाते आणि ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. आम्ही नियमितपणे अनुभवांचा आढावा घेतो जेणेकरून ते आमच्या स्टँडर्ड्सची पूर्तता करतील.

Airbnb अनुभवांसाठी सबमिशन्स आता सुरू आहेत. तुम्हाला तुमच्या शहराची सखोल माहिती असल्यास आणि इतरत्र उपलब्ध नसलेली एखादी अनोखी ॲक्टिव्हिटी तुम्ही ऑफर करत असल्यास, अनुभव होस्ट करण्यासाठी तुमची कल्पना सबमिट करा.

पूर्णपणे नवीन ॲप

तुमचे घर, सेवा किंवा अनुभव मॅनेज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी समाविष्ट करण्याकरता आम्ही होस्ट्ससाठी ॲप नव्याने तयार केले आहे:

  • Airbnb Setup – एका सुलभ लिस्टिंग निर्मिती टूलद्वारे Airbnb मध्ये एखादी सेवा किंवा अनुभव सबमिट करणे सोपे आहे.
  • आज टॅब – घरे, सेवा आणि अनुभव यांचा समावेश असलेली पूर्णपणे नवीन रिझर्व्हेशन्स मॅनेजमेंट टॅब तुम्हाला विशेष आदरातिथ्य देण्यात मदत करतो.
  • कॅलेंडर – घरे, सेवा आणि अनुभवांसाठी नव्याने डिझाईन केलेल्या कॅलेंडरमध्ये दर तासाचे शेड्युल आणि Google कॅलेंडरबरोबर रिअल-टाईम इंटिग्रेशनसह नवीन दैनंदिन व्ह्यू समाविष्ट आहे.
  • लिस्टिंग्ज टॅब – सेवांसाठी आणि अनुभवांसाठी नवीन लिस्टिंग मॅनेजमेंट टूल्समुळे तुमच्या लिस्टिंगचा लोकेशनपासून ते भाड्यापर्यंतचा प्रत्येक पैलू ॲडजस्ट करणे सोपे होते.

तुम्ही घर होस्ट करत असल्यास, तुमची नवीन होस्टिंग टूल्स वापरणे सुरू करण्यासाठी आता अर्ली ॲक्सेस मिळवा.

ब्राझील आणि पोर्तो रिकोसह सर्व भौगोलिक प्रदेशांमध्ये सेवा उपलब्ध नाहीत.

Airbnb
13 मे, 2025
हे उपयुक्त ठरले का?