तुमचे लिस्टिंगचे शीर्षक लिहिण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

सर्च रिझल्ट्समध्ये तुमची जागा दाखवण्यासाठी तुमचे शीर्षक अपडेट करा.
Airbnb यांच्याद्वारे 17 जून, 2022 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
4 फेब्रु, 2025 रोजी अपडेट केले

गेस्ट्सना सर्च रिझल्ट्समध्ये पहिले काय दिसते, तर तुमच्या लिस्टिंगचे शीर्षक. तुमची जागा युनिक का आहे हे ठळकपणे दाखवून देण्याचीसुद्धा ती एक संधी असते. तुमची लिस्टिंग सर्चमध्ये लक्षवेधी ठरण्यास मदत करण्यासाठी, तुमची जागा बुक करण्यात इंटरेस्ट तयार करण्यासाठी आणि गेस्ट्सच्या अपेक्षा सेट करण्यासाठी प्रभावी शीर्षक लिहिण्याकरता या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.

छोटे शीर्षक अधिक प्रभावी ठरते

गेस्ट्स Airbnb सर्च करत असताना वेगवेगळ्या आकाराच्या स्क्रीन असलेल्या सर्व प्रकारच्या डिव्हायसेस वापरत असतात. वेब ब्राउझरमध्ये खूप छान वाटणारे शीर्षक मोबाईल ॲपवर लिस्टिंग्ज स्क्रोल करणाऱ्या गेस्ट्ससाठी लांबलचक ठरू शकते.

32 कॅरॅक्टर्सच्या मर्यादेचे पालन केल्यास तुमचे शीर्षक डेस्कटॉप आणि मोबाईल डिव्हाईसवर पूर्णपणे दिसेल याची खात्री करण्यात मदत होते.

येथे शीर्षक शॉर्ट लिस्ट करण्याची तीन चांगली उदाहरणे दिली आहेतः

  • डाऊनटाऊनचे दृश्य दाखवणारा आधुनिक लॉफ्ट

  • शेफ्ससाठी डोंगरराजीत लपलेली आरामदायक जागा

  • Año Nuevo जवळील बीचफ्रंट व्हिला

तुमचे शीर्षक 32 कॅरॅक्टर्सपेक्षा जास्त असल्यास, सर्वात महत्वाची माहिती आधी द्या. लांब शीर्षके सर्च रिझल्ट्समध्ये ऑटोमॅटिकली छोटी केली जातात आणि तुमच्या शीर्षकाच्या उर्वरित भागाच्या जागी एलिप्सिस दिसून येते. उदाहरणार्थ, “कंट्री केबिन विथ लेक व्ह्यू, फायरपिट, बोट रॅम्प” असे शीर्षक सर्च रिझल्ट्समध्ये “कंट्री केबिन विथ लेक व्ह्यू …” बनते.

सेंटेन्स केसची निवड करा

सेन्टेंस केस म्हणजे तुमच्या शीर्षकातील पहिल्या शब्दाचे फक्त पहिले अक्षर कॅपिटल करणे. टायटल केसपेक्षा हे वाचायला सोपे आणि अधिक संभाषणात्मक असू शकते. टायटल केसमध्ये तुम्हाला सर्व शब्द कॅपिटल करावे लागतात, किंवा ऑल कॅप्स केले जातात. 

गेस्ट्सना सर्चचा अधिक चांगला अनुभव देण्यासाठी, एखादे नाव किंवा शहराचे नाव असल्याशिवाय तुमच्या शीर्षकाच्या इतर शब्दांमध्ये अप्परकेस अक्षरे वापरणे टाळा. UK सारखे संक्षिप्त रूप किंवा LHR सारख्या एअरपोर्ट कोडसाठी देखील तुम्ही अपवाद करू शकता.

सेन्टेंस केसमधील लिस्टिंग टायटल्सची तीन चांगली उदाहरणे येथे दिली आहेतः

  • बाँडी बीचवरील सीसाईड शॅक

  • रोमँटिक व्हिक्टोरियन गेस्ट रूम

  • LAX जवळील इको-फ्रेंडली स्टुडिओ

इमोजींपेक्षा शब्द अधिक स्पष्ट असतात

इमोजी आणि चिन्हे गोंधळात टाकू शकतात किंवा दिशाभूल करू शकतात कारण जगभरातील वेगवेगळ्या लोकांसाठी त्यांचा अर्थ वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ, थम्ब्स अपचा अर्थ मंजुरी, नंबर एक किंवा आक्षेपार्ह इशारा असा वेगवेगळ्या प्रकारे घेतला जाऊ शकतो.

तुमचे लिस्टिंग शीर्षक अधिक आकर्षक आणि वाचायला सोपे करण्यासाठी, तुमच्या जागेसाठी सोपी आणि वर्णनात्मक भाषाच वापरा. विशेष कॅरॅक्टर्स (जसे की !, #, किंवा *) वापरणे ठीक आहे, परंतु जोर देण्यासाठी ती वारंवार वापरणे (जसे की !!! किंवा ***) चुकीचे आहे. दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवण्यासाठी, स्पेससह कॉमा किंवा स्पेसशिवाय स्लॅश वापरून पहा.

येथे काय करू नये याचे एक उदाहरण दिले आहेः

  • ****स्की & गोल्फ शॅले****!!!

हे चांगल्या प्रकारे कसे लिहिले जाऊ शकते ते येथे दिले आहेः

  • प्रायव्हेट यार्ड असलेले स्की/गोल्फ शॅले

अधिक तपशील देणे हे पुनरावृत्तीपेक्षा जास्त चांगले असते

बहुतेक वेळेस, सर्च रिझल्ट्समध्ये गेस्ट्सना आधीच दिली गेलेली कोणतीही माहिती पुन्हा सांगणे गरजेचे नसते, जसे की तुमचे शहर किंवा नगर किंवा एकूण बेड्स. त्याऐवजी, लक्ष वेधण्यात मदत करू शकतील असे युनिक तपशील जोडण्यासाठी तुमचे लिस्टिंग शीर्षक वापरा.

उदाहरणार्थ, जर तुमची लिस्टिंग ब्युनॉस आयर्समध्ये असेल तर तुम्ही तुमच्या लिस्टिंग शीर्षकात “रिकॉलेटा” सारख्या तुमच्या शेजारचा समावेश करू शकता. तो फ्लॉरेन्स, इटलीमध्ये असल्यास, तुम्ही “Uffizi जवळ” किंवा तुमच्या जवळची एखादी लँडमार्क जागा लिहू शकता. किंवा, तुमच्याकडे ऑफिससाठी स्वतंत्र जागा असल्यास, तुम्ही शीर्षकात “वर्क-फ्रेंडली” असे हायलाईट करू शकता. यामुळे गेस्ट्सच्या मनात महत्त्वाचे तपशील स्पष्ट होण्यात मदत होते.

तुम्ही नवीन लिस्टिंग शीर्षकातून “नवीन” हा शब्द देखील वगळू शकता, कारण गेस्ट्सना ही माहिती सर्च रिझल्ट्समध्ये बॅजवर आधीच कळवली गेली आहे.

Airbnb चे कंटेंट धोरण वाचा

या लेखात दिलेली माहिती पब्लिकेशन झाल्यानंतर कदाचित बदललेली असू शकते.

Airbnb
17 जून, 2022
हे उपयुक्त ठरले का?