तुमच्यासाठी कोणते होस्टिंग नियम लागू होतात?
हायलाइट्स
अनेक क्षेत्रांमध्ये होस्ट्ससाठी विशिष्ट कायदे आणि कर आहेत
आमच्या मदत केंद्र आणिहोस्ट क्लब कडून स्थानिकीकृत सल्ला मिळवा
- होस्टिंगचे जग उलगडण्यासाठी आमच्या संपूर्ण मार्गदर्शका मध्ये अधिक शोधा
तुमचे स्थानिक सरकार अल्पकालीन रेंटल्सचे नियमन करते का? तुमच्या भागातील Airbnb होस्ट्सना कोणते कर भरावे लागतात आणि ते कोण मोजतात व गोळा करतात? तुमचा बिल्डिंग मॅनेजर Airbnb गेस्ट्सना परवानगी देतो का?
होस्ट बनण्याचा विचार करणार्या प्रत्येकासाठी आणि आधीपासूनच गेस्ट्सचे स्वागत करणाऱ्यांसाठी यासारखे प्रश्न महत्त्वाचे आहेत.
Airbnb तुम्हाला तुमच्या एरियाविषयी विशिष्ट कायदेशीर मार्गदर्शन किंवा कराबद्दल सल्ला देऊ शकत नसले तरी, होस्टिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली माहिती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू शकतो.
तुमच्यासाठी कोणते नियम आणि नियमने लागू होतात?
तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून, देश, राज्य, शहर आणि अगदी प्रॉपर्टी स्तरावर आवश्यकता असू शकते.
उदाहरणार्थ, काही क्षेत्रांमध्ये आहेतः
- झोनिंग नियम जे तुम्ही तुमची जागा कशी वापरू शकता हे निर्दिष्ट करतात
- कर, जसे की ऑक्युपन्सी कर, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स (VAT) आणि होस्ट्सना लागू असलेला गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स (GST)
- कायदे, जसे की होस्ट्सना लायसन्स किंवा परमिट घेणे, त्यांची जागा रजिस्टर करणे किंवा दायित्व विमा घेणे यासाठी आवश्यक असणारे
तुमच्या भागातील नियम आणि कायद्यांच्या प्रकारांबद्दल अधिक जाणून घेण्याचे काही मार्ग येथे दिले आहेत:
1. Airbnb मदत केंद्राला भेट द्या
मदत केंद्रात जबाबदार होस्टिंगबद्दल प्रदेशानुसार विशिष्ट माहितीे आहे. ही गाईड्स आपला देश, राज्य, काउंटी किंवा शहरातील होस्टिंग आवश्यकतांचा सामान्य अंदाज मिळवण्यास इच्छुक असलेल्यांसाठी एक उत्तम प्रारंभ बिंदू म्हणून काम करतात.
2. तुमच्या स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा
बऱ्याच स्थानिक सरकारांच्या वेब पेजेसवर त्यांची अल्पकालीन रेंटल धोरणे आणि आवश्यकता यांचे तपशील असतात. तुम्हाला ही माहिती ऑनलाईन शोधण्यात समस्या येत असल्यास, त्यांना थेट ईमेल किंवा कॉल करण्याचा प्रयत्न करा.
3. आता होस्ट करत असलेल्यांशी संपर्क साधा
स्थानिक होस्ट क्लबशी संपर्क साधणे आणि कम्युनिटी सेंटरला भेट देणे हे स्थानिक नियम आणि नियमने नेव्हिगेट करण्याचा अनुभव असलेल्या अनुभवी होस्ट्सशी कनेक्ट होण्याचे दोन उत्तम मार्ग आहेत. बहुतेक होस्ट्स हे परवानाधारक कर किंवा कायदेशीर सल्लागार नसल्यामुळे, तुम्हाला मिळालेल्या कोणत्याही माहितीची पडताळणी करणे नेहमीच चांगले असते.
4. स्थानिक व्यावसायिकांचा सल्ला घ्या
स्थानिक वकील किंवा कर व्यावसायिक तुमच्या क्षेत्रातील होस्ट्ससाठी लागू असलेले कर आणि कायदे याबद्दल सल्ला देऊ शकतात. तुम्ही होस्ट बनण्याची आणि तुमच्या जागेत गेस्ट्सचे स्वागत करणे सुरू करण्याची तयारी करत असताना हे लोक तुम्हाला नियमांचे अनुपालन करण्यात मदत करू शकतात.
आम्हाला आशा आहे की एक होस्ट म्हणून तुम्हाला लागू होत असलेले नियम आणि कायदे समजून घेण्यात या सल्ल्यांची तुम्हाला मदत होईल आणि होस्टिंगची तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी गरजेचा आत्मविश्वास तुम्हाला मिळेल.
हायलाइट्स
अनेक क्षेत्रांमध्ये होस्ट्ससाठी विशिष्ट कायदे आणि कर आहेत
आमच्या मदत केंद्र आणिहोस्ट क्लब कडून स्थानिकीकृत सल्ला मिळवा
- होस्टिंगचे जग उलगडण्यासाठी आमच्या संपूर्ण मार्गदर्शका मध्ये अधिक शोधा