सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

आकर्षक शीर्षक कसे लिहावे

एक छोटेसे, वाचण्यास सुलभ असे शीर्षक सर्च परिणामांमध्ये तुमची जागा नजरेत भरण्यासाठी मदत करू शकते.
Airbnb यांच्याद्वारे 13 ऑक्टो, 2025 रोजी

तुमचे शीर्षक म्हणजे तुमच्या जागेमध्ये काय खास आहे याकडे लक्ष वेधून घेण्याची संधी आहे. लहान शीर्षके सर्वात प्रभावी ठरतात आणि तुम्ही उपलब्ध असलेली सर्व 50 कॅरॅक्टर्स वापरलीच पाहिजेत असे गरजेचे नाही.

प्रेरणेसाठी 3 नमुना शीर्षके येथे दिली आहेत:

  • कयाक्ससह सीसाईड रिट्रीट
  • रोमँटिक व्हिक्टोरियन गेस्ट रूम
  • LAX जवळील इको-फ्रेंडली स्टुडिओ

तुमचे शीर्षक लिहिण्यासाठी, तुमची जागा आकर्षक आणि युनिक का आहे याचा विचार करा. सर्वकाही इथेच सांगण्याचा प्रयत्न करू नका—गेस्ट्सना आणखी जाणून घेण्याची उत्सुकता वाटेल इतकेच लिहा.

आकर्षक शीर्षक लिहिण्यासाठी हे सल्ले वापरून पहा:

  • तुमच्या जागेचे विशिष्ट शब्दांमध्ये वर्णन करणारे काही शब्द खाली लिहा, जसे की “शांत,” “भरपूर प्रकाश” आणि “डाऊनटाऊन.”
  • गेस्ट्सना इंटरेस्ट वाटू शकेल अशी वैशिष्ट्ये नमूद करा, जसे की एखाद्या महत्त्वाच्या प्रेक्षणीय ठिकाणापासून जवळ असणे.
  • सर्च रिझल्ट्समध्ये आधीच दिसणारे तपशील वगळा, जसे की शहर किंवा गाव आणि एकूण बेड्सची संख्या.
  • तुमच्या शीर्षकातील पहिल्या शब्दाचे फक्त पहिले अक्षर आणि कोणतीही विशेषनामे कॅपिटल करा.
  • इमोजीज, चिन्हे आणि विशेष कॅरॅक्टर्स टाळा.

तुम्ही तुमचे शीर्षक कधीही बदलू शकता. खरं तर, अनेक होस्ट्स जेव्हा सुविधा जोडतात किंवा त्यांच्या पहिल्या काही गेस्ट्सना सर्वाधिक काय आवडते हे जाणून घेतात तेव्हा त्यांचे शीर्षक अपडेट करतात.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदलली असू शकते.
Airbnb
13 ऑक्टो, 2025
हे उपयुक्त ठरले का?