गेस्ट्सना मिळणार असलेल्या जागेचा प्रकार कसा निवडावा
कुठे राहायचे हे निवडताना, गेस्ट्सना हे जाणून घ्यायचे असते की ते तुमची जागा शेअर करणार आहेत की संपूर्ण जागा त्यांच्या स्वतःसाठी असेल.
तुम्ही तुमची जागा लिस्ट करता तेव्हा Airbnb 3 पर्याय देते.
- संपूर्ण जागा: जागेत फक्त तेच गेस्ट्स राहणार आहेत, ज्यात झोपण्याच्या जागेव्यतिरिक्त सहसा बाथरूम, किचन आणि स्वतंत्र प्रवेशद्वार समाविष्ट असते.
- खाजगी रूम: गेस्ट्सकडे फक्त त्यांच्यासाठी असलेली एक बेडरूम असते, तसेच शेअर केलेल्या जागांचा ॲक्सेस असतो, ज्यात प्रवेशद्वार, बाथरूम आणि किचन समाविष्ट असू शकते.
हॉस्टेलमधील शेअर केलेली रूम: गेस्ट्स एका प्रोफेशनली मॅनेज केलेल्या आणि साईटवर 24/7 कर्मचारी उपलब्ध असलेल्या हॉस्टेलमध्ये एका शेअर केलेल्या रूममध्ये झोपतात.
पुढील पायरीमध्ये, तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये तुमच्या जागेचे वर्णन कराल. कोणत्या जागा खाजगी आहेत आणि कोणत्या शेअर केल्या आहेत हे स्पष्ट करणारे तपशील तुम्ही समाविष्ट करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही संपूर्ण जागेचे होस्टिंग करत असाल आणि प्रॉपर्टीवर राहत असाल, तर तुम्ही असे लिहू शकता: “आम्ही एका वेगळ्या घरात राहतो ज्याचे बॅकयार्ड गेस्टहाऊसला लागून आहे आणि ते गेस्ट्ससह शेअर केले जाते.”
तुमची परिस्थिती बदलल्यास तुम्ही तुमची लिस्टिंग कधीही अपडेट करू शकता.
