तुमचे लोकेशन कसे जोडायचे
रिझर्व्हेशन करण्यापूर्वी, गेस्ट्स त्यांना ज्या ठिकाणांना भेट देण्याचा विचार आहे तिथून तुमचे घर किती जवळ आहे ते तपासू शकतात.
सर्च रिझल्ट्समध्ये दाखवलेल्या मॅपसाठी तुम्हाला सामान्य लोकेशन द्यायचे आहे की अचूक लोकेशन द्यायचे आहे हे तुम्ही निवडू शकता. कोणत्याही परिस्थितीत, गेस्ट्सचे रिझर्व्हेशन कन्फर्म होईपर्यंत त्यांना तुमच्या रस्त्याचा पत्ता मिळत नाही.
तुमचे लोकेशन कसे जोडायचे
1. तुमच्या रस्त्याचा पत्ता लिहा. टाईप करणे सुरू करा आणि योग्य पत्ता पॉप अप झाल्यावर, तो निवडा.
2. तुमचा पत्ता कन्फर्म करा. अचूकतेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कोणत्याही ॲडजस्टमेंट्स करा, जसे की अपार्टमेंट किंवा सुईट नंबर जोडणे.
3. पिन योग्य ठिकाणी असल्याची खात्री करा. पिन योग्य ठिकाणी ठेवलेली नसल्यास, पिन योग्य लोकेशनवर पॉईंट करेपर्यंत मॅप ड्रॅग करा.
4. एक मॅप निवडा. तुम्ही तुमचे अचूक लोकेशन दाखवले जावे यावर स्विच केले नसल्यास, तुमच्या लिस्टिंगमध्ये तुमच्या जागेच्या सामान्य लोकेशनचा मॅप समाविष्ट असेल.
- सामान्य लोकेशनचा मॅप तुमच्या जागेच्या सभोवतालचा भाग दाखवतो, जो रस्त्याच्या पत्त्यापासून सुमारे अर्धा मैल (1 किलोमीटरपेक्षा कमी) अंतराच्या आतील असतो.
- अचूक लोकेशनचा मॅप एक पिन दाखवतो जो अचूक जागा मार्क न करता सर्वात जवळच्या क्रॉस स्ट्रीट्सकडे निर्देशित करतो.
पुढील पायरीवर जाण्यापूर्वी तुमची माहिती पुन्हा तपासा आणि कोणत्याही चुका असल्यास त्या दुरुस्त करा. तुमचे पहिले बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर, तुम्हाला Airbnb सपोर्टशी संपर्क साधल्याशिवाय बदल करता येणार नाहीत.
