सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

तुमची नवीन होस्टिंग टूल्स एक्सप्लोर करणे

तुम्हाला होस्ट करण्यात मदत करण्यासाठी Airbnb ॲप हजर आहे.
Airbnb यांच्याद्वारे 10 डिसें, 2025 रोजी

Airbnb ॲपमुळे तुमचे घर मॅनेज करणे सोपे होते आणि तुमचा बिझनेस वाढवण्यात मदत होते. होस्ट म्हणून लॉग इन केल्यावर तुम्हाला या 5 टॅब्जमध्ये ऑर्गनाईझ केलेली तुमची होस्टिंग टूल्स मिळतील.

आज

आज टॅब म्हणजे तुम्ही ॲप उघडता तेव्हा तुम्हाला दिसणारा टॅब. तुमच्या दिवसाचे नियोजन करण्यात आणि विशेष आदरातिथ्य देण्यात मदत होण्यासाठी तुम्ही रिझर्व्हेशनचे तपशील एका नजरेत पाहू शकता.

  • तुम्ही कोणाला आणि केव्हा होस्ट करत आहात हे जाणून घेण्यासाठी सध्याच्या आणि आगामी रिझर्व्हेशन्सच्या व्ह्यूजमध्ये स्विच करा.
  • रिझर्व्हेशन्समध्ये स्वत:साठी नोट्स जोडा, उदा. विशेष प्रसंगाबद्दल किंवा विनंत्यांबद्दल रिमाइंडर्स.
  • प्रत्येक रिझर्व्हेशनसाठी काय करावे याबद्दल टिप्स मिळवा, उदा. गेस्ट्सना कसे चालले आहे ते विचारणे किंवा रिव्ह्यू वाचणे.

कॅलेंडर

कॅलेंडरमध्ये तुम्ही तुमच्या उपलब्धतेचा आणि भाड्याचा आढावा घेता आणि त्यांच्यामध्ये बदल करता.

  • तुमची उपलब्धता आणि भाडे सेटिंग्ज ॲडजस्ट करा, जसे की किमान रात्री आणि सवलती.
  • गेस्ट्सना बुक करण्यासाठी तारखा खुल्या करा आणि तुम्ही होस्ट करू शकत नाही अशा रात्री ब्लॉक करा.
  • प्रति रात्र भाड्याचे सल्ले पहा, जे तुमच्या लिस्टिंगचे लोकेशन आणि सुविधा, तुमची मागील बुकिंग्ज आणि तुमच्या भागातील नवीनतम भाड्यांसारख्या घटकांवर आधारित असतात.

लिस्टिंग्ज

लिस्टिंग्ज टॅब तुम्हाला तुमच्या लिस्टिंगचे तपशील मॅनेज करण्यात मदत करते. बुकिंग्ज आकर्षित करण्यासाठी आणि गेस्ट्सना तुमच्या जागेचे सर्वात अचूक आणि संपूर्ण चित्र दाखवण्यासाठी या टूल्सचा वापर करा.

  • उच्च-गुणवत्तेचे फोटो जोडण्यासह आणि तपशिलवार आगमन गाईडसह तुमची लिस्टिंग अपडेट करा.
  • ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांसह तुम्ही ऑफर करत असलेल्या सर्व सुविधा जोडा.
  • गेस्ट्सना लिस्टिंग कशी दिसते ते पहा.

मेसेजेस

मेसेजेस टॅबमुळे तुम्हाला गेस्ट्सच्या वास्तव्यापूर्वी, दरम्यान आणि त्यांच्या वास्तव्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्यात मदत होते.

  • झटपट उत्तरे वापरून गेस्ट्सना सहज प्रतिसाद द्या—ही कस्टमाईझ करण्यायोग्य टेम्प्लेट्स तुम्ही लगेच पाठवू शकता किंवा महत्त्वाच्या क्षणी पाठवण्यासाठी शेड्युल करू शकता.
  • स्वतःची ओळख करून देण्यासाठी आणि महत्त्वाचे तपशील हायलाईट करण्यासाठी फोटो शेअर करा आणि गेस्ट्सना तुमची जागा समजण्यात मदत करण्यासाठी व्हिडिओज जोडा.
  • ट्रिपच्या तारखा आणि गेस्ट्सची संख्या यासारख्या तपशिलांसह बुकिंग विनंत्यांचा आढावा घ्या.
  • तुमच्या भागात पाहण्यासाठी, करण्यासाठी आणि खाण्यासाठी सर्वोत्तम गोष्टींच्या शिफारसी करा.

मेनू तुम्हाला तुमची कमाई, इन्साईट्स आणि इतर सेटिंग्जचा ॲक्सेस देतो. तुमचा होस्टिंग बिझनेस वाढवण्यात मदत करण्यासाठी तुम्हाला पर्सनलाईज केलेल्या टिप्स आणि संसाधने मिळतील.

  • तुमची कमाई पहा आणि कमाई डॅशबोर्डमध्ये कस्टम रिपोर्ट्स तयार करा.
  • इन्साईट्स विभागात गेस्ट रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज एक्सप्लोर करा.
  • तुमची अकाऊंट सेटिंग्ज मॅनेज करा आणि होस्टिंगची संसाधने शोधा.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदलली असू शकते.

Airbnb
10 डिसें, 2025
हे उपयुक्त ठरले का?