तुमचे पहिले रिझर्व्हेशन म्हणून कोणाचे स्वागत करावे हे निवडणे
पहिल्यांदा तुमच्या घरात एखाद्या अनोळखी व्यक्तीचे स्वागत करणे बहुधा विचित्र वाटू शकते. तुमचे आणि तुमच्या प्रॉपर्टीचे जोखीम कमी करण्यासाठी आणि तुमचे मन शांत करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे.
तुम्ही नवीन होस्ट असता, तेव्हा तुम्ही हे निवडू शकता की तुमच्या जागेमध्ये पहिल्यांदा कुठल्या प्रकारच्या गेस्टला येऊ द्यावे. या पायरीमध्ये हे निवडा की तुम्हाला यापैकी कोणाचे स्वागत करायचे आहे:
- Airbnb वरील कोणतेही गेस्ट
- एखादे अनुभवी गेस्ट
"Airbnb वरील कोणतेही गेस्ट" म्हणजे आमच्या कम्युनिटीच्या सदस्यांपैकी कोणीही, मग ते नवीन सदस्यही असू शकतात. हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला पहिले रिझर्वेशन लवकर मिळू शकते, कारण यामुळे जास्त गेस्ट्सना वास्तव्याची जागा शोधताना तुमची जागा दिसू शकेल.
अनुभवी गेस्ट म्हणजे Airbnb वर किमान तीन वास्तव्ये बुक केलेले आणि खराब रिव्ह्यू नसलेले गेस्ट, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. सर्व अनुभवी गेस्ट्सची ओळख व्हेरिफाय केलेली असते आणि त्यांच्या पेमेंट पद्धतीची माहिती आमच्याकडे असते. पहिल्यांदा होस्टिंग करणे त्यांच्यामुळे अधिक सोयीस्कर होईल असे त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डमुळे वाटते आणि ते तुम्हाला त्यांच्या वास्तव्याबद्दल असा फीडबॅक देऊ शकतात ज्याची तुम्हाला मदतच होईल.
दोन्ही पर्याय चांगलेच आहेत. तुम्हाला योग्य वाटेल तो पर्याय निवडा.