कनेक्शन कसे वाढवायचे
गेस्ट्सना तुमच्याशी आणि इतर गेस्ट्सशी प्रामाणिक संवाद साधण्याच्या संधी मोलाच्या वाटतात. अनुभवाच्या आधी, दरम्यान आणि नंतर त्यांना कनेक्शन आणि आपलेपणाची भावना देणारे काही खास क्षण तयार करा.
अर्थपूर्ण परस्परसंवादास प्रोत्साहन देणे
गेस्ट्सचा तुमच्याशी, एकमेकांशी आणि तुमच्या कम्युनिटीशी एक बंध निर्माण होण्यासाठी तुमच्या प्रवासाच्या वेळापत्रकात पुरेसा वेळ ठेवा. यात पूर्वनियोजित आणि उत्स्फूर्त अशा दोन्ही अॅक्टिव्हिटीजचा समावेश असू शकतो.
- संभाषणाची सुरुवात प्लॅन करून ठेवा. गेस्ट्सना सहज उत्तरे देता येतील असे काही प्रश्न विचारा, जसे की ते कुठून आले आहेत. मेक्सिको सिटीमध्ये कुकिंग क्लास होस्ट करणाऱ्या ग्रेसिएला यांच्याकडे एकदा असे आंतरराष्ट्रीय गेस्ट्स आले ज्यांना नंतर समजले की ते शेजारी होते. “ती साधीशी ओळख एका अनपेक्षित कनेक्शनमध्ये रूपांतरित झाली,” त्या सांगतात.
- ग्रुपला एकमेकांत मिसळू द्या. तुम्ही गेस्ट्सना एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट सांगण्यासाठी आमंत्रित करू शकता, जेणेकरून त्यांना एकमेकांना जाणून घेण्यात मदत होईल. नायगारा फॉल्सची सैर होस्ट करणारे अॅलन म्हणतात, “मी अद्भुत जीवनकथा असलेल्या कमालीच्या लोकांना भेटत असतो.” “आणि ते नवनवीन लोकांना भेटण्यासाठीच अनुभवांमध्ये सहभागी होणे पसंत करतात. त्यांना वैयक्तिक कनेक्शन फार महत्त्वाचे वाटते.”
- तुमच्या कम्युनिटीचा परिचय करून द्या. गेस्ट्सना स्थानिक लोकांशी कनेक्ट होण्यास मदत करा, मग ते पूर्वनियोजित असो वा उत्स्फूर्तपणे. लिस्बनमध्ये खाण्यापिण्याशी संबंधित सैर होस्ट करणाऱ्या रूथी म्हणतात की त्या गेस्ट्सना कम्युनिटीशी जोडणारा बंध आहेत. “आम्ही गेस्ट्सची ओळख गल्लीतल्या आजीबाईंशी करून देतो तेव्हा त्यांना ते खूप आवडते.”
तुम्ही गेस्ट्सना कनेक्ट करण्यासाठी वेळ मिळावा याकरता बदल केल्यास, तुमचा प्रवासाचा कार्यक्रम त्यानुसार अपडेट करा, जेणेकरून त्यांना काय अपेक्षा करावी हे कळेल.
संभाषणाला योग्य दिशा देणे
अनुभवाच्या आधी आणि नंतर मेसेजेस टॅबच्या माध्यमातून तुमच्या गेस्ट्सशी सक्रिय संवाद साधत रहा.
- एक वेलकम मेसेज शेड्युल करा. स्वतःचा परिचय देऊन ग्रुप मेसेज थ्रेडची सुरुवात करा. त्यांना अनुभवामधून काय मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्यांच्यापैकी कोणी एखादा विशेष प्रसंग साजरा करत आहेत का, हे विचारा.
- प्रत्येक ग्रुपला चांगल्या प्रकारे जाणून घ्या. अधिक चांगले वैयक्तिक कनेक्शन्स वाढवण्यात मदत व्हावी यासाठी चॅटमध्ये सक्रियपणे सहभागी रहा. तुमच्या गेस्ट्सच्या आवडीनिवडी तसेच ते कुठून आले आहेत यासह त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला 'आज' टॅबमध्येसुद्धा मिळेल.
- नंतर पाठपुरावा करा. फोटोज, व्हिडिओज आणि शिफारसी शेअर करा आणि गेस्ट्सनासुद्धा तसे करण्यास प्रोत्साहित करा. यामुळे गेस्ट्सनी बनवलेली कनेक्शन्स घट्ट होण्यात मदत होईल आणि जेव्हा त्यांना रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज देण्याची विनंती केली जाईल तेव्हा त्यांच्या मनात तुमचा अनुभव ठळकपणे असेल.
होस्ट्स, फोटोज आणि लिस्टिंगचे सर्व तपशील Airbnb अनुभवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.