पॅरालिम्पियन वँडरसन शावेझ

ब्राझीलमध्ये आलेल्या पुरानंतरही पॅरालिम्पियनने पॅरीस 2024 ची त्यांची स्वप्ने जिवंत ठेवली

फेन्सर वँडरसन शावेझ पॅरिस 2024 पॅरालिम्पिक गेम्ससाठी पात्र होण्याची अपेक्षा करत होते, परंतु पात्रता स्पर्धेच्या एका महिन्यापूर्वीच आलेल्या जोरदार पुरामुळे ब्राझीलमधील रिओ डो सुल येथील त्यांचे घर उद्ध्वस्त झाले. या आपत्तीमुळे विस्थापित झालेल्या 6,00,000 लोकांपैकी ते एक होते.पाण्याची पातळी अखेरीस त्यांच्या अपार्टमेंटच्या छतापर्यंत पोहोचली आणि त्यात त्यांचे क्रीडा साहित्य, पदके आणि पासपोर्ट वाहून गेले. 2016 मध्ये रिओ डी जानेरो आणि 2021 मध्ये टोकियो येथे झालेल्या पॅरालिम्पिक गेम्समध्ये भाग घेतलेल्या वँडरसन यांना भीती होती की या पुरामुळे त्यांची पॅरिसला जाण्याची संधी हातातून निसटून जाईल.
एक व्यक्ती पुराच्या पाण्याने भरलेल्या आसपासच्या परिसरातील रस्ते पायी पार करत असून एका होडीला रस्ता दाखवत आहे. नावेत तीन व्यक्ती बसल्या आहेत.
वँडरसन 2013 पासून ब्राझीलच्या व्हीलचेअर फेन्सिंग टीमचे एक सदस्य असून ते अमेरिकन खंडातल्या टॉप रँकिंगच्या फॉईल आणि सेबर स्पर्धकांपैकी एक आहेत. त्यांनी फेन्सिंग करायला सुरुवात केली तेव्हा तो त्यांच्या आयुष्याचा कठीण काळ होता. ते म्हणतात, “मी काही पहिल्याच नजरेत या खेळाच्या प्रेमात पडलो नाही.”वँडरसन यांनी व्यावसायिक सॉकरपटू बनण्याचे स्वप्न पाहिले होते. ते 12 वर्षांचे असताना त्यांच्या गळ्याला चुकलेली गोळी लागली आणि त्यांच्या कंबरेखालचा भाग अर्धांगवायूने लुळा पडला. "माझ्या मनात पहिला विचार आला की मी आता सॉकर कसा खेळू शकणार?" ते म्हणतात.
व्हीलचेअरवर बसलेले दोन फेन्सर्स एकदुसऱ्याशी लढत असून एक फेन्सर त्यांच्या फॉईलने दुसऱ्या फेन्सरच्या छातीला स्पर्श करत आहे.
सिटी हॉलमध्ये त्यांच्यासह काम करत असलेल्या एका व्हीलचेअर फेन्सरने त्यांना हा खेळ आजमावण्यास प्रोत्साहित केले. वँडरसनने यापूर्वी कधीही याबद्दल ऐकले नव्हते म्हणून त्यांनी आधी त्यात रस घेतला नाही. शेवटी त्यांचे कुतूहल इतके वाढले की अखेरीस ते सहकाऱ्याच्या टीमचे प्रशिक्षण पाहण्यासाठी गेले. या अनुभवाचा खोलवर परिणाम झाला. “टीमचे खेळाडू त्या सर्व गोष्टी करत होते ज्या मी कधीही करू शकणार नाही, असे मला वाटत होते”वँडरसनने फेन्सिंग आजमावून पाहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना ताबडतोब या खेळाची गोडी लागली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी या खेळाच्या सर्वोच्च स्तरावरच्या स्पर्धांमध्ये भाग घेत जगभर प्रवास केला आहे. 
4 मे 2024 रोजी पुराच्या पाण्याने वँडरसनचे घर पाण्याखाली गेले. पॅरिस पॅरालिम्पिक्ससाठी पात्र होण्याकरता त्यांच्या दोन महत्त्वाच्या स्पर्धा बाकी होत्या. या आपत्तीमुळे आलेल्या मानसिक तणावावर मात करण्याव्यतिरिक्त त्यांना क्रीडा साहित्याची आणि वास्तव्याच्या जागेची गरज होती जेणेकरून ते प्रशिक्षण सुरू ठेवू शकतील.ब्राझील आणि अमेरिकेतील फेन्सर्सनी वँडरसन यांना कपडे आणि ॲथलेटिक गिअर दान केले आणि त्यांना Airbnb.org द्वारे पोर्टो अलेग्रीमध्ये राहण्यासाठी विनामूल्य, ॲक्सेसिबल जागा मिळाली. घराची समस्या सुटल्यामुळे ते त्यांचे प्रशिक्षण सुरू ठेवू शकले.
वँडरसन शावेझ एका अपार्टमेंटमध्ये त्यांच्या व्हीलचेअरवर बसून हसत आहेत. त्यांनी चष्मा घातला आहे आणि एक हात काऊंटरवर ठेवला आहे.

“Airbnb.org द्वारे घर मिळणे माझ्यासाठी आवश्यक होते. इथे मला माझे प्रशिक्षण पूर्ण करता येईल हे जाणून मी निश्चिंत आहे आणि मला सुरक्षित वाटते. आता मी घरी जाऊन आराम करू शकतो.”

वँडरसन शावेझ न्हाव्याच्या खुर्चीवर बसून न्हाव्याबरोबर हसत असून ते दोघे आरशाकडे पाहत आहेत.
अनेक अडथळे आले तरीही, वॅंडरसन यांनी पात्रता स्पर्धेपर्यंतचा त्यांचा प्रवास पूर्ण केला आणि पॅरालिम्पिक गेम्समध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक असलेले पॉईंट्स मिळवले. ते त्यांच्या घरी परत येऊ शकणार की नाही किंवा कधी परत येऊ शकतील हे त्यांना माहीत नाही, पण ब्राझीलसाठी एक नवीन पदक आणण्याची त्यांची इच्छा मात्र नक्की आहे.3 सप्टेंबर 13:00 CET पासून वॅंडरसन यांना स्पर्धेत भाग घेताना पहा.
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक्स, Airbnb लोगोज
एक माणूस एका मुलाला उचलून व्हॅनमधून बाहेर पडत आहे आणि एक स्त्री हसत त्यांना नमस्कार करत असून मुलाच्या बाहूला स्पर्श करत आहे.

Airbnb.org ने ब्राझीलमधील पुरातून वाचलेल्यांची राहण्याची व्यवस्था केली

पूर आल्यापासून आतापर्यंत Airbnb.org ने रिओ डो सुलमधील निर्वासितांसाठी विनामूल्य राहण्याच्या जागा पुरवल्या आहेत. ना-नफा संघटना Pertence च्या भागीदारीत, आम्ही विशेष गरजा आणि दिव्यांग मुले असलेल्या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था केली आहे. आपत्ती दरम्यान मदत कार्यांना सपोर्ट करणाऱ्या प्रथम प्रतिसादकर्त्यांची राहण्याची सोय करण्यासाठी आम्ही युनिसेफबरोबरदेखील भागीदारी केली आहे.

Airbnb.org ला सपोर्ट करा

100% देणग्या थेट संकटाच्या वेळी लोकांना विनामूल्य राहण्यास अर्थसहाय्य करण्यासाठी वापरल्या जातात.
देणगी द्या